*अनुदिन अनुतापे*

दासनवमीच्या उत्सवात समर्थ रामदासस्वामींच्या दासबोध, मनाचे श्लोक इ .मधील मौलिक शिकवण ऐकायला मिळते. दरवेळी त्याचा नव्याने अर्थ उलगडत जातो.
रामदासस्वामींची विपुल ग्रंथसंपदा तर भारावून टाकणारी आहे.+ Image
एका संन्याशाने प्रपंचातल्या किती बारीकसारीक गोष्टींचा विचार केला हे पाहून मन थक्क होते .
आध्यात्मिक क्षेत्रात मी शून्यच. ग्रंथांचे वाचन , किर्तन, प्रवचन यातला ऐकण्याचा अनुभवही नगण्यच. मात्र समर्थांची करुणाष्टके मला फार जवळची वाटतात.+
संसार तापाने होरपळलेल्या मनाने कळवळून रामाला केलेली विनवणी मनाला स्पर्शून जाते. आपल्या मनाचेही तेच भाव नसतात का?
सामान्य माणसं आपण! प्रपंचाच्या
भोव-यात अडकलेली!
"जिंदगी हर कदम एक नयी जंग है"
याचा अनुभव घेणारी. प्रपंचाचा अर्थच मुळात माया , झंझट , बखेडा.+
तो सरळ साधा तरी कसा असणार? रोजच्या रोज नव्या समस्यांना सामोरे जातांना सहनशक्तिचा अंत पाहिला जातो. कुठवर टिकाव धरणार?
कधीकधी मन अगदी व्याकुळ होऊन जातं. माणसांच्या गराड्यात असूनही अगदी एकटं, " समुद्री चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही" अशी अवस्था.+
मनातलं सांगायचं तरी कोणाला? एकच जागा असते ती म्हणजे आई. सगळं शांतपणे पोटात ठेवणारी पाठी वरुन मायेचा हात फिरवणारी , दिलासा देणारी. तीच नसेल तर जायचं तरी कोणापाशी? गणगोत सगळं माया आणि वैभवाने बांधलेले. वैभव म्हणजे नुसती संपत्ती नव्हेच.+
पद, प्रतिष्ठा, रुप, गुण एखादी कला , तारुण्यातली ability to perform , म्हणजेही वैभवच की. पण त्याचे कौतुक वाटण्या ऐवजी ईर्षा वाटणारेच जास्त. पावलोपावली येणाऱ्या अनुभवांनी मन उद्विग्न व्हायचं.
अशा परिस्थितीत आप्तजन तुमच्या हाकेला कशाला धावतील?+
आणि धावले तरी वात्सल्याचा भाव त्यांच्या मनात कितपत असणार? लहानपणी खेळत असलेल्या "कानगोष्टी" च्या खेळासारखी गत व्हायची आपल्या व्यथेची.
अशा व्याकुळ अवस्थेत तोंडातून आपसुक शब्द बाहेर पडायचे
" अनुदिन अनुतापे
तापलो रामराया "+
त्या रामरायाशिवाय मनाच्या व्यथासांगणार तरी कोणाला?
अपमान , अवहेलना , उपेक्षा ,हताशा , निराशा , संताप , भय , अशा सगळ्या भावनांचा संमिश्र कल्लोळ शांत करण्यासाठी करुणाष्टकांचा आसरा दिलासा देणारा असायचा ,+
करुणाष्टके म्हणतांना मनातल्या सगळ्या व्यथा मांडल्या जायच्या मन हलकं व्हायचं डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागायचे. आर्त मनाने रामाला साद घालून सगळा भार त्याच्यावर सोपवला की शांत वाटायचं. समोरचा मार्ग दिसायचा.
त्यावेळी "रघुनायका मागणे हेचि आता" यावर जास्त भर असायचा+
आणि आता रोज " कृपा कटाक्षे सांभाळि दीना तुजवीण रामा मज कंठवेना " चा आठव येतो.
दासबोध म्हणजे परीसच ज्याच्या हाती लागला त्याच्या आयुष्याचे सोनेच होणार ! मला मात्र करुणाष्टकेच आवडतात. कळवळून रामाला साद घालणारी ,
* आपले गा-हाणे मांडणारी.+
* आज संसाराच अवलोकन करतांना करुणाष्टकांनी मनाला किती आधार दिला हे जाणवतं. परमेश्वरानेही हाकेला धावून प्रपंचाची नाव इथवर सुखरुप आणली आहे , प्रत्यक्ष रामरायाच नावाडी असतांना चिंता तरी कशाची करायची?+
* "आम्हा अनाथासी तू एक दाता
संसार चिंता चुकवी समर्था
दासा मनी आठव विसरेना
तुजवीण रामा मज कंठवेना।।"
*जय जय रघुवीर समर्थ*
🙏🏻🙏🏻
*सौ.अमृता खोलकुटे*© .

