कॉफीचा स्टॉक संपवायचा म्हणून बनवली आणि जगप्रसिद्ध झाली
अमेरिकेन स्टॉक मार्केटमध्ये १९२९ मध्ये मोठा क्रॅश झाला होता. या क्रॅशमुळे जगभरात सगळीकडे कॉफीच्या किंमती पडल्या. इतक्या पडल्या की उत्पन्नाचा खर्चही निघेल की नाही याची शास्वती नव्हती. #म#मराठी#nescafe
लॉसमध्ये विकण्यापेक्षा साठवलेली बरी म्हणून जगात कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या ब्राझील या देशाने कॉफी विकलीच नाही. परिणामी देशात मोठ्या प्रमाणावर कॉफीचा साठा तसाच पडून राहिला. #म#मराठी
यावर उपाय म्हणून ब्राझीलने थेट नेस्ले या कंपनीला साकडे घातले. आमच्याकडे असलेल्या जास्तीच्या कॉफीचा वापर करून काहीतरी बनवता येईल का? अशी विचारणा करण्यात त्यांनी केली. नेस्लेने हे आव्हान स्विकारण्याचे ठरवले. #म#मराठी
त्यांनी आपला कॉफी स्पेशालिस्ट मॅक्स मॉरगनथॅलर याला हा प्रोजेक्ट दिला. त्याआधी जगात कॉफी नव्हतीच असे नाही. पण मॅक्सवर जबाबदारी असलेला प्रोजेक्ट काहीसा वेगळा होता. #म#मराठी
त्याला अशी कॉफी बनवायची होती की ज्यात फक्त पाणी टाकले की कॉफी तयार होईलच शिवाय त्याला कॉफीचा फ्लेवर देखील असेल. याआधी असे काही प्रॉडक्टस बाजारात आले होते. पण त्यांना क्वालिटी आणि चव म्हणावी तशी जमली नव्हती. #म#मराठी
मॅक्सने १९२९ मध्ये काम सुरू केले तरी यश येण्यासाठी त्याला तब्बल ९ वर्षे मेहनत करावी लागली आणि अखेरीस १९३८ मध्ये त्याने ही इन्स्टंट कॉफी बनवली. नेस्लेने ही कॉफी बनवली म्हणून त्यांच्या नावाची पहिली तीन अक्षरे आणि कॅफे असे वापरून या कॉफीचे नेसकॅफे असे नामकरण करण्यात आले. #म#मराठी
१ एप्रिल १९३८ मध्ये नेसकॅफे स्वित्झर्लंडमध्ये लाँच करण्यात आली. तिला तिथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण नेसकॅफेला खरी प्रसिद्धी दुसऱ्या महायुद्धात मिळाली. या महायुद्धात अमेरिकन सेनेला दिल्या जाणाऱ्या रेशनमध्ये नेसकॅफेचा समावेश असे. #म#मराठी
सैन्याला ही बनवायला सोपी, पटकन बनणारी आणि चविष्ट कॉफी प्रचंड आवडली. त्यांनीच या कॉफीचे मार्केटिंग सगळीकडे केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यामुळे नेसकॅफेला इतर देशांतूनही भरपूर मागणी वाढली. अमेरिकेबरोबरच फ्रान्स, ब्रिटन, स्वित्झर्लंडमध्ये ही कॉफी लोकप्रिय झाली. #म#मराठी
नेसकॅफेच्या नावावर काही अफाट विक्रमसुद्धा आहेत.
१९५३ मध्ये एडमंड हिलरी आणि तेंझिंग नोर्गे जेव्हा एव्हरेस्ट शिखरावर गेले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत नेसकॅफेचा टिन नेला होता. #म#मराठी
१९६९ मध्ये जेव्हा निल आर्मस्ट्रॉंग अपोलो ११ मधून चंद्रावर गेला तेव्हा त्यानेही आपल्यासोबत नेसकॅफे नेली होती. चंद्रावर जाणारी पहिली कॉफी बनण्याचा मान या निमित्ताने नेसकॅफेला मिळाला. #म#मराठी
आजमितीला जगातील १८० हून अधिक देशांमध्ये नेसकॅफे विकली आणि प्राशन केली जाते.
थ्रेड आवडल्यास रिट्विट करायला विसरू नका. हा थ्रेड सलग वाचण्यासाठी या लिंकचा वापर करा. wp.me/pd3HmR-GW
उद्यापासून मॅकडोनाल्डने पिझ्झा बनवायला सुरुवात केली तर? या कंपनीची साईझ पाहता त्यांच्यासाठी हे करणे फार अवघड नाही. याच्याउलट डॉमिनोज किंवा पिझ्झा हट बर्गर का बनवत नाहीत? तेही बर्गर बनवूच शकतात की? #म#मराठी
महिंद्रा जसे ट्रॅक्टर बनवते तसेच टाटा का बनवत नाही? त्यांच्याकडे अशी क्षमता आहेच की? तरीही टाटा असे करत नाहीत.
पण आपल्या प्रॉडक्ट ऑफरिंग सोडून वेगळे काहीतरी करणे या कंपन्यांच्या तत्वात बसत नसेल. #म#मराठी
त्यासाठी लागणार वेळ, कष्ट, पैसा त्यांच्या सध्याच्या प्रॉडक्टसवर खर्च करून आणखी काहीतरी चांगले आपल्या कस्टमर्सला देता येईल असाही विचार असू शकेल. #म#मराठी
एलआयसी ही भारत सरकारची कंपनी आहे. आता आयपीद्वारे सरकार या कंपनीतला आपला काही हिस्सा विकणार आहे. हा हिस्सा विकला तरीही बराचसा हिस्सा सरकारकडे कायम असणार आहे. #म#मराठी#LIC#LICIPO
मग ही सरकारी कंपनी आयपीओनंतर प्रायव्हेट झाली तर तिचा कारभार कसा चालणार? जे नवे लोक एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील त्यांच्या कंपनीकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या असल्या तर काय करायचे? असे काही प्रश्न या निमित्ताने उभे राहतील. #म#मराठी#LICIPO
१. सरकार आपला हिस्सा किती आणि कसा कमी करणार?
