एखाद्या घटनेवर पत्रकार कसे प्रतिक्रिया देतील यावर #थ्रेड
रजनीश कुमार: आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार भकासपुर गावात गाईला दोन खोंड झाले आहेत, गाईचा मालक स्वतःला जुळे झाले तेव्हा खुश नव्हता एवढा खुश आहे.
इस देश में इंसान के बच्चे से जादा गाय के बच्चे को अहमियत दी जा रही है! १/९
राजीव वांदेकर : नमस्कार तुम्ही पहात आहात माझा तोंडपट्टा, आणि आज आपल्यासोबत आहेत एकाच वेळी जुळे देणारे, माफ करा जुळे देणाऱ्या गाईचे मालक.
तर मालक, असंय की, आमच्या प्रेक्षकांना हे कळलंच पाहिजे, म्हणून मला तुम्ही सांगा हे कसं झालं?
२/९
निखिल वेगळे: नमस्कार, हा गोठा जरी यांचा असला तरी हा शो माझा आहे, आणि हे जे तुम्ही चालवलं आहे ते मला अजीबात मान्य नाही, गाईला दोन्ही खोंड च का झाली, एखादी कालवड का नाही? हा लोकशाही मूल्यांवर हल्ला आहे, मी याचा निषेध करतो. ३/९