आजकाल इंग्रजी मिश्रित मराठी बोलण्याची पद्धतच आली आहे. आपली भाषा किती सुंदर आहे. अनेक अलंकारांनी , शब्दसंपदेनी नटलेली भाषा आजकाल एखाद्या कार्यक्रमाच्या निवेदनातच कानावर पडते.
इतर अलंकारां बरोबरच म्हणी आणि वाक् प्रचार भाषेला समृद्ध करतात.+
भाषेचं सौंदर्य अलंकारानी खुलतं.
पूर्वी सहज बोलतांना आई ,आजी म्हणींचा वापर करत असत.
माझ्या सासुबाईंना बोलतांना म्हणी वापरायची खूप सवय होती. त्यांच्या काही म्हणी जरा हटके असायच्या.
उन्हाळा - दिवाळीत आम्ही सगळे एकत्र जमायचो. +
दुपारची जेवणं आटोपून सगळं आवरुन आम्ही चारही जावा एका कोपऱ्यात खुसखुसत बसायचो. मुलं भूकभूक करत यायची. त्यांना दटावून पिटाळून लावायचो. मुलांना काय आजी आहेच. आई आम्हाला हाक मारायच्या. आम्हाला कुठलं ऐकू येतयं? मग घरात येऊन कानोसा घ्यायच्या आणि मोठ्यानी म्हणायच्या ,+
"घरी चार सुना अन् पाणी मागू कुणा?"
आम्ही धडपडत उठायचो.
कधी रात्रीच्या जेवणाचा सुटसुटीत बेत केला की तो आमच्या मुलांनी किंवा सासूबाईंच्या मुलांनी हाणून पाडलाच म्हणून समजा. त्यांना खास आवडीचा पदार्थ हवा असायचा. कंटाळा केला की आई स्वतः उठायच्या आणि म्हणायच्या ,+
" तरण्या झाल्या बरण्या म्हाताऱ्या झाल्या हरण्या."
घरात पाहुणे असायचे सारखे. मग मागच्या दारानी पिशवी घेऊन बाजारात पाठवणं आलंच! मग म्हणायच्या " एकावेळी का नाही सांगत आणायला? घे पिशवी जा बाजारात."
"एकानी एकानी अन् बुआ माझा दुकानी."+
उन्हाळ्यात सगळे अंगणात नाहीतर गच्चीवर जायचे झोपायला. नंतर आम्हा जावांची पंगत बसायची. कधीतरी एखादा छानसा पुरवठ्याचा पदार्थ , गरम भात असं काहीतरी सुरू असायचं. आई काय चाललंय याचा अंदाज घ्यायच्या गॅसवर भांडं दिसलं की म्हणायच्या , काय चाललंय गं एवढ्या रात्री?+
"सारा गाव निजे चिपडीचं वरण शिजे "
कधी कुठून बाहेरुन आलो की काहीतरी गोंधळ ,पसारा दिसायचा. चिडचिड व्हायची. जरा कुठे बाहेर जावं तर काही चैन नाही जीवाला. जरा जोरातच विचारायचं " कोणी केलं?" आई तोंडाला पदर लावून हसत म्हणायच्या " कोण करणार?"
" जे गुण बाळे ते गुण लेकुरवाळे"+
हा पसारा बाबांचा असायचा. आम्ही चौघी हसू दाबत,जीभ चावत आत पसार व्हायचो.
माझ्या मोठ्या दिरांना सगळ्या गावाची कामं अंगावर घ्यायची मोठी हौस. बाबा तेंव्हा मुंबईला होते. मग काय दर उन्हाळ्यात त्यांच्याबरोबर कोणीतरी नोकरी शोधायला मुंबईला यायचाच.+
तो किती जवळचा आहे याचे साग्रसंगीत वर्णन व्हायचे. मुक्काम आमच्याचकडे. आईंची कुरकुर चालायची.
"कोणाचे कोण पितळेचे होन"
एखादा दूरदूरचे नाते सांगत आला की
"विटेस गोटा मावसभाऊ".
सहज बोलता बोलता " कशात काय अन् फाटक्यात पाय, बाबा गेला आणि दशम्याही ,+
लंगडं ते लंगडं गाव घरी चरेना , **ऱ्याला पावाट्याचं निमित्त ,घरची म्हणते देवा देवा", अशा कितीतरी म्हणी त्या वापरायच्या.
त्यांच्यामुळे मलाही बोलतांना म्हणी वापरायची सवय लागली. माझ्या एक सहकारी होत्या त्यांना काम नको पुढेपुढे करायची सवय ,अगदी
"मला पहा आणि फुलं वहा "+
काॕलेज मध्ये खेड्यातून बरीच मुलं यायची त्यांचं म्हणजे ,
"वेष बावळा परी अंतरी नाना कळा "
असा प्रकार.
"वेडा होऊन पेढा खाणं " म्हणजे काय हे त्यांच्याकडून मला चांगलच समजलं.
मी म्हणी वापरल्या की विद्यार्थी , सहकारी गोंधळल्या सारखे माझ्याकडे बघायचे."काय म्हणतात या ?"+
प्रत्येक वेळी अर्थ उलगडून सांगायचा म्हणजे मजाच गेली. माझाच विरस व्हायचा.
आजच्या पिढीला मराठी भाषाच यायची मारामार तर म्हणी कुठून येणार ? म्हणी आणि वाक् प्रचारांशी परीक्षेतल्या "वाक्यात उपयोग करा "या प्रश्ना पुरताच त्यांचा संबंध.+
सगळी सरमिसळ भाषा. मध्येच हिंदी , मध्येच इंग्रजी
"एक ना धड भाराभार चिंध्या"
आपल्या भाषेचे जतन होणार तरी कसे? फक्त साहित्य संमेलनांपुरतेच उरणार की काय ?+
गंभीर पणे विचार करायला हवा.
