सकाळी सातची वेळ, शांताराम अण्णांना जोरात प्रेशर आलं होतं पण घरात मुलाची,नातवाची आवरायची लगबग होती. खरंच होतं ते. डोंबिवलीतला वन बीएचकेचा ब्लॉक, तो सुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला.
अण्णा करीरोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते.रोज सकाळी साडेसहाला घर सोडायचे.
ओव्हरटाईमकरुन रात्री उशिरापर्यंत घरी यायचे.
आताशा दोन महिने झालेले, अण्णांना रिटायर्ड होऊन. पहिली पहिली ही हक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना. थोडे दिवस गावी जाऊन आले पण तिथेही थोरला भाऊ नोटांची पुडकी मागू लागला. पहिल्यासारखं आदराने बोलेनासा झाला.
शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नीसोबत माघारी आले. घरी आल्यावर मयंकच्या (मुलाच्या) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच,"रहाणार होतात ना,इतक्या लवकर कसे परतलात?" काही वाक्यं चेहऱ्यावर वाचता येतात. त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते आणि अशी वाक्यं आपल्या पोटच्या
मुलाच्या चेहऱ्यावर पेरलेली पाहणे याहून क्लेशदायी काही नाही.
"आणायची कोठून प्रत्येकाला द्यायला नोटांची पुडकी? अरे मी काय टाकसाळीत होतो का?" अण्णा स्वतःशीच बोलले व कुशीवर वळून निजले पण त्यांना आत्ता थोपवेना. ते गेलेच तडक टॉयलेटमध्ये. इकडे मयंकलाही प्रेशर आलं.
अण्णा दहा मिनट झाली तरी बाहेर पडेनात. मयंक तिथल्या तिथे येरझाऱ्या घालून दमला. टॉयलेटचं दार ठोकवू लागला.
शेवटी एकदाचे अण्णा बाहेर आले. आताशा अर्ध्या अधिक दंताजींचे ठाणे उठल्याने अण्णांना अन्न नीट पचत नव्हते. त्यामुळे त्यांना नीट मोशन होत नव्हते. बराच वेळ बसून रहावे लागे.
त्यांचे पायही वळून येत. अण्णा बाहेर येताच मयंक आत पळाला. पोट मोकळं करुन बाहेर आला व पेपर वाचायला घेणार तर अण्णा पेपर वाचत बसलेले. मयंकला रागच आला. मयंक अण्णांच्या अंगावर खेकसलाच,"काय हे अण्णा सकाळीसकाळी कशाला उठता? टॉयलेट अडवून ठेवता. आत्ता पेपर घेऊन बसलात.
मी ऑफिसला गेल्यावर करा की तुमची कामं निवांत. माझ्या वेळेचा कशाला खोळंबा करता? आत्ता माझी आठ चौदाची डोंबिवली लोकल चुकली. पुढच्या गाड्यांत पाय ठेवायलाही जागा नसते. तुम्हाला कसं समजत नाही."
"हो रे बाळा, मी कुठे ऑफिसला गेलोच नाही कधी. मला कसं कळणार? "
"काय ती तुमची नोकरी अण्णा. कुठेतरी चांगले नोकरीला असला असतात तर आत्ता रिटायरमेंटनंतर भरघोस पेंशन मिळाली असती. पीएफ,ग्रेज्युइटी मिळाली असता. टुबीएचके घेता आला असतं आपल्याला. टॉयलेटचा असा प्रॉब्लेम आला नसता. माझ्या मित्राचे बाबा बघा गेल्यावर्षी रिटायर्ड झालेत.
त्यांनी लेकाला टुबीएचके घेऊन दिला. शिवाय कर्जतला फार्महाऊज घेतलंय,एक होंडा सिटी घेतली. बढाया मारत होता लेकाचा. अण्णा तुम्ही काय केलंत हो माझ्यासाठी?"
अण्णांचे डोळे पाण्याने डबडबले. मोठ्या कष्टाने त्यांनी आसवांना बांध घातला व हॉलच्या खिडकीशेजारी असणाऱ्या त्यांच्या पलंगावर जाऊन
खिडकीत पहात बसले. त्यांना तसं पाहून आभाळही भरुन आलं. मधुराने(सुनेनं)चहा आणून दिला. तो कसातरी गळ्याखाली उतरवला त्यांनी.
