#संभाजीराजेंची_हत्या_आणि_गुढीपाडवा
औरंगजेबाच्या दरबारातील आणि शंभूराजांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ईश्वरदास नागर याने लिहिलेल्या “फुतूहात-इ-आलमगीर” या ग्रंथातील
संदर्भ:- (मूळ फारसी भाषेत असलेल्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी केले.)
“बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलास खान आणि बहादूर खान हे संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेऊन बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशाहने आज्ञा केल्यावरून इखलास खान आणि हमिदुद्दीनखान यांनी संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची हजार प्रकारे फजिती करण्यात आली.
त्यांना छावणीत आणण्यात आले. संभाजीराजेंनी बादशहा संबंधी न झेपणारे शब्द उच्चारले आणि त्याची निंदानालस्ती केली.
त्यांनी जे काही म्हटले ते रुहुल्लाखानाने बादशहाला सांगितले नाही पण ते बोलणे कशाप्रकारचे होते याचा इशारा दिला.
यावर बादशाहने आज्ञा केली कि, राजांच्या डोळ्यात सळई फिरवून त्याना नवी दृष्ठी द्यावी, पण संभाजीराजे स्वाभिमानी होते त्यांच्या पहारेकऱ्यांनी त्यांना अन्न सेवन करण्याबद्दल पुष्कळ सांगितले पण त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यांना काही उपवास घडले. शेवटी हि बातमी बादशाहाला कळवण्यात आली.
बादशाहाच्या आज्ञेने त्यांना वधस्तंभाकडे नेण्यात आले. तेथे त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. राजांचे डोके औरंगाबादेहून बुऱ्हाणपूरपर्यंत फिरवण्यात आले. यानंतर ते दिल्लीला नेण्यात येऊन शहराच्या द्वारावर लटकावण्यात आले.”
(संदर्भ - मोगल मराठा संघर्ष पान ३० ते ३१)
तर हा भरभक्कम पुरावा देण्याचं कारण असं की,
“संभाजी महाराजांच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी ब्राम्हणांनी गुढ्या उभारल्या” या खोट्या प्रचारामागील पाया ज्या विधानावर आधरित होता तो पाया म्हणजे “संभाजी राजांची हत्या ब्राम्हणांनी मनुस्मृतीप्रमाणे केली” आणि तो पायाच भुसभुशीत असुन
केवळ कल्पना विलासावर आधारीत आहे. तो पायाच आलमगीर विजय या ग्रंथातील वर उल्लेख केलेल्या संदर्भाने नष्ट केला आहे. त्यामुळे त्यावर उभारलेली आणि गुढीपाडवा या हिंदु सणाला विरोध करण्यासाठी रचलेली खोटी कहाणी आपोआप खोटी सिद्ध होते.
काही लोक फार तर द्वेष करने शिकवु शकतात, इतिहास नाही 🙏🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#गुढीपाडवा_आणि_युवराज_संभाजी_महाराज
गुढी पाडवा दरवर्षी जसा जवळ येतो तस त्याबद्दल अपप्रचाराला सुरुवात होती. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने ब्राम्हण मंत्र्यांच्या सांगण्यावरून मनुस्मृती कायद्यानुसार केली, आणि त्याच प्रतिक म्हणून त्या दिवसापासून आजचा गुढीपाडवा सण सुरु झाला.
असा कसलाही संदर्भ नसलेला खोटा इतिहास पसरवला जातोय.
मुळात गुढीपाडव्याचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. शालिवाहनांच्या विजयाच प्रतिक म्हणून गुढीपाडवा महाराष्ट्रात इ.स.१ ल्या शतकापासून साजरा होत आलेला आहे. १२ व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी “ज्ञानेश्वरी” लिहली.
त्यामध्ये गुढीचा उल्लेख आलेला आहे, तो हा – “अधर्माची अवघी तोडी | दोषांची लिहिली फाडी | सज्जनाकरवी गुढी | सुखाची उभवी |
संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये गुढीचा उल्लेख आलेला आहे. तो अभंग पुढीलप्रमाणे- “ गोकुळींच्या सुखा | अनतपार नाही लेखा || बाळकृष्ण नंदाघरी | आनंदल्या
दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला......👇
युद्ध म्हटले कि विजय किंवा पराभव.पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का?
या युद्धानंतर काय झाले? खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण ३ पिढ्या मराठ्यांच्या गेल्या पण कणा मोडला तो गनिमांचा
शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली.अब्दालीचे कंबरडे मोडले घरी जाऊन तो मेला.अर्यावार्ताला पुन्हा सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही. हेच तर साधायचे होते या युद्धातून! साधले! पराभव कुठे झाला?
पानिपत हि मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती आहुती म्हणजे देशप्रेम.
#छ्त्रपती_संभाजी_महाराज🚩 #मराठी#म
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील कामगिरीचे वैशिष्ट्य असे की, त्यांना आपल्या कारकिर्दीत एकट्या मोगलांशीच संघर्ष करावा लागला असे नाही; तर सिद्दी आणि पोर्तुगीज या दोन प्रबळ आरमारी सत्तांशीही त्यांना झुंज द्यावी लागली.
(१/८)
१६८२ ते १६८४ या कालातील महाराजांच्या हालचाली पाहिल्या तर असे दिसून येते की, हा मराठ्यांचा राजा स्वराज्यात घुसणाऱ्या मोगली फौजांशी लढत असतानाच या दोन शत्रूंशीही संघर्ष करतो आहे. अशा प्रकारे तिन्ही शत्रूंशी लढत असता, त्याच्या पराक्रमाचे कौतुक करण्याऐवजी काही....
(२/८)
इतिहासकारांनी तीन सत्तांशी लढा सुरू केल्याबद्दल महाराजांवरच ठपका ठेवला आहे; पण त्यात काही तथ्य नाही कारण या तिन्ही सत्तांनीच आपणहून संभाजीराजांशी शत्रुत्व सुरू केले होते. तेव्हा अशा शत्रूंवर स्वाऱ्या करून त्यांना शिक्षा करणे, हे राजा म्हणून संभाजीराजांचे आद्य कर्तव्य होते.
(३/८)