हिंदुनृसिंह शिवछत्रपतींच्या नावाने राजकारण करणे - हे महाराष्ट्राला काही नवीन नाही.
आजकाल तर छत्रपतींच्या वंशजांचा सोयीनुसार वापर उघड-उघड बघायला मिळतो.
राष्ट्रवादीत असणारे उदयनराजे चालतात पण भाजप मध्ये असणारे उदयनराजे नाही.
१/७
येवढंच काय तर भाजपतर्फे निवडणूक लढवणार असल्यापासून निवडणूकीचा निकाल येईपर्यंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर वयक्तिक पातळीवर गलिच्छ टीका ही करण्यात आली.
त्या वेळी छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपतींचे वंशज आहेत हे महाराष्ट्र विसरलेला का?
२/७
जेव्हा शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे वंशज असल्याचे पुरावे मागितलेले तेव्हा छत्रपती उदयनराजे भोसले आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा अपमान झाला नव्हता का?
का नेहमीप्रमाणे एका माणसाने महाराष्ट्राला मूर्ख बनवलेलं?
३/७
महाराष्ट्रात युवराज संभाजीराजे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी/समर्थन देण्यावरुन बरंच राजकारण रंगलेलं आहे.
भाजपने युवराज संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा द्यावा पण शिवसेना/राष्ट्रवादी पाठिंबा तेव्हाच देतील जेव्हा युवराज शिवबंधन बांधतील - या बाष्कळपणावर कोणी काही बोलणार का?
४/७
म्हणजे शिवसेनेत पक्षप्रवेश करुन राज्यसभेवर जाणारे युवराज संभाजीराजे चालतील पण भाजपशी जवळीक साधणारे युवराज संभाजीराजे चालणार नाहीत.
#महाविकासआघाडी च्या समर्थकांनी युवराज संभाजीराजेंवर हव्या त्या शब्दात टीका केलेली चालेल पण #भाजप च्या समर्थकांनी टीका करायची नाही.
५/७
पुरुषोत्तम खेडेकर सारख्या व्यक्ति बरोबर संबंध ठेवणारे युवराज संभाजीराजे चालतात पण देवेंद्र फडणवीसांशी संबंध ठेवणारे युवराज संभाजीराजे चालत नाहीत.
म्हणे संभाजीराजे यांनी अपक्ष लढायचा ‘खेळ’ देवेंद्र फडणवीसांचा होता.
असल्यास हरकत काय आहे? राजकारणात खेळंच खेळायचे असतात!
६/७
का फक्त शरद पवारांनाच खेळ खेळायचा अधिकार आहे?
असो, मुद्दा साधा आणि सरळ आहे. सोयीच्या राजकारणासाठी महाविकासआघाडी ला छत्रपती शिवराय आणि त्यांचे वंशज आठवतात.
अजून एक - लोकशाहीत राजकारण होणारंच! टीका ही होणारंच! आणि सगळ्यांवर होणार!
मर्यादा पाळली गेली पाहिजे हे मात्र खरे.
७/७
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
शिवसमाधी ची चळवळ १८९६-९७ मध्ये लोकमान्य टिळकांनी केली ही गोष्ट तर महात्मा फु्ले यांचे अनुयायी आणि थोर सत्यशोधक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहून ठेवलेलं आहेच.
फक्त पूर्ण सत्याची आव्हाड साहेबांना कल्पना दिसत नाहीये.
२/४
लोकमान्यांनी लोकवर्गणीतून जमा केलेला पैसा ज्या बॅंकेत होता ती बॅंक बुडाली.
हे नुकसान झाले असताना ही जेव्हा १९२५-२६ साली शिवसमाधी चे काम इंग्रजांनी ‘श्री शिवाजी रायगड स्मारक समिती’ सोबत सुरु केले, तेव्हा समिती ने ही खर्चासाठी पैसे दिलेल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.
#Thread: पुण्यशील राजमाता सुमित्राराजे, शिवशीहर बाबासाहेब पुरंदरे आणि इंदिरा गांधी
इ.स. १९८० मध्ये रायगडावर ३०० वी शिवपुण्यतिथी झाली त्यावेळी गो.नी.दाण्डेकरांनी एक अभूतपूर्व उपक्रम राबविला होता.
१/५
महाराष्ट्रातल्या शेकडो गड-किल्ल्यांवरील तसेच भारतभरातल्या नामांकित तीर्थक्षेत्रांच, नद्यांचे जल शेकडो कार्यकर्त्यांशी पत्रांनी संपर्क करून रायगडावर आणले आणी महाराजांच्या समाधीला त्यांचा अभिषेक करविला.
