२० मार्च १९२७ हा दिवस म्हणजे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा दिवस. माणुसकीचा आणि समतेचा संदेश देणारा हा अतिशय महत्वाचा दिवस. आपल्या ध्येयावर आढळ श्रद्धा बाळगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीन-दलित व वंचित वर्गात निष्ठा निर्माण करत होते, स्वभिमान जागृत करत होते. ज्या तलावात
पशु-पक्षी जनावर आपली तहान भागवत असत त्याच ठिकाणी मात्र अस्पृश्य वर्गाला आपली तहान भागवण्यास मज्जाव होता. या वर्गाला सार्वजनिक स्थळे देवळे एवढेच नव्हे तर आपली सावली सुद्धा रस्त्यावर पडता कामा नये याची दक्षता म्हणून गळ्यात मडकं हातात झाडू व कमरेला फांदी अशी अवस्था या समाजाची होती.
हिंदू धर्मातील हिंदू धर्ममार्तंड यांचा ढोंगीपणा हा महापुरुष जगाच्या वेशीवर सांगत होता. चवदार तळ्यातील पाणी पशुपक्षी पीत असत परंतु युगानयुगे राम कृष्ण विठोबा हिंदूंच्या देवाला आपले देव म्हणून मानणाऱ्या अस्पृश्य हिंदुना सारे सार्वजनिक पाणवठे विहिरी, तलाव बंद होती, यांना स्पर्श केला
तर यांचा धर्म बुडत असे, संस्कृती कलंकित होत असे. या क्रूर आणि माणूस अस्पृश्यतेच्या रुढीचा नाश करून सामाजिक मूल्य निखरी मानवी समानता यांच्या स्थापनेसाठी एक ज्वलंत रूढी विध्वंसक अस्पृश्यांचा उद्धारकरता आणि बंडखोर नेता म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील एक महान परंतु रोगट व
विस्कळीत समाजाची पुनर्घटना करून त्याला नव संजीवनी देण्यासाठी बंड पुकारत होते. या बंडातील हजारो दलितांनी जगातील त्या जुन्या गुलामगिरीचे उच्चाटन करण्याचा मार्ग पत्करला होता, शतकानुशतके सामाजिक गुलामगिरीच्या जात्यात भरडून निघालेल्या समाजाचे अशा तर्हेचे बंड पुकारण्याची हे दृश्य आज
वरच्या भारतीय इतिहासात रोमहर्षक व अभूतपूर्व होते. सामाजिक गुलामगिरीने उसळी मारून प्रचंड उग्र स्वरूप धारण केले होते. डॉ. आंबेडकर चवदार तळ्याच्या पायर्या उतरून खाली गेले आणि त्या तळ्यातील ओंजळ भर पाणी प्राशन केले. या एका कृतीने जमलेल्या सर्व नागरिकांमध्ये उत्साह संचारला आणि
त्यांनीही आपल्या नेत्या प्रमाणे पाणी प्राशन करून आपला हक्क बजावला. भारताच्या तीन हजार वर्षाच्या इतिहासातील हा अत्यंत महत्वपूर्ण दिवस माणुसकीचा आणि समानतेचा संदेश देणारा दिवस म्हणजे २० मार्च १९२७ या घटनेमुळे तमाम अस्पृश्य वंचित लोकांच्या हृदयात आपल्या स्वाभिमानाची जागा जागी झाली.
आता तो आपल्या आत्मसन्मानासाठी व स्वाभिमानासाठी लढा देण्यास सज्ज झाला, थंड पाण्याला आग लावून मुर्दाड समाजात स्वाभिमान पेरण्याचे काम या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. या लढ्याची आठवण तसेच 'समतेचे प्रतीक' म्हणून भारतीय नागरिक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे. या दिवसाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग कार्याला मानाचा मुजरा.🙇♂️🙏💙
Ninety Three years ago, on March 20, 1927, Dr. Babasaheb Ambedkar led the Mahad satyagraha for drinking water from the Cavdar tank at Mahad. This was the "foundational struggle" of the dalit movement, a movement for water - and for caste
annihilation. In his statement at the time, Dr. Ambedkar put the movement in the broadest possible context. Why do we fight, he asked. It is not simply for drinking water; drinking the water will not give us very much. It is not even a matter of only of our human rights, though
we fight to establish the right to drink water, but our goal is no less
than that of the French Revolution. This was fought for the reconstruction of society,for the eradication of the old society based on feudal inequality and the establishment of a new society based on liberty,
होळीच्या सणाला "फाल्गुनोत्सव" असे म्हणतात. बोधिप्राप्तीनंतर तथागत बुद्ध पहिल्यांदा कपिलवास्तुला त्यांच्या घरी गेले. त्यांचे स्वागत करण्यासाठी लोकांनी घरे आणि रस्ते स्वच्छ केले आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या आनंदात उत्सव साजरा केला जो नंतर "फाल्गुनोत्सव" झाला. आनंदात,
कपिलवस्तुच्या शाक्यांनी एकत्र भात शिजवला आणि चावल बाटीला सर्व लोक 'होलका' म्हणत, म्हणून बुद्धाच्या या स्वागताला नंतर "होलोत्सव" असे म्हटले गेले. आजही थायलंडमधील लोक हा सण साजरा करतात. बुद्धमूर्तीची रॅली (रथयात्रा) काढल्यानंतर लोक एकमेकांवर पाणी, फुले आणि रंग फेकतात. पाटलीपुत्र
येथील अशाच रथयात्रेचे वर्णन चिनी प्रवासी फाह्यांन आणि ह्युएन्त्सांग यांनी केले आहे. दक्षिण भारतातील अशाच एका सणाचे वर्णन 'विरूपक्षवसंतोत्सव' या पुस्तकात आहे. पण, तिथल्या रथयात्रेत (रॅली) शिवाला बुद्धाच्या ठिकाणी बसवले जाते, कारण पाली साहित्यात बुद्धाला शिव(सिव) असेही म्हटले जाते.