आयपीओच्या नियमानुसार सरकारला एलआयसीमधील कमीत कमी ५% हिस्सा कमी करावा लागेल. कंपनीचे लिस्टिंग झाल्यावर दोन वर्षात आणखी १०% आणि नंतर पुढच्या पाच वर्षात २५% पर्यंत हिस्सा कमी करावा लागेल.
एलआयसीचा आयपीओ लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. या आयपीओची साईज साधारण ५३,००० ते ९३,००० कोटींच्या घरात असेल असा अंदाज अनेक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. हा आयपीओ भारतीय मार्केटमधील सर्वात मोठा असेल.
तुम्ही एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू, पण या आयपीओचा थेट परिणाम होऊ शकतील असे चार घटक या थ्रेडमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. #म#मराठी#lic#LICIPO
१. CDSL - एलआयसीने आपल्या आयपीओमध्ये १०% कोटा आपल्या पॉलिसीहोल्डर्ससाठी राखीव ठेवला आहे. यातले बरेच लोक असे असणार आहेत की जे पहिल्यांदा डिमॅट अकाऊंट ओपन करतील. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांचे साधारण २९ कोटी पॉलिसीहोल्डर्स आहेत.
२००० रुपये भांडवल ते ५०० कोटी रेव्हेन्यू - प्रवास विजय सेल्सचा
नानू गुप्ता. हे नाव बऱ्याच जणांना माहित नसेल. अनेकजणांना हा थ्रेड वाचून पहिल्यांदा हे नाव माहित होईल. पण याच नानू गुप्तांनी विजय सेल्स सुरु केलं असं सांगितलं तर लिंक लागेल. #म#मराठी#VijaySales
तर हे नानू गुप्ता १९५४ साली हरयाणा सोडून मुंबईला नोकरीच्या शोधात आले. आलेल्या माणसाला आपल्यात सामावून घेते तसंच मुंबईने त्यांनाही सामावून घेतलं. शिवणयंत्र आणि फॅन्स बनवणाऱ्या ऊषा कंपनीच्या एका डिस्ट्रिब्युटरकडे नानू सेल्समन म्हणून नोकरी करू लागले. #म#मराठी#VijaySales
काही दिवस नोकरी करून नानू कस्टमर लोकांशी कसं बोलायचं, व्यवहार कसे करायचे हे शिकले. ते झाल्यावर आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हणून त्यांनी नोकरी सोडली. मित्रांकडून २००० रुपये भांडवल उधार घेऊन माटुंग्यामध्ये एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं #म#मराठी#VijaySales
हा थ्रेड काहीजणांनी इंग्रजीत वाचला असेल. पण खास आपल्या मराठी वाचकांसाठी मुद्दाम हा थ्रेड तुम्हाला समजेल अशा भाषेत मांडतो आहोत.
बाजारात एखादी अवाढव्य कंपनी असते. तिला आपला पसारा आणखी वाढवायचा असतो. त्यासाठी ती कंपनी छोट्याछोट्या कंपन्या टेकओव्हर करत जाते. #म#मराठी#एचयूएल
आपला व्यवसाय वाढवण्याची ही मार्केटमधील जुनी स्ट्रॅटेजी आहे.
नव्वदच्या दशकात हिंदुस्थान लिव्हरने (आताची एचयूएल) हीच स्ट्रॅटेजी वापरून टाटा ऑइल मिल्स कंपनी टेकओव्हर केली. #मारिको#एचयूएल
त्यामुळे टाटाचं हेअर ऑइल टाटा निहार आता हिंदुस्थान लिव्हरकडे आलं. या निमित्ताने हेअर ऑइल मार्केटमध्ये त्यांचा प्रवेश झाला.
त्यावेळी निहार ऑइलचा मार्केट शेअर होता जेमतेम ७% आणि हेअर ऑइल मार्केटचे दादा होते, पॅराशूट ऑइल. त्यांचा मार्केट शेअर होता ४८%. #निहार
आयटीसीसारखी बलाढ्य कंपनी आपल्या प्रॉडक्टसच्या पॅकेजिंगवर किती बारीक लक्ष देते याचं एक उदाहरण.
परवा फ्लाईटमध्ये आयटीसीच्या 'बी नॅचरल' ब्रँडचा ज्यूस घेतला. ज्यूस संपवल्यानंतर साहजिकच रिकाम्या बाटलीवरील डिटेल्सवर लक्ष गेलं. तेव्हा आयटीसीच्या पॅकेजिंगमागील कल्पकता लक्षात आली. #ITC
Use the alphabets from the blanks to know that B Natural is made with 100% _ _ _ _ _ N fruit, 0% concentrate.
गोष्ट तशी छोटी आणि साधी. पण आयटीसीच्या पॅकेजिंग विभागाने यातही कल्पकता पणाला लावलेली दिसते. साहजिकच ज्युसची बाटली वापरणारा माणूस ह्या रिकाम्या जागा भरून त्यातून 'इंडिया' हा शब्द तयार करणार. #म#मराठी#ITC