आजचा चित्रपट :- Gangs Of वासेपूर ( 1 & 2 )
दिग्दर्शक :- अनुराग कश्यप
आधुनिक यूगातला शोले म्हंटलं तर वावगं ठरनार नाही..असा 2012 साली प्रदर्शित झालेला तसंच अनुराग कश्यप दिग्दर्शित Gangs Of वासेपूर.
तुमच्या कडं बजेट कितीही कमी असु द्या पण कथा
सरदार खान 👇
आणि पटकथा जर उत्तम असेल तर तुम्ही सोन्यासारखा चित्रपट बनवू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे GOW.
हा चित्रपट प्रत्येक अंगानी अभ्यास करायला ठेवावा आणि चित्रपट कसा बनवला पाहीजे हे शिकवणारा असा बनवला गेला आहे.
फैजल खान👇
हा चित्रपट हिंदी चित्रपटातील नेहमीचा फोर्मूला म्हणज्र वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणारा त्याचा मुलगा ( सरदार खान ) आणि त्या दोघांच्या खुनाचा बदला घेणारा त्यांचा वंशज म्हणजे फैजल खान.. यांच्या बदल्याची कथा आणि त्यातून
नगमा खातून 👇
शेवटी झालेली दोन्ही कुटुंबाची व्यथा म्हणजेच Gangs Of वसेपूर.
तीन पिढ्या आणि त्यांची ससेहोलपट ते सुद्धा बदल्याच्या आगीत जळणं काय असतं.. याचं उत्तम चित्रण केलं आहे यांत.
दुर्गा 👇
ह्या चित्रपटाची कथा जैषन कादरी या नवयूवकाने ज्याने या चित्रपटात डेफिनेट नावाच्या पात्राची सुद्धा भूमिका केलेली आहे.. त्यानें लिहिली आहे.. ही कथा पूर्ण पणे ( काही बदल करून ) सत्य कथेवर आधारित आहे..
डेफिनेट 👇
या चित्रपटाच्या अनेक उजव्या बाजू पैकी यातील पात्रांचा अभिनय खूपच जबरदस्त होता..
या चित्रपटातील प्रत्येक कलाकार या चित्रपटा नंतर त्याच्या अभिनय जीवनात खूपच यशस्वी झाला.. त्यांचे दिवस फिरले असं म्हंटलं तर अतीशोयक्ती होणार नाही.. मंग तो नवाज असो.. पंकज त्रिपाठी
सुलतान कुरेशी 👇
असो.. राजकुमार राव.. मनोज वाजपेयी.. रिचा चढ्ढा.. जयदीप अहलावत.. एक ना अनेक कलाकाराचे जीवनच बदलून गेलं...
या चित्रपटाचे संगीत स्नेहा खानविलकर या स्त्री संगितकारने दिलं होतं.. पूर्ण पणे बिहारी बाजाचे लोकसंगित दिलं होतं..
शाहीद खान 👇
त्यात.. O वुमनीया.. काला रे.. हंटर.. दिल छि छा लेदर.. बिहार के लाला.. तार बिजली से पतले ..एक ना अनेक जबरदस्त गाणी संगीत बद्ध केली गेली होती.. गायक सुद्धा लोक संगीत गाणारेच घेतले होते..
रामाधीर सिंघ 👇
या चित्रपटातील संवाद न भूतो न भविष्यती.. असे होते.. त्यातील काही..
नासीर " इंसान जो होते हैं.. वो दो नसल के होते हैं.. एक होते हैं हरामी और दुसरे बेवकूफ "
सरदार खान " सरदार खान नाम हैं हमरा, बता दीजियेगा सबको "
मोहसीना खान 👇
सरदार खान " आंड जितना भी बडा हो जाये, वो लंड के नीचे ही रहता हैं "
सरदार खान " उस हारामी कोमिटाना हैं हमें, गोली नहीं मारेंगे, केह के लेंगे उसकी "
सरदार खान " जरा सुंघ के बताओ, मंत्री जीं नाश्ठे में क्या खाए हैं "
दानिश खान 👇
सुलतान " ये वसेपूर हैं, यहाँ कबुतर भी एक पंख से उडता हैं, और दुसरे से अपना इज्जत बचाता हैं "
रामधीर सिंघ " जैसे लोहा लोहे को काटता हैं.. वैसे ही चुतीया चुतीये को मारता हैं "
फैजल खान " तुम्हे याद कर कर के हमारा हाथ दुःख गया "
रामधीर " बेटा तुमसे ना हो पायेगा "
जे. पी.👇
शेवटचा..
