१) सईबाई – सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकरघराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे बंधु होते. …
…शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.
२/११
२) सगुणाबाई – सगुणाबाई या शिवरायांच्या द्वितीय पत्नी असुन त्या कोकणातील शृंगारपुर येथील शिर्के घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४१ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले.
३/११
३) सोयराबाई – सोयराबाई या शिवरायांच्या तृतीय पत्नी असुन त्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या. संभाजी मोहिते हे त्यांचे वडील तर स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे त्यांचे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५० पुर्वी झाला. …
४/११
…त्यांच्यापासुन शिवरायांना दोनअपत्ये झाली. त्यांचा मृत्यु १६८१ च्या उत्तरार्धात रायगडावर झाला.
४) पुतळाबाई – पुतळाबाई या शिवरायांच्या चौथ्या पत्नी असुन त्या पालकर घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५३ मध्ये झाला. …
५/११
…त्या निपुत्रीक असुन जुन १६८० मध्ये शिवरायांच्या निधनाने खचुन जाऊन रायगडावर त्यांचा मृत्यु झाला.
५) लक्ष्मीबाई – लक्ष्मीबाई या शिवरायांच्या पाचव्या पत्नी असुन त्या विचारे घराण्यातील होत्या. …
६/११
…जावळीच्या गुप्त मोहिमेवर असताना १६५६ पुर्वी महाराजांशी त्यांचा विवाह झाल्याचे सांगितले जाते. त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७० मध्ये झाला.
६) सकवारबाई – सकवारबाई या शिवरायांच्या सहाव्यापत्नी असुन त्या गायकवाड घराण्यातील होत्या. …
७/११
…शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड हे त्यांचे बंधु होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६५७ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले. त्यांचा मृत्यु १७०७ मध्ये झाला.
८/११
७) काशीबाई – काशीबाई या शिवरायांच्या सातव्या पत्नी असुन त्या सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील होत्या. जिजाऊंचे बंधु अचलोजी जाधवराव हे त्यांचे आजोबा तर संताजी जाधवराव हे त्यांचे वडील होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला. …
९/११
…त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु १६७४ मध्ये झाला.
८) गुणवंताबाई – गुणवंताबाई या शिवरायांच्या आठव्यापत्नी असुन त्या विदर्भातील चिखलीच्या इंगळेघराण्यातील होत्या. सरदार शिवाजीराव इंगळे हे त्यांचे वडील होते. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७मध्ये झाला. …
१०/११
…त्या निपुत्रीक असून त्यांचा मृत्यू १६७० मध्ये झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सगळीकडे जणू स्वराज्याचे नवचैतन्य सळसळू लागले. पण म्हणतात ना चांगल्या गोष्टीला देखील…
१/१५
…विरोधक असतात, त्याप्रमाणे अनेक वतनदारांचा शिवरायांच्या स्वराज्याला विरोध होता. या साऱ्या मंडळीनां शिवरायांनी स्वराज्याचे महत्व सांगितले. अनेक जण स्वराज्यात सामील झाले. तर अनेक जणांनी आपला विरोध कायम ठेवला.
यापैकी एक होते जावळीचे मोरे घराणे जे आदिलशाही दरबारी सरदार होते.
२/१५
“तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, जर उदईक येत असाल तर आजच या!” जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी शिवाजी महाराजांना डिवचले.
पद्मभूषण रावबहाद्दूर रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची आज ६२ वी पुण्यतिथी, त्या निमीत्त त्यांना सादर वंदन🙏
त्यांचा मृत्यू नंतर आज ६२ वर्ष झाली तरी त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक लिहिलेल्या मराठी रियासत व मुसलमान रियासत, ब्रिटिश रियासत व पेशवे दफ्तर…
१/५
…ह्या त्यांचा महत्त्वपूर्ण पुस्तकांनां भरपुर मागणी आहे. त्यांचा इतके कष्ट करुन लोकाभिमुख मांडणी इतर कोणीही इतक्या मोठ्या प्रमाणात केली नसेल.
त्यांनी काही हजार कागदपत्रे तपासली ज्यात मोडी, फारसी, गुजराथी, इंग्रजी भाषेतील मजकुर अभ्यासला.