२/५
जसे १६७४ मध्ये महाराजांच्या राज्याभिषेकावेळी जल आणले गेले होते तसे.
या कार्यक्रमाला पंतप्रधान इंदिरा गांधी रायगडावर उपस्थित राहिल्या होत्या.
#Thread: धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, औरंगजेब आणि इस्लाम
मरणाला त्या मारुनी तुम्ही, मोक्षाला गेला येथे।
ज्वज्ज्वलनतेजस तुम्ही राजे, गौरविला गेला येथे॥
आज मृत्यूंजय अमावस्या - धर्मवीर शंभुछत्रपतींची पुण्यतिथी.
सर्वप्रथम या स्वधर्माभिमानी महापुरुषास त्रिवार वंदन💐🙏🏼
१/१४
१६८० साली पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या कैलासवासानंतर स्वराज्याची जबाबदारी संभाजीराजेंनी “राजेश्री आबासाहेबांचें जें संकल्पित तेंच करणें आम्हांस अगत्य” असं म्हणत उत्तमरित्या सांभाळली.
मोगल, सिद्दी, फिरंगी (पोर्तुगीज), टोपीकर इंग्रज - या सर्व शत्रुंशी संभाजीराजे लढत होते.
२/१४
मराठे मोगलांवर भारी पडत होते. म्हणून दस्तुरखुद्द दिल्लीपती औरंगजेब मराठ्यांना संपवण्याच्या हेतूने स्वराज्यावर चालून आला.
दिल्ली सोडून २५ वर्षे त्याने महाराष्ट्रात घालवली. पण मराठ्यांना संपवणे हे त्याच्या सामर्थ्यापलिकडचे होते.
मराठा फौजेचे सेनापती, करवीरकर छत्रपतींचे पेशवा आणि नानासाहेब पेशव्यांचे दिवाण - अशा तिन जबाबदाऱ्या निभावणाऱ्या सदाशिवराव भाऊंना मल्हारबा व इतर थोर सरदार म्हणाले -
“आम्ही काही जिवाचा तमा धरीत नाही. हा जीव तुम्हावरून सदका आहे…
१/१३
…महाराजाचे पुण्य मस्तकी असतां दुरानीचा (अब्दालीचा) तमा तो काये? मारून गर्दीस मेलवितो. भाऊसाहेब तुम्ही काही चिंता न करणे.”
असे पुरुषार्थाचे बोल बोलून सर्व सरदार घोड्यावर स्वार होऊन निघाले.
२ उंच व शक्तिशाली हत्ती - रणरंगधीर व गजराज यांना ऐरावतासारखे तयार करण्यात आले.
२/१३
रणरंगधीरावर स्वतः भाऊसाहेब विराजमान होते तर गजराजावर विश्वासराव.
भीमगर्जनेसारखा तिसरा नगारा होताच हे दोन हत्ती पुढे निघाले.
१२ जानेवारी, १७०८ रोजी साताऱ्यात संभाजीपुत्र शाहू हे छत्रपती झाले.
हिंदुपदपादशाह, अजातशत्रू व पुण्यश्लोक या बिरुदावली ज्या शाहूछत्रपतींसाठी वापरल्या गेल्या ते शाहूछत्रपती कधी कोणाला कळले का? - हा प्रश्न मला नेहमी पडतो.
रियासतकारांनी शाहूंना ‘पुण्यश्लोक’ म्हटलं तर जयसिंगराव पवारांनी शाहूंना ‘शिवाजी कधी कळलाच नाही’ अशी टिपण्णी केली.
पण ह्यात चूक कोणाची होती? ७ वर्षांचा असताना ज्याच्या वडीलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, पुढची १८ वर्ष ज्याने औरंगजेबाच्या कैदेत काढली अशा राजकुमार शाहूची?
२/११
निश्चितंच नाही. ही चूक होती नियतीची.
जो राजकुमार १८ वर्ष मोगलांचा कैदी होता तो कधी ही स्वराज्यापासून तोडला गेला नाही हे त्याच्या पूर्वजांचे पुण्य होते.
१८ वर्ष जवळून मोगलांचा अनुभव घेतलेल्या शाहूछत्रपतींनी वेळो-वेळी ह्याच अनुभवाचा वापर करुन मोगलांना मात दिली होती.