#गुढीपाडवा_आणि_युवराज_संभाजी_महाराज
गुढी पाडवा दरवर्षी जसा जवळ येतो तस त्याबद्दल अपप्रचाराला सुरुवात होती. संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने ब्राम्हण मंत्र्यांच्या सांगण्यावरून मनुस्मृती कायद्यानुसार केली, आणि त्याच प्रतिक म्हणून त्या दिवसापासून आजचा गुढीपाडवा सण सुरु झाला.
असा कसलाही संदर्भ नसलेला खोटा इतिहास पसरवला जातोय.
मुळात गुढीपाडव्याचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. शालिवाहनांच्या विजयाच प्रतिक म्हणून गुढीपाडवा महाराष्ट्रात इ.स.१ ल्या शतकापासून साजरा होत आलेला आहे. १२ व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी “ज्ञानेश्वरी” लिहली.
त्यामध्ये गुढीचा उल्लेख आलेला आहे, तो हा – “अधर्माची अवघी तोडी | दोषांची लिहिली फाडी | सज्जनाकरवी गुढी | सुखाची उभवी |
संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये गुढीचा उल्लेख आलेला आहे. तो अभंग पुढीलप्रमाणे- “ गोकुळींच्या सुखा | अनतपार नाही लेखा || बाळकृष्ण नंदाघरी | आनंदल्या
नरनारी || गुढिया तोरणे | करिता कथा गाती गाणे || तुका म्हणे छंदे | येणे वेधिली गोविंदे ||“ याशिवाय संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा व लीळाचरित्रामध्ये सुद्धा गुढीचा उल्लेख आहे. वरील सर्व संत संभाजी महाराजांच्या पूर्वी होऊन गेले. काही ऐतिहासिक कागदपत्रामधून सुद्धा
आपल्याला गुढीपाडवा फार पूर्वीपासून सुरु आहे हे कळते. इ.स. १६३१-३२ मधील एक निवाडपत्र आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा-“ शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई यांनी ग्रहण काळी कडत
जोसी का|| (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहु दिल्हे यास वर्षे तगायत १४८ होतात”
तसेच, मार्गशीष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ म्हणजेच दि. 24 नोहेंबर 1649 रोजीचा एक महजर आहे. महजर म्हणजे न्यायाधीशाचे अंतिम लिखित मत.
सदर महजरात “गुढियाचा पाडवा” असा स्पष्ट उल्लेख आहे. वरील पुराव्यावरून “गुढीपाडवा” हा सन १८८९ च्या पूर्वी पासून महाराष्ट्रात साजरा होत आलेला आहे आणि पाडव्याला गुढ्या उभारत असत हे सिद्ध होते.
परत असा आक्षेप घेतला जातो कि, संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने मनुस्मृती प्रमाणे केली.
हे धादांत खोट आहे. याचा कसलाही पुरावा नाही. औरंगजेब हा कट्टर धार्मिक होता. इस्लामी राज्ये हि धर्माधिष्टीत होती म्हणजे त्या राज्यात धर्माने सांगितलेले नियम चालत. दुसऱ्या धर्मियांच ऐकण म्हणजे धर्मद्रोह व पर्यायाने राजद्रोह ठरत. औरंगजेब असा द्रोह करेल का? संभाजी महाराजांना
पकडल्यापासून ते त्यांची हत्या करण्यापर्यंतचा काळ आपल्याला फारसी साधनामधून जास्त कळतो. सुमारे चारशे वर्ष सातवाहन घराण्यातील राज्यांनी राज्य केल. सातवाहनांचे साम्राज्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर होते म्हणून महाराष्ट्रात किवा त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात गुढीपाडवा साजरा होतो.