२/५
त्यांच्या बरोबर कै. त्र्यंबक शंकर शेजवलकर ह्यांनी देखील काम केले आहे. त्यांचे निकटवर्तीय मित्र थोर इतिहासकार कै. जदुनाथ सरकार ह्यांनी रियासतकारांबद्द्ल काढलेले गौरवोद्गार - "The greatest living historian of Marathas "
बाळाजी बाजीरावानें सदाशिवरावभाऊची पानिपतसाठी जी निवड केली ती यथायोग्य होती. कारण, सदाशिवरावभाऊ असा उत्तम मुत्सद्दी म्हणून नांवाजला गेला होता तसा लढवय्या सरदार म्हणूनहि त्याचा चांगला लौकिक होता.
१७४७ त सदाशिवरावभाऊने बहादूर मेंड्याची स्वारी केली (का. पत्रे, यादी ६८). १७५० त यमाची शिवदेवाचें बंड त्याने स्वतः जाऊन मोडिले -१७५१ च्या मार्चात बाळाजीने सलाबताला तुंगभद्रेवर अडविलें त्या वेळी भाऊ त्याच्या बरोबर होता.
२/८
१७५१ च्या नोव्हेंबरांत सलाबत बुसीला घेऊन कोरेगांवास आला तेव्हा भाऊ लढाईत हजर होता. १७५२ च्या डिसेंबरातं भालकीची लढाई झाली तींत तो होता.
१७५३ च्या जानेवारींत श्रीरंगपट्टणची स्वारी झाली. तींतही भाऊ व रामचंद्रबाबा शेणवई हे दोघे होते.
चौपाटी रोडवर नाकाबंदी करत असतानाच तेथे एक संशयास्पद वाटणारी गाडी थांबली. दोन पोलीस लाठी घेऊन गाडीकडे गेले असता, त्यांना दोन अतिरेकी दिसले, इस्माईल नामक एका अतिरेक्यास जागीच ठार मारण्यात आले. दुसरा अतिरेकी अजमल कसाब जखमी अवस्थेत दिसला.
कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली, त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण ...
२/४
त्या दरम्यान ओंबळेंच्या शरीरात २० गोळ्या गेल्या होत्या, ते बेशुद्ध पडेपर्यंत बंदुकीसमोर होते, त्यामुळे बाकीच्या पोलिसांनी कसाबला जागेवर थोड्या झटापटीनंतर पकडले.
तुकाराम ओंबळ्यामुळे मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब पकडला गेला, पण ...
बांधवानो आपण हे असले प्रकार आणखी किती पाहायचेत याला आता थांबवने खुप महत्वाचे आहे. आज गरज आहे सर्वांनी सहभागी होवून मोठी मोहिम उभारायची. आपण पाहतो की उदा. शिवाजी हायस्कूल, शिवाजी चौक, शिवाजी महाविद्यालय यासर्वांना ...
१/४
‘छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल’, ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय’ करायला लावा तरच बाकी शक्य आहे आजही परिस्थिती अशीच आहे चौक ,शाळा व महाविद्यालयवाले महाराजांचा एकेरी नामोच्चार करतांना सर्रास आढळतात !
२/४
जरा आपल्या सभोवतालच्या परिसरात बघा आपल्याला स्पष्ट जाणवेल या करिता सर्व जिल्यात जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी शाळा महाविद्यालय चे मुख्याध्यापक यांना निवेदन देवून या गंभीर बाबी कडे लक्ष केंद्रित करायला लावा.
महाराजांच्या स्वराज्यात महाराजांचा नामोच्चार अदबिने झालाच पाहिजे !!
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर दीडच महिन्यात (२१ एप्रिल १७००) सातारचा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर पुढच्या दीडच महिन्यात (९ जून १७००) परळीचा किल्लाही मराठ्यांच्या हातून मोगलांच्या हाती गेला.
यानंतर औरंगजेबाची कल्पना अशी की, राजाराम महाराजांच्या ‘असाहाय्य स्त्रिया आणि अज्ञान मुले’ यांना शरण आणायला कितीसा वेळ लागणार?
परंतु त्याच्या दुर्दैवाने आणि महाराष्ट्राच्या सुदैवाने त्यावेळी दक्षिणेच्या राजकीय नभोमंडळात एक अत्यंत दीप्तिमान तारा उदय पावत होता.
२/१०
या ताऱ्याच्या प्रकाशाने पुढे अल्पावकाशातच महाराष्ट्राचे मरगळलेले राजकारण पुन्हा उजळून निघाले. विभागून पडलेल्या शक्ती संघटित होत गेल्या. वीरवृत्तींना संजीवनी मिळाली आणि निराशेच्या राखेतून नव्या पराक्रमाचे स्पुरण फुलू लागले.