मला नेहमी प्रश्न पडायचा की शूद्र म्हणून छळला गेलेला समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षापर्यंत निमूटपणे अन्याय आणि अत्याचार का म्हणून सहन करत जगत होता.. या प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ' दलित साहित्य आणि सौंदर्य ' या पुस्तकात मिळाले 👇
पृष्ठ क्र. २१२ व २१३ वर ) तिथं ते म्हणतात
" ही व्यवस्था ईश्वराने निर्माण केली आहे. हा जन्म पूर्व जन्मी केलेल्या पापांमुळे प्राप्त झालेला आहे. यातून मुक्ती मिळवायची असेल, या जन्मी सत्कर्म करून पुण्य मिळवणे हा एकच मार्ग आहे. अन्यथा नरकात जावे लागेल. " अशा दैवी धमकीमुळे 👇
दलितांच्या हजारो पिढ्या निमूटपणे हीन आणि लाचार होऊन जगल्या. त्यानी ' आपला हा भोगवाटा आहे, हे आपलं नशीब आहे. ते आपल्याला बदलता येणार नाही कारण तशी ईश्वर इच्छा आहे. ' अशी समजूत करून घेऊन दलितांनी परंपराशरणवृत्ती स्वीकारल्याचे दिसते. ' आपला जन्म हा ईश्वराच्या हाती आहे आणि त्यानीच 👇
आपले भाग्य लिहिले असल्याने हा छळ , हा अपमान आपल्या वीधीलीखीताचा भाग आहे, याविषयी तक्रार कोणाकडे करायची. असा विचार करून दलितांनी गुलामीला आपलं जीवन मानलं.
" देव आणि दैवा विरुद्ध त्यांनी कधीच बंड केले नाही. "
भयंकर नीच प्रवृत्तीने चक्रव्यूह रचला गेला होता ज्यात हजारो 👇
दलित ( म्हणवल्या ) गेलेल्या लोकांच्या पिढ्या अभिमन्यू केल्या गेल्या...
जो पर्यंत तो चक्रव्यूह तोडणारा , फोडणारा आणि मुळासकट उपटून टाकणारा आमचा बाप म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला नाही आला..🙏 #चेतन_शब्दयोगी
आमच्या ओळखीत एक २२ वर्षाची मुलगी आहे.. तिचे लग्न झाले. आई वडिलांनी mediclaim policy काढली.. तिचे दुर्दैव तिच्या लग्नाच्या चारच दिवसांत दोन्ही किडन्या निकामी झाल्या.. claim करायला गेलो तर पॉलिसी उतरावनाऱ्या कंपनीने.. तिला काही आधीच आजार होता का ? घरच्यांची 👇
तशी काही मेडिकल हिस्टरी आहे का.? सगळं म्हणून सगळं तपासलं.. जेव्हा त्यांना काहीही लपवले नाही किंवा खोटे नाही याची खात्री पटली तेव्हा त्यांनी रक्कम मंजूर केली..
सांगतो यासाठी एक धडधाकट कोंबडीचे पिल्लू बेल मिळाली नाही म्हणून कोर्टाच्या आदेशानंतर बऱ्याच दिवसांनी शरण आले 👇
पण लगेच तब्बेत खालवली म्हणून दवाखान्यात admit सुद्धा झाले.. आता तर गंभीर आजारी पडून icu मध्ये हलवण्यात आलं आहे..
अरे कायद्याचा काय खेळ लावला आहे का यांनी ? कोर्टाकडे अशी यंत्रणा नाही का जी आरोपीला खरंच तपासून तो आरोपी आजारी पडण्याचे नाटक तर करत नाही ना ? पोलिस कोठडी टाळण्यासाठी.
#ओळख_चित्रपटांची
चित्रपट - जय भिम
लेखन व दिग्दर्शन - T.J.Gnanavel
संपूर्ण चित्रपट पाहिला.. शोषित वर्गावर होणारा अन्याय पाहिला.. त्या लोकांच्या न्यायासाठी लढणारा ( ते ही विना मोबदला ) नायक पाहिला... त्याचा काळा कोट पाहीला.. 👇
त्याच्या डोळ्यावरच्या गोल चष्मा पाहिला... शोषित वर्गासाठी लढण्याची त्याची तळमळ आणि चळवळ पाहिली.. त्याचा संघर्ष पाहीला.. त्याचा प्रस्थापित व्यवस्थेशी दिलेला लढा पाहिला.. आणि जो शब्द एकदाही उच्चारला नाही तो शब्द या चित्रपटाचे 👇
संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे #जय_भिम..
अन्याया विरुद्धचा आवाज म्हणजे #जय_भिम..
संघटना अन चळवळ म्हणजे #जय_भिम..