तरुण मंडळींनी मराठी बोलायला सुरवात करावी मग बघा भाषेचं सौंदर्य कसं उलगडत जातं ते !
सुप्रिया ताई असं म्हणतात की स्त्री ही स्त्री ची शत्रू असते , पण हे चित्र आता बदलायला हवं आणि बदलायच असेल तर तुम्हालाच प्रथम पाऊल उचलवं लागेल. ताई पुढे या आणि चूक करणाऱ्या तुमच्या ह्या मावळ्याची जीभ हासडा. +
ज्या शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही स्वतःला म्हणवून घेता त्यांनी पण वेळ आली तेंव्हा आपल्याच लोकांना शिक्षा करताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी तर सुभेदाराच्या सूनेला पण पूर्ण सन्मान देऊन परत पाठवले आणि तुमचे हे मावळे आपल्याच एका भगिनीला खालच्या भाषेत बोलतात आहेत😡+
पार्टी विचारधारा हे सगळं बाजूला ठेवा ताई आणि काही तरी action घ्या. स्त्रीचा अपमान करणाऱ्याला क्षमा नकोच.
"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।५६।।"
मनुस्मृतीतला श्लोक आहे , तुम्ही वाचण्याचे chances कमीच आहेत.+
दासनवमीच्या उत्सवात समर्थ रामदासस्वामींच्या दासबोध, मनाचे श्लोक इ .मधील मौलिक शिकवण ऐकायला मिळते. दरवेळी त्याचा नव्याने अर्थ उलगडत जातो.
रामदासस्वामींची विपुल ग्रंथसंपदा तर भारावून टाकणारी आहे.+
एका संन्याशाने प्रपंचातल्या किती बारीकसारीक गोष्टींचा विचार केला हे पाहून मन थक्क होते .
आध्यात्मिक क्षेत्रात मी शून्यच. ग्रंथांचे वाचन , किर्तन, प्रवचन यातला ऐकण्याचा अनुभवही नगण्यच. मात्र समर्थांची करुणाष्टके मला फार जवळची वाटतात.+
संसार तापाने होरपळलेल्या मनाने कळवळून रामाला केलेली विनवणी मनाला स्पर्शून जाते. आपल्या मनाचेही तेच भाव नसतात का?
सामान्य माणसं आपण! प्रपंचाच्या
भोव-यात अडकलेली!
"जिंदगी हर कदम एक नयी जंग है"
याचा अनुभव घेणारी. प्रपंचाचा अर्थच मुळात माया , झंझट , बखेडा.+
*आटपाट नगर होतं* ......
श्रावण सुरु झाला की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आठवतात त्या श्रावण महिन्याच्या प्रत्येक वाराच्या कहाण्या. आजीने मनोभावे सांगितलेल्या आणि तांदुळाचे चार दाणे हातात घेऊन चित्तभावाने ऐकलेल्या.
आपल्या प्रत्येक कहाणीत काहीतरी शिकवण आहेच,...(१)
विशिष्ट लयीत सांगितलेल्या कहाण्या मनात घर करुन रहातात.
दिव्याच्या आवसे पासून कहाण्या सुरु होतात.अंधःकार दूर करणाऱ्या दिव्याला लखलखीत करुन पूजन करायचे.अज्ञानाच्या तमाला उजळून टाकण्यासाठी ज्ञानाची ज्योत तेवत ठेवायची एवढेच नव्हे तर ज्योतीने ज्योत लावत सगळे जग ज्ञानाने....(२)
प्रकाशमान करायचे.
सोमवारची कहाणी कधी शिवामूठीची तर कधी खुलभर दुधाची. एकात शिवभक्तीचा महिमा. नावडत्या सुनेसाठी औट घटकेचे वैभव दाखवणारा, तर दुसरीत घरच्या दारच्यांच्या, प्राणीमात्रांच्या तृप्तीतच वसत असलेला महादेव.
मंगळवारची कहाणी ऐकताना साप कऱ्यात शिरल्यावर कऱ्याचे ....(३)
🌳वटसावित्री🌳
आज वटपौर्णिमा, काल पासूनच समाजमध्यमांवर निरनिराळे मेसेज फिरायला सुरवात झाली आहे. त्यातला मला खटकणारा एक मेसेज म्हणजे सत्यवानाच्या सवित्रिपेक्षा सावित्रीबाई फुलेंचा मार्ग धरला तर उत्तम. सावित्रीबाई फुलेंचे कार्य तर अनमोल आहेच त्याबद्दल वादच नाही....१/n
पण कुणा एकाची स्तुती करताना किंवा महत्त्व सांगताना दुसऱ्यावर टीका केलीच पाहिजे का? कोणाला कमीपणा दिला तरच एखाद्याचे महत्त्व वाढते का?
काय जाणून घेतलं आपण सत्यवनाच्या सावित्री बद्दल? केवळ व्रत वैकल्य, सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाची पूजा करा, फेऱ्या घाला इतकाच?....२/n
सत्यवान सावित्रीचे आख्यान महाभारताच्या वनपर्वात येते. मद्र देशाचा राजा अश्वपतीची रूपवान, गुणवान, बुद्धिमान अशी ही कन्या सावित्री. तर्कशुद्ध विचार मांडणारी, वादविवादात प्रवीण,स्वतंत्र विचाराची. ती उपवर झाली तेंव्हा आश्र्वपतीने तिला आपला वर निवडण्याची मुभा दिली....३/n