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with प्रफुल खोलकुटे फांजे🇮🇳

प्रफुल खोलकुटे फांजे🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PPhanje

Feb 27
*शब्दसंपदा*

आजकाल इंग्रजी मिश्रित मराठी बोलण्याची पद्धतच आली आहे. आपली भाषा किती सुंदर आहे. अनेक अलंकारांनी , शब्दसंपदेनी नटलेली भाषा आजकाल एखाद्या कार्यक्रमाच्या निवेदनातच कानावर पडते.
इतर अलंकारां बरोबरच म्हणी आणि वाक् प्रचार भाषेला समृद्ध करतात.+
भाषेचं सौंदर्य अलंकारानी खुलतं.
पूर्वी सहज बोलतांना आई ,आजी म्हणींचा वापर करत असत.
माझ्या सासुबाईंना बोलतांना म्हणी वापरायची खूप सवय होती. त्यांच्या काही म्हणी जरा हटके असायच्या.
उन्हाळा - दिवाळीत आम्ही सगळे एकत्र जमायचो. +
दुपारची जेवणं आटोपून सगळं आवरुन आम्ही चारही जावा एका कोपऱ्यात खुसखुसत बसायचो. मुलं भूकभूक करत यायची. त्यांना दटावून पिटाळून लावायचो. मुलांना काय आजी आहेच. आई आम्हाला हाक मारायच्या. आम्हाला कुठलं ऐकू येतयं? मग घरात येऊन कानोसा घ्यायच्या आणि मोठ्यानी म्हणायच्या ,+
Read 14 tweets
Feb 26
सुप्रिया ताई असं म्हणतात की स्त्री ही स्त्री ची शत्रू असते , पण हे चित्र आता बदलायला हवं आणि बदलायच असेल तर तुम्हालाच प्रथम पाऊल उचलवं लागेल. ताई पुढे या आणि चूक करणाऱ्या तुमच्या ह्या मावळ्याची जीभ हासडा. +
ज्या शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही स्वतःला म्हणवून घेता त्यांनी पण वेळ आली तेंव्हा आपल्याच लोकांना शिक्षा करताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी तर सुभेदाराच्या सूनेला पण पूर्ण सन्मान देऊन परत पाठवले आणि तुमचे हे मावळे आपल्याच एका भगिनीला खालच्या भाषेत बोलतात आहेत😡+
पार्टी विचारधारा हे सगळं बाजूला ठेवा ताई आणि काही तरी action घ्या. स्त्रीचा अपमान करणाऱ्याला क्षमा नकोच.

"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।५६।।"
मनुस्मृतीतला श्लोक आहे , तुम्ही वाचण्याचे chances कमीच आहेत.+
Read 4 tweets
Aug 21, 2021
*आटपाट नगर होतं* ......
श्रावण सुरु झाला की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आठवतात त्या श्रावण महिन्याच्या प्रत्येक वाराच्या कहाण्या. आजीने मनोभावे सांगितलेल्या आणि तांदुळाचे चार दाणे हातात घेऊन चित्तभावाने ऐकलेल्या.
आपल्या प्रत्येक कहाणीत काहीतरी शिकवण आहेच,...(१)
विशिष्ट लयीत सांगितलेल्या कहाण्या मनात घर करुन रहातात.
दिव्याच्या आवसे पासून कहाण्या सुरु होतात.अंधःकार दूर करणाऱ्या दिव्याला लखलखीत करुन पूजन करायचे.अज्ञानाच्या तमाला उजळून टाकण्यासाठी ज्ञानाची ज्योत तेवत ठेवायची एवढेच नव्हे तर ज्योतीने ज्योत लावत सगळे जग ज्ञानाने....(२)
प्रकाशमान करायचे.
सोमवारची कहाणी कधी शिवामूठीची तर कधी खुलभर दुधाची. एकात शिवभक्तीचा महिमा. नावडत्या सुनेसाठी औट घटकेचे वैभव दाखवणारा, तर दुसरीत घरच्या दारच्यांच्या, प्राणीमात्रांच्या तृप्तीतच वसत असलेला महादेव.
मंगळवारची कहाणी ऐकताना साप कऱ्यात शिरल्यावर कऱ्याचे ....(३)
Read 25 tweets
Jun 24, 2021
🌳वटसावित्री🌳
आज वटपौर्णिमा, काल पासूनच समाजमध्यमांवर निरनिराळे मेसेज फिरायला सुरवात झाली आहे. त्यातला मला खटकणारा एक मेसेज म्हणजे सत्यवानाच्या सवित्रिपेक्षा सावित्रीबाई फुलेंचा मार्ग धरला तर उत्तम. सावित्रीबाई फुलेंचे कार्य तर अनमोल आहेच त्याबद्दल वादच नाही....१/n
पण कुणा एकाची स्तुती करताना किंवा महत्त्व सांगताना दुसऱ्यावर टीका केलीच पाहिजे का? कोणाला कमीपणा दिला तरच एखाद्याचे महत्त्व वाढते का?
काय जाणून घेतलं आपण सत्यवनाच्या सावित्री बद्दल? केवळ व्रत वैकल्य, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाची पूजा करा, फेऱ्या घाला इतकाच?....२/n
सत्यवान सावित्रीचे आख्यान महाभारताच्या वनपर्वात येते. मद्र देशाचा राजा अश्वपतीची रूपवान, गुणवान, बुद्धिमान अशी ही कन्या सावित्री. तर्कशुद्ध विचार मांडणारी, वादविवादात प्रवीण,स्वतंत्र विचाराची. ती उपवर झाली तेंव्हा आश्र्वपतीने तिला आपला वर निवडण्याची मुभा दिली....३/n
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(