नमस्कार विद्यार्थी व पालक हो,
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत. #SSCexams#HSCexams@msbshse@CMOMaharashtra@MahaDGIPR
इ.१२वी लेखीपरीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर,इ.१०वी लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने(ऑफलाईन) होतील.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे.उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.
प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी,दहावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ याकालावधीत पार पडेल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल.
दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या (१०वी) परीक्षांचा तपशील खालीलप्रमाणे:#exams#class10#Class12
इ.१२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. @scertmaha@CMOMaharashtra@bb_thorat@AjitPawarSpeaks@MahaDGIPR
विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Dear students & parents,
Based on feedback & consultations with diverse stakeholders,we're hereby announcing the examination schedule for Higher Secondary School Certificate (HSC) & the Secondary School Certificate (SSC) board exams. #Exams@msbshse@CMOMaharashtra@MahaDGIPR
Written exams of Std 12th (HSC) will be held offline from March 4,2022 to April 07,2022, & those of Std 10th (SSC) will be held offline from March 15, 2022 to April 18, 2022. Due to COVID-19,the curriculum was earlier cut by 25%.Questions will only be from this reduced syllabus
Practicals,grade/orals & internal assessment(as per established protocol) for HSC & SSC will be held from Feb 14-March 3,2022, & February 25-March 14, 2022, respectively.The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will release a detailed exam timetable.
For the safety of the staff & students, vaccination has been made mandatory for teachers/staff. Only fully vaccinated staff will be allowed in premises. School transport operators also must be fully vaccinated. #SafeSchools#VaccineMandate
Schools in areas where coronavirus cases are under control can restart physical classes for Std 5-12th in rural areas & 8-12th in urban areas from Aug 17. Safe resumption of schools is being considered to ensure all students have equal access to education amidst the pandemic.
Municipal commissioners in Mumbai, Thane and Collectors of the 11 districts where restrictions still continue as per #BreakTheChain guidelines dated 2nd August, have been empowered to assess risk locally and decide on school reopening in their jurisdiction. #BacktoSchool#COVID
Consent of parents is paramount to us, 81% parents said in @scertmaha survey they want schools to reopen so on July 15, 8-12th Std. classes were started in corona free villages. Parents will have final say on physical presence of their wards, attendance norms have been relaxed.
📢 Important Update: For uniformity & comparability in #FYJC admissions and to ensure fair play for students across all boards, the state government will conduct a CET for all Std 10th students on an OPTIONAL basis around July-end or August first week #CET#SSC#admissions#fyjc
While the online link to apply for this entrance test & the list of exam centres will be available post the declaration of SSC board results around July 15, the details about the likely timing & the exam format are being shared to help aspirants prepare better for the test.
The CET (entirely optional) will be based on the Std.10th state board curriculum. It will be held offline in the MCQ format for 100 marks, & for a 2-hour duration. Equal weightage out of 100 marks will be for questions from the subjects of Eng, Maths, Science & Social Sciences.
इ.१० वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इ.११वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल.
ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी खालील माहिती जाहीर करण्यात आली आहे. #CET#SSC#admissions#FYJC
CET राज्य मंडळाच्या इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने २ तासांची परीक्षा घेण्यात येईल.यात इंग्रजी,गणित,विज्ञान,सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील.परीक्षा offline घेण्यात येईल.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 'ज्ञानगंगा' ह्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० वा. या कालावधीत वाहिनीवरील काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता दर दिवशी ५ तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. @scertmaha@vgarad #BacktoSchool
सदर कार्यक्रमाचे वेळापत्रक maa.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल. शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक पाहण्यासाठी परिपत्रकात दिलेला QR कोड स्कॅन करा अथवा त्याठिकाणी क्लिक करून संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल. #BacktoSchool @scertmaha