एका मस्तकाची दुसऱ्या मस्तकाला साद म्हणजे #जय_भिम.. 👇
आजचा चित्रपट :- Gangs Of वासेपूर ( 1 & 2 )
दिग्दर्शक :- अनुराग कश्यप
आधुनिक यूगातला शोले म्हंटलं तर वावगं ठरनार नाही..असा 2012 साली प्रदर्शित झालेला तसंच अनुराग कश्यप दिग्दर्शित Gangs Of वासेपूर.
तुमच्या कडं बजेट कितीही कमी असु द्या पण कथा
सरदार खान 👇
आणि पटकथा जर उत्तम असेल तर तुम्ही सोन्यासारखा चित्रपट बनवू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे GOW.
हा चित्रपट प्रत्येक अंगानी अभ्यास करायला ठेवावा आणि चित्रपट कसा बनवला पाहीजे हे शिकवणारा असा बनवला गेला आहे.
फैजल खान👇
हा चित्रपट हिंदी चित्रपटातील नेहमीचा फोर्मूला म्हणज्र वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणारा त्याचा मुलगा ( सरदार खान ) आणि त्या दोघांच्या खुनाचा बदला घेणारा त्यांचा वंशज म्हणजे फैजल खान.. यांच्या बदल्याची कथा आणि त्यातून
खरं तर चित्रपट समीक्षा लिहिण्यास सुरुवात करावी असा एकमेव चित्रपट आहे. म्हणून हा पहिला.
खदखद काय असते आणि तिला व्यक्त कशी करायची असते. अख्खं जग विरोधात समोर उभं असताना पण त्यांना पाठ न दाखवता निधड्या छतीनं सामोरं जाऊन चार वार झेलायचे कसे आणि
👇
आठ वार करायचे कसे. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ' Fandry '.
मला 100% खात्री आहे, कि या जगात कोणीच, या चित्रपटाला शब्दांत व्यक्त करून न्याय देऊ शकत नाही. त्याला वेगळं सांगायची गरजच नाही. तो स्वयंपूर्ण आहे.
👇
' जे वर्षानुवर्ष, पिढ्यान पिढ्या दलदलीत ते दलित.' ज्यांना माणसाचं समसमान असण्याचं तत्वच नाकारलं गेलं आहे. ज्यांना तुम्ही स्पर्धा सुरू होण्याआधीच नालायक म्हंटलं गेलं आहे. ज्यांना तुम्ही स्पर्धेत उतरवन्याच्या आधीच ( कर्ण ) तुम्ही शूद्र किंवा कमी दर्जाचे आहात हे शतकोनी शतक
👇
मला जवळ जवळ कायमच एकटं (Alone) राहायला आवडतं. मला माझी सोबत जगात इतर कोणाही पेक्षा जास्त आवडते. मीच अशी ती व्यक्ती आहे जिच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम करतो, जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तसंच जिची सर्वात जास्त काळजी घेतो. @Archanagsanap2 @Rupachi_Rani
👇
मी बर्याचदा अनेकांना एकटं राहायला जगायला घाबरलेलं पाहिलं आहे. मी याच्या शिवाय जगू शकत नाही त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं आपण म्हणतो पण तसं खरंच नसतं त्याचा एवढाच साधा अर्थ असतो की मी आमूक आमूक व्यक्ती सोबत थोडा जास्त आनंदी जगेल. बस्स. यापेक्षा आधिक त्यात काहीही अर्थ नसतो.
👇
नुकतीच मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून रक्त ओकल्यासारखे शब्द लिहिलेली ' आघात ' नावाची कादंबरी वाचून संपवली..
अण्णाभाऊंच्या लेखनी म्हणजे तळपती तलवार जणू.. अशी कोणतीही भावना, विचार किंवा गोष्ट नाही जी ते तीला आपल्या लेखणीने योग्य न्याय नाही देऊ शकत..
👇
झोपडित राहणाऱ्या पण परिस्थितीशी झगडनाऱ्या लोकांचे जीवन चित्रित करणारी " आघात " ही कादंबरी, अण्णाभाऊंना कशी सुचली असेल हा प्रश्न पडत नाही.. कारण स्वताहा अण्णाभाऊ अशाच झोपडिवजा भागात लहानाचे मोठे झाले.. गरीबी, कष्ट, दारू, रोगराई, भांडण, संघर्ष, शिव्यागाळ्या हे
👇
सर्वच त्यांच्या पाचवीला पुजलेलं..
माणूसच वाईट नसतो, वाईट परिस्थिती देखील माणसाला वाईट वागण्यासाठी प्रव्रूत्त करते..आणि असं वाईट वागणं आहे ती परिस्थिती आणखी वाईट बनवते.. ह्या चक्रात माणूस कसा भरडला जातो.. तसंच माणसाच्या आयुष्यात किती संघर्ष असावा याची देखील परसीमा असावी
👇