🤔 But #Mumbai & #Marathi were always Multicultural (Cosmopolitan) even before birth of Hindi which is why we say
"धर्म, पंथ, जात एक जाणतो #मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी"
😎 हो पण आता जागतिक शहर म्हणून प्रगती करायची असेल हिंदी यायला हवी
🤔 पण #मुंबई प्रगत जागतिक शहर पहिल्यापासून आहे म्हणूनच तर लोक इथे येतात. आतापर्यंत #मराठी व गरजेपुरती इंग्रजी बोलूनच जागतिक किर्ती झाली ना? आणि हिंदी बोलून प्रगती होते मग हिंदी राज्ये/शहरे का नाही प्रगत झाली?
२/८
😎 पण भाषेचे काय एवढं, मराठी वा हिंदी संभाषण झाल की झाल
🤔 पण मग हेच हिंदीभाषिक का मानत नाहीत व बिगरहिंदीभाषिक राज्यातही हिंदीतच बोलण्याचा आग्रह का धरतात? ते आपली भाषा व ओळख आर्वजून जपतात मग आपण आपल्याच राज्यात का #मराठी पासून दूरावा ठेवतो? आपण हिंदीराज्यात हिंदीतच बोलतो ना
३/८
😎 पण मुंबई घडवण्यात सर्वांचाच हातभार आहे, #मुंबई काय एकट्या #मराठी माणसांनी नाही बनवली
🤔 हो पण ज्या शहराने/राज्याने संधी, जीवन, ओळख दिले त्याच राज्याची ओळख व भाषा अंगिकारायला का संकोच? इथे स्थायिक झाला तो #मराठी मग तो कुठल्याही धर्म-जात-आडनावाचा असो
😎 इतक सोप्प नसत
४/८
🤔 सोप्प #मुंबई ला येणे व स्थायिक होणे ही नसत, त्यापेक्षा तर सोप्पच असेल की #मराठी भाषा व ओळख अंगिकारणे
😎 ह्म्मममम .. पण आता खुप उशीर झाला असे वाटते
🤔 श्री छत्रपतींनी महाराष्ट्र घडवला तेव्हा ते पारतंत्र्यात होते आपण तर अजुन आपल्याच राज्यात आहोत की .. करून बघू प्रयत्न
५/८
😎 पण कोणाला मराठीतच बोलायची सक्ती करणे चुकीचे आहे
🤔 हो .. पण महाराष्ट्रात आपण मराठीतच बोलणे समोरचा हिंदीत बोलला तरी, नाहीतर तटस्थ भाषा म्हणून इंग्रजी .. ही तर सक्ती नाही ना?
😎 पण इतका हिंदीव्देष का?
🤔 हिंदी राज्यात हिंदी न बोलणे म्हणजे हिंदीद्वेष पण ..
६/८
बिगरहिंदीभाषिक राज्यात हिंदी न बोलणे हा कसा काय हिंदीव्देष?
😎 पण ईतर बिगरमराठी-बिगरहिंदी मुंबईत हिंदीतच बोलतात ना मग आपण का नाही?
🤔 कारण महाराष्ट्र आपले घर आहे, ईतर भाषिक त्यांच्या घरी किंवा घरराज्यात हिंदी नाही तर त्यांच्याच भाषेत बोलतात. तसेच आपण ही करावे .. नाही का?
७/८
😎 मग नेते, सेलिब्रिटी, कलाकार, पत्रकार, ई. महाराष्ट्रात हिंदी बोलतात ते बर चालतय तुम्हाला?
🤔 पण हे आर्दश वा मापदंड कधीपासूनच झाले समाजाचे? हे बहुतांश समाजाप्रमाणेच वागतात कारण त्यांचे अस्तित्वच समाजावर अवलंबून असते.
६-७ महिन्यांपूर्वीची गोष्ट .. वरळीला ऑफिसला चाललो होतो, औषध घ्यायचे म्हणून मध्ये दादरला गाडी थांबवून उतरलो. औषधाच्या दुकानातील रांगेत उभा होतो पुढे ३-४ व्यक्ती होत्या हातभर अतंर ठेवुन. पहील्या क्रमांकावरील आजोबा औषध न घेता बाजूला झाले..
आणि बाजूलाच फुटपाथवर बसलेल्या आजींकडे गेले. गावाकडची मंडळी वाटत होती. आजींची तब्येत ठीक दिसत नव्हती व रस्त्यावरच्या लोखंडी ग्रिलचा आसरा घेतला होता त्यांनी ..
माझा नंबर आला .. 'भाई ये लिस्टवाली दवाईया देना प्लीज' .. औषधे घेतली .. तोपर्यंत वाहतूक कोंडीमुळे आमचे सारथी गाडी ..
.. घेऊन पुढे गेले होते व त्यांनी फोन करून सांगितले की युटर्न मारून येतो. थोडावेळ होता माझ्याकडे .. म्हणून थोडी माणूसकी मनात डोकावली व त्या आजी-आजोबांकडे गेलो ..
मी :"आजोबा .. काय हवय का? आजींची तब्येत बरी वाटत नाही"
आजोबा : "बाळा .. हिच्या गोळ्या संपल्यात आणि तिथल्या मनुष्याला