एवढंच नाही तर संभाजी महाराजांचे पुत्र म्हणजेच थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी 1739 मध्ये मिरजेवर स्वारी केली. ते समारंभाला स्वारी बाहेर काढत. त्या वेळेस त्यांनी शहरात गुढ्या उभ्या केल्या होत्या (संदर्भ-मराठी रियासत. ५ पुण्यश्लोक शाहू,
२ पेशवा बाजीराव. लेखक- गो स सरदेसाई).
आता तर सारे प्रश्नच मिटले. गुढीपाडव्याचा संभाजी महाराजांच्या हत्येशी काहीही संबंध नाही हे यावरून स्पष्ट होते - रवि ठाकरे
संदर्भ-
१) शिवचरित्र साहित्य खंड १
२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २०
३) शिवकालीन पत्रसारसंग्रह
४) मराठी रियासत
५) शककर्ते शिवराय,
६) प्राचीन भारत
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#संभाजीराजेंची_हत्या_आणि_गुढीपाडवा
औरंगजेबाच्या दरबारातील आणि शंभूराजांच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ईश्वरदास नागर याने लिहिलेल्या “फुतूहात-इ-आलमगीर” या ग्रंथातील
संदर्भ:- (मूळ फारसी भाषेत असलेल्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी केले.)
“बादशहाच्या आज्ञेप्रमाणे इखलास खान आणि बहादूर खान हे संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांना घेऊन बादशहाच्या छावणीत पोहोचले. बादशाहने आज्ञा केल्यावरून इखलास खान आणि हमिदुद्दीनखान यांनी संभाजीराजे, कवी कलश आणि त्यांचे इतर साथीदार यांची हजार प्रकारे फजिती करण्यात आली.
त्यांना छावणीत आणण्यात आले. संभाजीराजेंनी बादशहा संबंधी न झेपणारे शब्द उच्चारले आणि त्याची निंदानालस्ती केली.
त्यांनी जे काही म्हटले ते रुहुल्लाखानाने बादशहाला सांगितले नाही पण ते बोलणे कशाप्रकारचे होते याचा इशारा दिला.
दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला......👇
युद्ध म्हटले कि विजय किंवा पराभव.पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का? मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का?
या युद्धानंतर काय झाले? खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण ३ पिढ्या मराठ्यांच्या गेल्या पण कणा मोडला तो गनिमांचा
शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली.अब्दालीचे कंबरडे मोडले घरी जाऊन तो मेला.अर्यावार्ताला पुन्हा सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही. हेच तर साधायचे होते या युद्धातून! साधले! पराभव कुठे झाला?
पानिपत हि मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती आहुती म्हणजे देशप्रेम.
#छ्त्रपती_संभाजी_महाराज🚩 #मराठी#म
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील कामगिरीचे वैशिष्ट्य असे की, त्यांना आपल्या कारकिर्दीत एकट्या मोगलांशीच संघर्ष करावा लागला असे नाही; तर सिद्दी आणि पोर्तुगीज या दोन प्रबळ आरमारी सत्तांशीही त्यांना झुंज द्यावी लागली.
(१/८)
१६८२ ते १६८४ या कालातील महाराजांच्या हालचाली पाहिल्या तर असे दिसून येते की, हा मराठ्यांचा राजा स्वराज्यात घुसणाऱ्या मोगली फौजांशी लढत असतानाच या दोन शत्रूंशीही संघर्ष करतो आहे. अशा प्रकारे तिन्ही शत्रूंशी लढत असता, त्याच्या पराक्रमाचे कौतुक करण्याऐवजी काही....
(२/८)
इतिहासकारांनी तीन सत्तांशी लढा सुरू केल्याबद्दल महाराजांवरच ठपका ठेवला आहे; पण त्यात काही तथ्य नाही कारण या तिन्ही सत्तांनीच आपणहून संभाजीराजांशी शत्रुत्व सुरू केले होते. तेव्हा अशा शत्रूंवर स्वाऱ्या करून त्यांना शिक्षा करणे, हे राजा म्हणून संभाजीराजांचे आद्य कर्तव्य होते.
(३/८)