फाल्गुन पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व - "तथागतपुत्र राहुल याची धम्मदीक्षा."
वारसा बुद्धत्वाचा.....!!
"अजिंठा येथील लेणी क्र.१७ च्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर, खालच्या बाजूला असलेले हे शिल्प म्हणजे अजिंठ्याच्या सर्व शिल्पांमध्ये मनाला भावलेले असे हे शिल्प आहे.
कुणा एका अनामिक शिल्पकाराने मोठ्या श्रद्धेने बुद्धाप्रति समर्पित होऊन आपले भाव व भावना या शिल्पापध्ये मोठ्या प्राणपणाने ओतूनच हे भावस्पर्शी शिल्प येथे कोरलेले आहे.
या शिल्पातील प्रसंग व आशय असा आहे....
बुध्दत्व प्राप्त केल्यानंतर तथागत प्रथमच कपिलवस्तू येथे पिता शुद्धोधन राजा
यांच्या विनंतीवरून आलेले आहेत. त्या दिवशी असलेल्या फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधून. या दिवशी तथागतांच्या धम्मदेसनेचा लाभ आपल्या प्रजाजनांना व्हावा म्हणून शुद्धोधनाने केलेल्या विनंतीवरुन प्रजाजनांना धम्माचा उपदेशही त्यांनी प्रजेला केलेला आहे. तथापि, शुद्धोधनाची त्यांना आणखी एक
तुमच्या घरात येणारी घरकामवाली स्त्री, जीने एक सुट्टी घेतली तर तुम्ही ५० रुपये पगारातून कापून घेता, ती बाई ८-१० हजारात शहरात स्वतःचे कुटुंब कसे चालवत असेल? आपल्या घरी तर ती बाथरूम वापरत नाही, मग ७-८ तास ती स्वतःची लघवी, मासिक पाळीचा स्त्राव धरून ठेवत काम
कशी करत असेल? भल्या पहाटे थंडी-पावसात तुमच्या घरी दूध, पेपर टाकणारी पोरे महिन्याला ३-४ हजार रुपये कमावून स्वतःच्या घरावर कोणता सोन्याचा कळस चढवत असतील? २००-३०० रुपयांच्या पार्लरच्या कामासाठी भली मोठी बॅग सोबत घेवून तुमच्या घरी येणारे अर्बन कंपनीचे ब्युटिशिअन दिवसात किती कॉल करत
असतील आणि किती कमावत असतील?अमेझॉन, स्विगी, डंझो वगैरेसाठी मोठाल्या बॅग पाठीला लावून दिवसाला २००-३०० रुपयांसाठी उसासे टाकत जिने चढणारे डिलीव्हरी बॉय कुठल्या करीयर ग्रोथची स्वप्ने पाहत असतील? ओला, सुका कचरा गोळा करणारे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन उकिरड्यावर, डंपिंग ग्राउंडवर कचरा
"तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान, प्रगल्भ,परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही.बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता,तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही.असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही.
काय सामर्थ्य होते पाहा. जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही. उभा राहिला, तेवत राहिला…"
हे कोण म्हणतंय?
साक्षात स्वामी विवेकानंद.
हिंदुत्वाचा ध्वज जगभर घेऊन जाणारे विवेकानंद १९०० मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलत होते.
भारताची जगभरातली खरी ओळख आजही 'बुद्धांचा देश' हीच आहे. भलेही त्यांचे जन्मगाव असणारे लुंबिनी आता नेपाळमध्ये असेल, पण बुद्ध आपले आणि आपण सारे बुद्धांचे. 'बुद्धांशी तुलना होईल, असा एकही माणूस नंतर जन्मलाच नाही', असे आचार्य रजनीशांनी म्हणावे!
☆ संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज आपण सर्व ६१वा 'महाराष्ट्रदिन' साजरा करत आहोत.
"मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" या मागणीतून 'संयुक्त महाराष्ट्र समिती' ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६ हुतात्मे होऊन आपला आजचा महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी झालाय.
सर्व उपेक्षित-शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला.डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि शोषित-वंचित-कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणारे 'शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)'चे नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनपर आंदोलनामुळे 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला'