जन्माला आल्यापासून ते मृत्यूपावेतो प्रत्येक क्षणी केवळ आणि केवळ गुरुंच्या मार्गदर्शनाने ह्या अपार संसारसागरात मनुष्य वावरु शकतो, म्हणून प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
२/२५
'गुरू' शब्दाच्या व्याख्येचा विचार करायचा झाला तर, शास्त्रकार सांगतात,
गुरु - गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।
अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते।।
अर्थात 'गु' कार म्हणजे अज्ञानरुपी अंधकार व 'रु' कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज.
३/२५
जीवाच्या अज्ञानरुपी अंधकाराला दूर करून त्याला ज्ञानरूपी प्रकाशाची अनुभूती करून देतात तेच गुरू असतात.
"आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा।।" असणारे देवाधिदेव महादेव असतील किंवा "सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति।।"असे सांगणाऱ्या म्लान झालेल्या अर्जुनास गीतामृताचे अमोघ ज्ञान देणारे
४/२५
जगद्गुरु श्रीकृष्ण असतील, यांनी समायुक्त असलेल्या 'गुरू-शिष्य' परंपरेद्वारे भारतीय संस्कृतीतील दिव्य ज्ञानाचा प्रवाह अविरत प्रवाहित होत आहे.
५/२५
एकनाथी भागवतात 'अवधूत-यदु' संवादात अवधूत सांगतात,
"जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण।
गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे॥
ज्याचा गुण घेतला । तो सहजें गुरुत्वा आला।
ज्याचा गुण त्यागरूपें घेतला ।
तोही गुरु झाला अहितत्यागें॥
६/२५
एवं त्यागात्यागसमतुकें । दोहींसी गुरुत्व आलें निकें।
राया तूं पाहें पां विवेकें । जगचि अवघे गुरु दिसे॥"
-एकनाथी भागवत, ७.३४१-४३
(अवधूत-यदू संवाद)
मी ज्या ज्याकडून कुठला ना कुठला गुण घेतला त्याला मी माझे गुरू केले. तसेच ज्याचा गुण त्यागरूपे घेतला म्हणजे जिथून काय करू नये हे
७/२५
शिकलो त्यांनाही मी गुरू केले. विवेकदृष्टीने पाहिले असता हे संपूर्ण जगच माझे गुरू आहे कारण प्रत्येक जीव,वस्तू,साधनांकडून मला काही ना काही ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. दत्तात्रयांनी सूर्य,वायू,समुद्र,हत्ती आदी २४ वेगवेगळ्या प्रकारचे गुरू केले.
८/२५
समर्थांनी दासबोधात गुरुविषयी सांगताना मातापिता,मंत्रगुरू,यंत्रगुरू वैगरे १७ प्रकारचे गुरू सांगितले आहे.
आपल्या बालपणापासून आपले आई वडील,शाळेतील शिक्षक,महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच आपले आप्तेष्ट आदी व्यक्तींकडून आपल्याला काही ना काही शिकायला भेटते म्हणून ते सर्व आपले
९/२५
म्हणून ते सर्व आपले त्याबाबतीत आपले गुरू आहेत. गुरूंची महती सांगताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात,
"सायिखडयाचे बाहुले। चालवित्या सुत्राचेनि चाले।
तैसा माते दावीत बोले। स्वामी तो माझा।।१७६८।।"
(ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा)
१०/२५
ज्याप्रमाणे बाहुलीचा खेळ करणारा दोरीच्या साहाय्याने बाहुलीस चालवतो, त्याप्रमाणे या जगतात मी केवळ एक बाहुली आहे व मला ज्ञानरूपी सूत्राने माझे गुरू या जगतात चालवितात.
आता महत्त्वाचा प्रश्न आहे की सद्गुरू म्हणजे कोण..? दासबोधात याविषयी समर्थ सांगतात,
११/२५
जो ब्रह्मज्ञान उपदेसी।अज्ञानअंधारे निरसी।
जीवात्मया परमात्मयांसी। ऐक्यता करी।।
प्राणी मायाजळी पडीले।संसारदुःखे दुःखवले
ऐसे जेणे मुक्त केले।तो सद्गुरू जाणावा।।।।श्रीराम।।
(दासबोध गुरू लक्षण समास)
म्हणजेच जे जीवास ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात.
१२/२५
त्याचं मायारुपी विश्वाचे अज्ञान दूर करतात,संसार दुःखातून मुक्त करतात.जीवाची परमात्म्याशी ऐक्यता करतात ते सद्गुरू जाणावेत. सद्गुरुंचे लक्षण काय असतात यावर भागवत ११ व्या स्कंधात बोलते,
१३/२५
"तस्माद्गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम्।
शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम्।।
अ०३ श्लोक२१"
याचा भावार्थ असा की, 'शाब्दे निष्णातं' म्हणजेच सकलवेदशास्त्राचे ज्ञान ज्यांच्याकडे आहे व जे 'परे निष्णातं' म्हणजेच ब्रह्मनिष्ठ आहेत तेच 'सद्गुरू' जाणावेत...!
१४/२५
या दोन्ही लक्षणांचे प्राकट्य असलेले सद्गुरू अनात्म विवेकामुळे ह्या जन्ममरणरुपी संसाराला सत्य मानून ह्यातच गुंतून राहून सुखादुःखास प्राप्त होणाऱ्या जीवास ह्या मायारूपी संसाराच्या मिथ्यत्त्वाची जाणीव करून देतात व 'ब्रह्म सत्य जगन् मिथ्या।' हे सत्य पटवून देतात.
१५/२५
सद्गुरू आपल्या ज्ञानाच्या होडीतून जीवास ह्या संसाररुपी भवसागरातून पार करून देतात.
भागवत धर्माच्या संत परंपरेतील सर्व संतांनी आपल्या रचनेत सद्गुरुंचे गुणगान केले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी तर ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी आपल्या शब्दकमलांची पुष्पांजली आपले
१६/२५
सद्गुरू निवृत्ती महाराजांच्या चरणी वाहिली आहे. १६ व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज अत्यंत गोड शब्दात वर्णन करतात,
"मावळवीत विश्वाभासु।नवल उदयला चंडांशु।
अद्वयाब्जिनीविकाशु।वंदूं आतां॥१॥
जो अविद्येराती रुसोनियां।गिळी ज्ञानाज्ञान चांदणिया।
जो सुदिनु करी ज्ञानियां।स्वबोधाचा॥२॥
१७/२५
जेणें विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे ।
सांडिती देहाहंतेचीं अविसाळें । जीवपक्षी॥३॥
लिंगदेहकमळाचा । पोटीं वेंचु तया चिद्भ्रमराचा ।
बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय॥४॥ अ १६ ओवी १-४"
विश्वाच्या आभासाला नाहीसा करणारा व अद्वैतस्थितीरुपी कमळाचा विकास करणारा,
१८/२५
हा सद्गुरूरुपी आश्चर्यकारक सूर्य उगवला आहे. जो गुरुरुपी सूर्य मायेच्या रात्रीचा नाश करून, ज्ञान व अज्ञानरूपी चांदण्या नाहीशा करतो व जो ज्ञानी लोकांना अध्यात्मज्ञानाच्या निरभ्र दिवसाची जोड करून देतो. ज्याच्या उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रातःकाळी आत्मज्ञानरुपी दृष्टी प्राप्त
१९/२५
होऊन जीवरुपी पक्षी, मी देह आहे अशा समजुतीची घरटी सोडतात. ज्या गुरूरुपी सूर्याचा उदय झाला असता लिंगदेहरुपी कमळाच्या पोटात नाश पावणाऱ्या जीवचैतन्यरुपी भ्रमराची बंधनापासून सुटका होते.
अशा सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कशी करून घ्यावी यावर भगवद्गीतेत
२०/२५
भगवान श्रीकृष्ण सांगतात,
"तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः।।"
हे अर्जुना,आचार्याकडे जाऊन त्यांना प्रणिपात करणे,प्रश्न करणे व सेवा करणे अशारीतीने तू ज्ञान प्राप्त करून घे. ज्ञानसंपन्न व अनुभवी आचार्य तुला त्या ज्ञानाचा
२१/२५
उपदेश करतील.
या श्लोकावर भाष्य करताना माऊली सांगतात,
"जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा।
तू स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी॥१६६॥
तरी तनुमनुजीवें । चरणासी लागावें।
आणि अगर्वता करावें । दास्य सकळ॥१६७॥
२२/२५
मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें।
जेणे अंतःकरण बोधलें । संकल्पा न ये॥१६८॥
सद्गुरू म्हणजे ज्ञानाचे घर आहेत त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. तू सेवा करून तो स्वाधीन करून घे. एवढ्याकरिता शरीराने,मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावेस आणि अभिमान सोडून
२३/२५
त्यांची सर्व सेवा करावीस. मग आपले जे इच्छित असेल ते त्यांना विचारल्यास ते सांगतात. त्यांच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन परत संकल्पाकडे वळणार नाही.
याप्रकारे सकलगुणनिधान,परम कृपाळू सद्गुरूंकडून ब्रह्मरसाची अनुभूती घेऊन,प्रत्येक जीवाने आपले परमोच्च ध्येय अर्थात
२४/२५
मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी...!
आज ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या मातापिता आदी सर्व आचार्यांच्या चरणी वंदन करून थांबतो..!
ज्या संगतीने विराग झाला।
मनोदरीचा जडभास गेला।
साक्षात परमात्मा मज भेटवीला।
विसरू कसा मी गुरूपादुकेला॥
धन्यवाद.....!
२५/२५
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#Thread
-: फलटणचे श्रीराम मंदिर :-
एखाद्या गावी आपण पहिल्यांदा जावं आणि तिथे जाऊन आपल्याला खंत वाटावी की अरे..! आपण इथे यायला इतका उशीर का लावला..! तसच काहीसं मला फलटण गावी जाऊन वाटलं. तेथील शहररचना, @ShefVaidya@authorAneesh@MulaMutha #Temples#मंदिर#राम
१/
जुनी पण नावीन्यपूर्ण अशी बांधकामं आणि एकंदरीत वातावरण ह्या गोष्टींनी मला प्रचंड प्रभावित केले. त्यात अजून आनंद वाढवणारा 'दुग्धशर्करा योग' म्हणजे फलटणमधील अतिशय सुंदर अशी मंदिरे..! पुरातन असे जब्रेश्वर महादेवाचे मंदिर, गिरवीचे श्रीकृष्ण मंदिर आणि फलटणचे प्रसिद्ध राम मंदिर..!
२/
या सर्व मंदिरांना उत्तम स्थितीत पाहून मनाला अतिशय संतोष वाटला.
त्यात मला श्रीराम मंदिराची भावलेली भव्यता,सुंदरता आणि रमणीयता इथे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
फलटण गावात स्थित असणारे श्रीराम मंदिर हे श्रीमंत निंबाळकर यांच्या राजवाड्याच्या परिसरात आहे.
३/
#Thread #ज्ञानेश्वरी_जयंती
-:अद्वैतामृतवर्षिणी भगवती ज्ञानेश्वरी जयंती :-
आज मराठी भाषेतील सर्वच पैलूने श्रेष्ठ ठरणारा ग्रंथ कुठला असा जर प्रश्न विचारला गेला तर याचे सर्वानुमते केवळ एकच उत्तर आहे तो ग्रंथ म्हणजे 'भगवती ज्ञानेश्वरी'.
१/ @Kal_Chiron@ShefVaidya@swamiyogeshji
कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मज्ञानाचा सागर,भक्तीचा रसकल्लोळ तर मराठी साहित्याचा अद्वितीय आविष्कार आहे.
केवळ संस्कृत भाषेच्या जाणकार लोकांमध्ये सीमित झालेले ब्रह्मज्ञानाचे भांडार ज्ञानेशांनी अगदी सामान्य लोकांना ज्ञानेश्वरीद्वारे खुले करून दिले व त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज
२/
साधकांची 'माऊली' झाली..! आणि त्यानंतर मग जो अमृताचा वर्षाव सगळ्या महाराष्ट्र भूमीवर झाला की अगदी आजपर्यंत साधक लोक त्यात अखंड न्हाहून आपल्या जीवनाची इतिकृत्यता करून घेत आहेत.
योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी गलितगात्र झालेल्या अर्जुनाच्या निमित्ताने भगवद्गीतेचा साक्षात्कार अखिल
३/
#दीपअमावस्या
दीपसूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेजमुत्तमम्।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव।।
आज आषाढ वद्य अमावस्या. आजच्या अमावस्येला 'दीप अमावस्या' देखील म्हणतात. आपल्या सनातन धर्मात आपल्याला आपल्या कार्यात आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी
१/
काही ना काही व्यवस्था केलेली आहे. जसं की सूर्य आपल्याला पाणी प्रदान करतो म्हणून आपण दररोज जल 'अर्घ्य' देऊन त्याविषयी कृतज्ञता दाखवतो. त्याचप्रमाणे दीप हा आपल्याला प्रकाश प्रदान करतो, प्रत्येक जीवास 'तिमिरातून तेजाकडे' जाण्याची प्रेरणा देतो म्हणून ह्या विषयी कृतज्ञता व्यक्त
२/
व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस आहे.
