*फुंकर*.. किती सुंदर अर्थवाही शब्द.. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यापुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अर्धोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता आणि अस्फुट ऐकूही येतो, फू ऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्वास.*
(१)
*फुंकर.. एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळूवार भावनाविष्कार.*
*फुंकर*
धनी निघाले शेतावरती
बांधून देण्या भाजी भाकर
चुलीत सारून चार लाकडे
*निखार्यावर घाली फुंकर।*
"जीवन असंच जगायचं असतं"
जे घडेल ते सहन करायचं असतं,
बदलत्या जगाबरोबर रहायचं असतं,
"जीवन असंच जगायचं असतं"
कुठून सुरू झालं हे माहीत नसलं,
तरी कुठे थांबायचं हे ठरवायचं असतं,
"जीवन असंच जगायचं असतं"
कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं,
(१)
स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं,
"जीवन असंच जगायचं असतं"
दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं, असतं,
हसता आलं नाही तरी हसावयचं असतं,
"जीवन असंच जगायचं असतं"
पंखा मध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,
(२)
"जीवन असंच जगायचं असतं"
मरणाने समोर येऊन जीव मागितला तरी,
मागुन मागुन काय मागितलंस असं म्हणायचं असतं,
"जीवन असंच जगायचं असतं"
इच्छा असो वा नसो जन्मभर सुखी राहुन,
जग सोडताना मात्र समाधानाने जायचं असतं,
"जीवन असंच जगायचं असतं"
(३)
शुभ रात्री..
🙏🙏
'सकाळी अंगणातला पारिजात,
फुलांचा सडा टाकून मोकळा होतो
रिते होण्यातले समृद्धपण,
तो किती सहजपणाने दाखवतो'
(२)
कुणाची आहे माहित नाही पण भावली मनाला..
'प्राजक्त सडा टाकून मोकळा झाला'.
त्याचा भार हलका झाला. अर्थात....फुलंच ती....इलुशी...नाजुक....त्यांचा भार तो कितीसा असणार ! आणि काहीही झालं तरी 'सृजनाचा' कुठे कधी भार होत असतो का ? 'हलका झाला'... पण म्हणून पोकळी नाही निर्माण झाली.
(३)
गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचीच प्रिय देवता आहे.. श्री गणेशास अथर्वशीर्षाचे आवर्तन करून अभिषेक करण्यात येतो. येत्या मंगळवारी चतुर्थी आहे. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला "अंगारकी चतुर्थी" असे म्हटले जाते. त्यानिमित्त अथर्वशीर्षाचे महत्त्व सांगणारा हा एक लेख प्रपंच..
*अथर्वशीर्ष म्हणजे कांय...?*
*अथर्वशीर्ष*
थर्व म्हणजे हलणारे आणि
अथर्व म्हणजे ' न हलणारे
शीर्षम् ' !!
सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे
अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी
असलेलं मस्तक...!!
अथर्वशीर्षाचं पठण केलं, की
बुद्धी आणि मन स्थिर होतं, अशी
गणेश उपासकांची श्रद्धा असते.
स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं
कांम हे नेहमी यशस्वी होतं.
आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस
नम्र होतो. असा माणूस मग
अडचणींमध्येही संधी शोधू
लागतो, अशी गणेश उपासकांची
श्रद्धा असते.
(२)
स्वर्गाच्या महाद्वारा जवळ आज पहाटे साक्षात शिवप्रभू शिवराय स्वतः उभे होते!
सूर्योदय ही अजून झाला नव्हता, महाराज आज आनंदी होते आणि किंचित दु:खी ही!
त्यांचा अत्यंत आवडता मावळा, जिवा शिवाशी मीलन झाले असा जिवाचा जीवलग आज स्वर्गारोहण करीत होता
(१)
कुंकम रांगोळ्यांचे सडे त्यांच्या स्वागतासाठी घातले गेले होते. आयुष्यभर फक्त एकच नाम घेऊन जिवाचा शिव झालेला, महारांजाच्या नावाने उभ्या जगतामधे हलकल्लोळ करणारा वीर होता शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य बळवंत मोरेश्वर पुरंदरे!
स्वर्गाच्या महाद्वारात तुतार्या वाजल्या
(२)
सनई चोघड्यांच्या मंगल स्वरात महाराजांनी स्वतः बाबासाहेबांचे स्वागत केले! बाबा! काय घाई मला भेटण्याची? तुमची गरज होती पृथ्वीतलावर! रहायचं की अजून काही दिवस!
महाराज, गेली ऐंशी वर्षे फक्त तुमचे गुणगान केले, तुमचाच ध्यास घेतला, इतके पोवाडे लिहिले
(३)