अण्णांची सौ, लताई देवळातून आली. लताई रोज पहाटे स्नान उरकून महालक्ष्मीच्या देवळात जायची. देवीला स्नान घालणं,साडीचोळी नेसवणं,आरती करणं हे सारं ती
भक्तीभावाने करायची. अण्णा रिटायर्ड झाले म्हणून तिने तिच्या नित्यक्रमात बदल केला नव्हता. घरी आल्यावर अण्णांचा मुड पाहताच तिच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय. अण्णांनी लताईकडे आपलं मन मोकळं केलं तेंव्हा नकळत त्यांच्या डोळ्यातून दोन मोती ठिबकले ते पाहून मधुराला गलबलून आलं.
मधुराला वडील नव्हते पण सासरी आल्यापासून अण्णांनी तिची ही पोकळी त्यांच्या वात्सल्याने भरुन काढली होती.
संध्याकाळी मधुरा,मयंक व छोटा आर्य फिरायला गेले. मयंक आर्यसोबत फुटबॉल खेळला. आर्य मग मातीत खेळू लागला तसा मयंक मधुराशेजारी येऊन बसला. मधुराने मयंकजवळ सकाळचा विषय काढला.
ती म्हणाली,"मयंक, तू लग्न झालं तेंव्हा मला अण्णांबद्दल किती चांगल सांगितल होतस. अण्णा स्वतः जुने कपडे वापरायचे पण तुझ्या साऱ्या हौशी पुरवायचे. तुला खेळण्यातल्या गाड्या फार आवडायच्या. अण्णा तुला दर महिन्याला नवीन गाडी आणून द्यायचे. पुढे तुला वाचनाचा छंद लागला,तेंव्हा अण्णांनीच
तुला चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं त्यांच्या तुटपुंज्या पगारातून आणून दिली. तुला हवं त्या शाखेत प्रवेश घ्यायची मोकळीक दिली. तुला अकाऊंट्ससाठी क्लास लावावा लागला नाही. अण्णांनीच तुला शिकवलं पण आज तू 'अण्णा, तुम्ही माझ्यासाठी काय केलंत?'
या एका प्रश्नाने चांगलेच पांग फेडलेस त्यांचे. मयंक,अरे तुला वडील आहेत तर तुला त्यांची किंमत नाही रे. आपल्या आयुष्यात वडिलांची किंमत काय असते ते माझ्यासारखीला विचार जिला आपले वडील नीटसे आठवतही नाहीत."
आर्य मम्मीपप्पांजवळ कधी येवून बसला त्यांना कळलंच नाही.
आर्य म्हणाला,"खलच पप्पा तुम्ही फाल वाईट्ट वादलात आजोबांशी. आजोबा ललत होते. आजीने गप्प केलं त्यांना. आजोबा दुपाली जेवलेपन नाही."
मयंकला अगदी भरुन आलं. त्याला त्याची चूक कळली. घरी परतताना तो लायब्ररीत गेला व अण्णांची वार्षिक मेंबरशिप फी भरली. तसंच मधुराला म्हणाला,"आपला बाथरुम
मोठा आहे त्यात आपण एक कमोड बसवून घेऊया, अण्णांसाठी आणि थोड्या वर्षांत जरा मोठं घर बघूया. मी अण्णांशी नीट बोलेन. माझं असं कधी परत चुकलं तर अशीच मला माझी चूक वेळोवेळी दाखवत जा."
घरी गेल्यावर मयंक अण्णांबरोबर चेस खेळायला बसला. मधुराने त्यांच्या आवडीचा मसालेभात व मठ्ठा केला.
चेस खेळता खेळता मयंकने अण्णांचा हात हलकेच दाबला व त्यांना सॉरी म्हणाला.
आर्य तिथेच त्यांचा खेळ बघत बसलेला. तो आजोबांच्या गळ्यत हात टाकून म्हणाला,"बाबा,यू आल आलवेज वेलकम." अण्णांचे डोळे पुन्हा भरुन आले पण आत्ताचे अश्रू सकाळच्या अश्रूंपेक्षा वेगळे होते. हे तर आनंदाश्रू होते.
एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की, "we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still color the same"
किती सुंदर वाक्य आहे नाही! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेलो असतो.
पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे तो का नष्ट होऊ द्यायचा? ज्या क्षमता आहेत त्या का लयास जाऊ द्यायच्या? तसेच रंगाचे खडूदेखिल कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही!
तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो... अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!
"जिंदगी एक बार मिलती है"
"बिल्कुल गलत है!"
सिर्फ मौत एक बार मिलती है!
जिंदगी हर रोज मिलती है !!
बस जीना आना चाहिए!!🌳🙏
तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का ? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते....
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं...
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
अंधारात तुम्ही कधी पाय अडखळुन पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात....
एका बाजारात तितर पक्षी विकणारा बसला होता.
त्याच्याकडे मोठ्या जाळीच्या टोपलीत बरेच तितर पक्षी होते ..!
आणि एका छोट्या जाळीच्या टोपलीत फक्त एकच तितर पक्षी होता ..!
एका ग्राहकाने विचारले एक तितर पक्षी कितीचा आहे ..?
"५० रुपयाला ..!"
ग्राहकाने छोट्या जाळीत असलेल्या तितर पक्षीची किंमत विचारली.
पक्षी विकणारा म्हणाला,
"मला ह्याला विकायचं नाही ..!
"पण तू आग्रह धरत असशील तर मी ५०० रुपये लावीन ..! "
ग्राहकाने आश्चर्याने विचारले,
ह्या तितर पक्षीचा भाव इतका कसा काय ..?
पक्षी विकणारा म्हणाला "खरंतर हा माझा स्वतःचा पाळीव पक्षी आहे आणि तो इतर तितर पक्ष्यांना अडकावण्याच काम करतो .."
जेव्हा तो जोरात ओरडतो, आणि इतर पक्ष्यांना स्वतः कडे बोलावतो, आणि इतर तितर पक्षी विचार न करता एकाच ठिकाणी जमतात, तेव्हा मी त्या सर्वांची सहजपणे शिकार करतो,
🙏🏻 कुटुंबप्रमुख
एक नामशेष होणारा घटक
सकाळी लवकर उठणारे,
रात्री वेळेवर झोपणारे,
पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे,
फुलं देवासाठी तोडणारे,
रोज पूजा करणारे,
मंदिरात एखादी फेरी मारणारे,
रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे,
दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे,
अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे आणि उरले तर गरीबाला देणारे किंवा दुसरे दिवशी त्याला फोडणी देऊन खाणारे,
स्वतःची गैरसोय असूनही नातलग, पाहुण्यांसाठी पाहुणचार करणारे,
आपले सण धांगडधिंगा न करता साधेपणे साजरे करणारे,
व्यसन करताना लाजणारे आणि
समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे,
जुना झालेला चष्मा तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे,
उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे,
फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे,
आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं, "ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?"
"होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं.
"गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल."
"अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?"
"ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल."
"ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?"
"मिरजलाच घेऊन जावी लागेल."
त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली.
आपल्या सगळ्यानकडे अशी एक तरी मित्र / मैत्रीण असतेच.....बघा वाचल्यावर त्यांची आठवण येते का ते...
|| मैत्र ||
तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
सुरुवात कधी झाली, पुढाकार कोणी घेतला
दिवस कोणता – तारीख काय? किती वर्ष झाली?
हे तपशील म्हटलं तर सार्थ आहेत
पण म्हटलं तर व्यर्थ आहेत, कारण....
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
रोज भेटतो - असही नाही,
रोज फोन करतो - तर तसही नाही
एकमेकांकडे सारखे जातो येतो - असं तर नाहीच नाही
तरी पण स्नेहाचा बंध घट्ट आहे कारण...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
चौऱ्यांशी लक्ष योनी हिंडून झाल्यावर
माणूस जन्म मिळाला म्हणे !
मागचा जन्म आठवत नाही, अन पुढचा दिसत नाही
पण खरं सांगू या जन्मात तुझ्याशिवाय करमत नाही कारण ...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं.
लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.
वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?
सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.
सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.
निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा?
त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच..त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच,
त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल
तरच संसारात पाऊल टाकावं.