आजच्या दिवशी घरातील सर्व समई नीरांजन वैगरे गोष्टी धुवून स्वच्छ केल्या जातात व नंतर त्याची पूजा केली जाते. आजच्याचं दिवशी समई निरांजन स्वच्छ करण्याचं व पूजा करण्याचं कारण हेच की उद्यापासून श्रावण महिना चालू होणार व
३/
#Thread #गुरुपौर्णिमा
श्रीगुरु आणि सद्गुरु :-
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस भारतवर्षात 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जीवाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्व आहे. आज भारतातील दिव्य ज्ञानामृत केवळ आणि केवळ 'गुरू - शिष्य' परंपरारुपी
१/ #GuruPurnima2021 @ShefVaidya
गंगेतूनचं प्रवाहित होत होत आपल्यापर्यंत आले आहे.
भारतवर्षातील अनेक थोर ऋषीमुनींनी व संत मंडळींनी आपल्या दिव्यवाणीद्वारे गुरुमहिमा सांगितला आहे. त्यापुढे माझा हा लेख म्हणजे सूर्यप्रकाशासमोर एखाद्या पणतीच्या प्रकाशासारखे आहे. पण ह्या थोरामोठ्यांकडून जे
२/
काही मतीस कळाले ते मांडण्याचा प्रपंच इथे करत आहे.
आता महत्वाचा प्रश्न म्हणजे की 'गुरु' या शब्दाची व्याख्या काय? तर शास्त्रकारांनी गुरु ह्या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की,
गुरु -
गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ।।
३/
#कालिदासदिन
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
आज "आषाढस्य प्रथम दिवसे" अर्थात आषाढाचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन..!
महाकवी कालिदासांनी आपल्या दिव्य काव्यप्रतिभेच्या जोरावर अनेक रचना करून संस्कृत
१/ @Kal_Chiron@ShefVaidya
भाषेला अधिकच सुंदर केले आणि समस्त रसिक लोकांना उपकृत केले.
"उपमा कलिदासस्य" ही उक्ती नेहमी सांगितली जाते ज्याचा अर्थ उपमा असावी तर कालिदासासारखी..!
आपण जर कालिदासाच्या काही रचनांवर ओझरती नजर जरी फिरवली तरी आपल्याला त्याचा प्रत्यय येईल..!
रघुवंशात कालिदास म्हणतात,
२/
क्व सूर्यप्रभवो वंशः क्व चाल्पविषयामतिः ।
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनाऽस्मि सागरम् ॥
अर्थात - कुठे तो सूर्यापासून उत्पन्न झालेला वंश आणि कुठे मी (कालिदास) त्यांचं गुणगान करण्याचा प्रयत्न करणारा अत्यंत अल्पमति. हे म्हणजे एखाद्या लहानशा नावेने मोठा सागर पार करण्याचे दिव्य
३/
ही ऐतिहासिक स्थळे आपली उर्जाकेंद्रे आहेत..!
यातून ऊर्जा घेऊन आपण आपल्या कार्यात कार्यरत होऊन आपल्या राष्ट्राला एका नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो..!
ही स्थळे म्हणजे आपल्या दिव्य इतिहासाची व आपल्या थोर पुरुषांची साक्ष देतात. तेंव्हा ही स्थळे
१/ @Vinay1011@malhar_pandey@HearMeRoar21
सुस्थित राहणे ही एका सशक्त राष्ट्राची गरज आहे.
पण खंत आज अशी आहे की आपल्या देशात आपल्या थोर राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना कायम उपेक्षित ठेवून शासनाने केवळ आक्रमकांचा उदो उदो केला आणि ही सर्व दिव्य स्थळे दुर्दशेत गेली.
आता परिस्थिती बदलत आहे हे पाहून हायासे वाटते.
पण सगळा भार
२/
शासनावर का सोडायचा??
आपण पण प्रत्येक नागरिक या राष्ट्राचे आणि या थोर पुरुषांचे काही देण लागतो, तेंव्हा हाच विचार करून @Jhunj_Org ने श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या समाधीचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.
हे काम अत्यंत भव्य आहे कोणा एका व्यक्तीकडून हे पूर्ण होणारे नाही.
३/