फैजल खान " बाप का, भाई का , दद्दा का.. सबका बदला लेगा रे तेरा फैजल ".
संपूर्ण चित्रपट लिहावा लागंल असे डायलॉग आहेत..
लक्षात राहण्या सारखे..
हा चित्रपट हिंदी चित्रपट दुनियेत मैलाचा दगड म्हणूनच पाहिला जातो..
माझा वैयक्तिक खुप खुप आवडीचा..
एहसान कुरेशी 👇
पाहिला नसेल तर नक्की बघाच..
गुड्डू 👇
समीक्षा कशी वाटली नक्की सांगा...
नासीर अहमद 👇
शमशाद 👇
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
खरं तर चित्रपट समीक्षा लिहिण्यास सुरुवात करावी असा एकमेव चित्रपट आहे. म्हणून हा पहिला.
खदखद काय असते आणि तिला व्यक्त कशी करायची असते. अख्खं जग विरोधात समोर उभं असताना पण त्यांना पाठ न दाखवता निधड्या छतीनं सामोरं जाऊन चार वार झेलायचे कसे आणि
👇
आठ वार करायचे कसे. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ' Fandry '.
मला 100% खात्री आहे, कि या जगात कोणीच, या चित्रपटाला शब्दांत व्यक्त करून न्याय देऊ शकत नाही. त्याला वेगळं सांगायची गरजच नाही. तो स्वयंपूर्ण आहे.
👇
' जे वर्षानुवर्ष, पिढ्यान पिढ्या दलदलीत ते दलित.' ज्यांना माणसाचं समसमान असण्याचं तत्वच नाकारलं गेलं आहे. ज्यांना तुम्ही स्पर्धा सुरू होण्याआधीच नालायक म्हंटलं गेलं आहे. ज्यांना तुम्ही स्पर्धेत उतरवन्याच्या आधीच ( कर्ण ) तुम्ही शूद्र किंवा कमी दर्जाचे आहात हे शतकोनी शतक
👇
मला जवळ जवळ कायमच एकटं (Alone) राहायला आवडतं. मला माझी सोबत जगात इतर कोणाही पेक्षा जास्त आवडते. मीच अशी ती व्यक्ती आहे जिच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम करतो, जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो तसंच जिची सर्वात जास्त काळजी घेतो. @Archanagsanap2 @Rupachi_Rani
👇
मी बर्याचदा अनेकांना एकटं राहायला जगायला घाबरलेलं पाहिलं आहे. मी याच्या शिवाय जगू शकत नाही त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं आपण म्हणतो पण तसं खरंच नसतं त्याचा एवढाच साधा अर्थ असतो की मी आमूक आमूक व्यक्ती सोबत थोडा जास्त आनंदी जगेल. बस्स. यापेक्षा आधिक त्यात काहीही अर्थ नसतो.
👇
नुकतीच मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या झुंजार लेखणीतून रक्त ओकल्यासारखे शब्द लिहिलेली ' आघात ' नावाची कादंबरी वाचून संपवली..
अण्णाभाऊंच्या लेखनी म्हणजे तळपती तलवार जणू.. अशी कोणतीही भावना, विचार किंवा गोष्ट नाही जी ते तीला आपल्या लेखणीने योग्य न्याय नाही देऊ शकत..
👇
झोपडित राहणाऱ्या पण परिस्थितीशी झगडनाऱ्या लोकांचे जीवन चित्रित करणारी " आघात " ही कादंबरी, अण्णाभाऊंना कशी सुचली असेल हा प्रश्न पडत नाही.. कारण स्वताहा अण्णाभाऊ अशाच झोपडिवजा भागात लहानाचे मोठे झाले.. गरीबी, कष्ट, दारू, रोगराई, भांडण, संघर्ष, शिव्यागाळ्या हे
👇
सर्वच त्यांच्या पाचवीला पुजलेलं..
माणूसच वाईट नसतो, वाईट परिस्थिती देखील माणसाला वाईट वागण्यासाठी प्रव्रूत्त करते..आणि असं वाईट वागणं आहे ती परिस्थिती आणखी वाईट बनवते.. ह्या चक्रात माणूस कसा भरडला जातो.. तसंच माणसाच्या आयुष्यात किती संघर्ष असावा याची देखील परसीमा असावी
👇
मला पडणारा नेहमीचा प्रश्न की आपल्याला जिंकायचंच का असतं? आपण न जिंकता ही आनंदी तसंच यशस्वी जीवन जगू नाही का शकत? का त्यासाठी आपल्याला आनंदी आणि यशस्वी जीवन म्हणजे काय याच्याच व्याख्या बदलाव्या लागणार आहेत ?
👇
मला कायम वाटंत आलं आहे जीवन जगणं मंग ते कशाही प्रकारे असू दे तो एक प्रकारचा mind game च चाललेला असतो. तुमच्या सोबत घडलेल्या घटना व त्याचा तुम्ही तुमच्या बुद्धी नुसार लावलेला अन्वयार्थ तसंच त्याला तुम्ही दिलेला reply.
👇
तुम्हांला असं वाटंत नाही का कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्वांत प्रमुख अट ही असते की तुम्हांला प्रश्न व्यवस्थितच कळला पाहिजे? तर मंग आपण आपल्या समोर वाढून ठेवलेलं जीवन जगताना आपण ते काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही ? की आला दिवस ढकलणार आहोत.
👇
Any kind of 'Holding Is BAD' whether it is Love, Hate, Grudge, Anger, Happiness, Sadness or Kindness!
कोणत्याही प्रकारची भावना प्रमाणापेक्षा जास्त काळ धरून ठेवणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नसते.
👇
कारण त्या भावनेसोबत जगण्याची आपल्याला सवय होते. ती भावना ज्या व्यक्ती, जागे किंवा कामा बाबतीत आहे तिचीही सवय होते. जर future मध्ये ती दूर झाली तर त्याचा आपल्याला त्रास होवून नैराश्य येण्याची शक्यता वाढते.
👇
बदलापूर movie मध्ये शेवटी जेव्हा हूमा कुरेशी येऊन वरून ला सांगते की गेल्या 15 वर्षापासून ज्याचा ( नवाजुद्दीन ) तू सगळ्यात जास्त राग मनात धरलेला तूझा दुश्मन तर आता मेला मंग तू आता काय करणार? तेंव्हा वरून स्तब्ध होउन जातो! तसं.
👇
आपल्या जीवनात अनेक चांगल्या वाईट गोष्ठी घडत असतात. चांगल्या, मनासारख्या घडल्या की आपल्याला आनंद होतो, मस्त - छान वाटतं.
पण काही न आवडणार्या घडल्या तर ? तर मंग आपल्याला शारीरिक तसंच मानसिक त्रास होतो वा त्याचं दुःख होतं! 👇
आपण आजारी पडलो तर त्याचा आपल्याला शारीरिक त्रास होतो पण आपणच का पडलो असा जर विचार केला तर दुःख होतं. आपल्या हातात काय आहे त्रास टाळनं का दुःख टाळनं, विचार करा!
त्रास होणं आणि दुःख होणं याची गल्लत करू नका कारण दोघेही वेगवेगळे आहेत! सख्खी भावंडं म्हणा ना ती पण जुळी! 👇
आपण आयुष्यभर त्रास कवटाळून नाही बसू शकत, आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढतोच किंवा तो खूप काळ टिकला असह्य झाला तर जीव सोडतो पण त्याच्या उलट आपण दुःख मनाशी कवटाळून बसतो!
एखाद्या घटनेतील त्रासाचं मोठं भूत तेव्हाच तयार होतं जेव्हा आपण त्याचं दुःख मनाला लावून घेतो. 👇