पं वसंतराव देशपांडे

02/05/1920 - 30/07/1983
वसंतराव नावाच्या तेजोनिधीचं शारीरिक अस्तित्व 39 वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेलं. मात्र त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा लोहगोल आजही अतिशय प्रखर तळपत आहे. वसंतरावांच्या असण्याला जितक्या छटा होत्या, तितक्या फारच क्वचित इतर कोण्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वांना असाव्यात.
👇
वसंतरावांचा अभिनय बघितला की वाटायचं, यांचा जन्म बालगंधर्वांच्या कुळात झाला असावा; वसंतरावांचं तबलावादन ऐकलं की वाटायचं, हे आणि थिरकवा एकाच शाळेत तबला शिकले असतील; वसंतरावांची गझल ऐकून वाटतं की हे कुठंतरी लखनौला जन्मले असतील आणि तिथं त्यांना आपसूकच गझल गाता यायला लागली असेल
👇
अगदी बेगम अख्तर सुद्धा त्यांच्याकडे जेव्हा गझलच्या मुरक्यांबद्दल सल्लामसलत करत तेव्हा वसंतराव हे त्यांचे गुरु वाटत; आणि गाणाऱ्या वसंतरावांकडे बघताना वाटायचं- त्यांच्या पेशींमध्ये एकेक राग इतका भिनलाय की आता त्यांना नको असलं तरी स्वतःवरचं रागांचं गारुड अमान्य करता येणार नाही.
👇
मित्रांनो, अतिशय प्रतिभावान अशा डॉ वसंतरावांच्या अभिनय/तबलावादन/गायकीविषयी बोलण्याची नसलेली पात्रता माहित असूनही मी भारावलेपणाने त्यांच्या काही रागांमध्ये सौंदर्य निर्माण करण्याच्या पद्धतीविषयी आज इथं व्यक्त होतोय.
👇
वसंतरावांचा रागाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार म्हणजे फारच वेगळा होता. त्यांच्या सिग्नेचर ताना अशक्यप्राय नव्हत्या असं नाही; पण ते सौंदर्य नेमकं कुठं आणि किती वापरायचं याची समज फक्त वसंतरावांकडे होती. आणि अशी सांगीतिक समज उपजत असणं हे त्यांना इतरांपासून वेगळा सौंदर्योपासक बनवतं.
👇
उदाहरणार्थ, आपण हा मालकंस बघा. यात वसंतराव ज्या पद्धतीने सुरुवात करत आहेत, असं वाटावं की मोर आपला पिसारा उलगडत असावा. मालकंस गायनासाठी तसा फार अवघड राग नाही. अनेकजण सहज गातात. पण वसंतरावांच्या सादरीकरणातलं सौंदर्य काही निराळंच.

संपूर्ण
👇


👇
जितका सुंदर मालकंसमधला वरील आलाप आहे, तितकाच सुंदर मधुकंस आहे. मधुकंस हा राग मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलाच वसंतरावांचा. मधुकंसच्या काय एकेक छटा रंगवल्या आहेत! आणि इथं सोबतीला आप्पा जळगावकर आहेत म्हटल्यावर तर वसंतरावांचं बहरणं विचारायलाच नको!

संपूर्ण ऐका
👇
राग चंद्रकंस विषयी मी मागे एक थ्रेड लिहिला होता. त्यात मी त्या रागाचं सौंदर्य, व्याकरण याबद्दल थोडं लिहिलं होतं.
इथे 👇तो वाचू शकता.
रंजनी-गायत्री या वरच्या थ्रेडमध्ये एक अभंग सादर करतायत; जो उपशास्त्रीय कर्नाटकी पद्धतीने वेगवान आहे, इथं वसंतराव सादर करतायत तो उत्तरेकडील ख्यालगायकीला बांधलेला विलंबित आहे. हा विलंबित परफॉर्मन्स शीतल आहे, शांत आहे, दाह मिटवणारा आहे. ऐकाच.

संपूर्ण
👇
वसंतरावांचे चंद्र/मधू/मालकंस हे राग जितके वरचा क्लास प्रकारातील, तितकेच उत्तुंग 'कौन्सी कानडा' सारखे जोडराग सुद्धा. इथं पुन्हा ते एक सिग्नेचर तान घेऊन रागाच्या व्याकरणाचं नवं तोरण बांधतात. आणि हे तोरण म्हणजे सौंदर्याने नटलेलं इंद्रधनूच जणू!

संपूर्ण
👇

तोडीचा एक प्रकार आहे, त्याचं नाव आहे- सालग-वराळी. हा राग फार कमी जणांना माहित आहे; आजकालचे गायकही या प्रकाराला फार सादर करताना आढळून येत नाहीत. फार गुंतागुंतीचा हा राग वसंतरावांनी सवाई गंधर्व मध्ये सादर केला होता. इथंही त्यांच्या सिग्नेचर ताना घेऊन त्यांनी फार मजा आणली आहे!
👇
हा सवाई गंधर्व फेस्टिव्हलमध्ये वसंतरावांनी सादर केलेला सालग-वराळी संपूर्णपणे ऐका इथं.
👇
मारू बिहाग रागाला जे डायमेन्शन वसंतरावांनी दिलेलं आहे, ते अगदी अशक्यप्राय आहे. कोणत्याही रागाबद्दलचं संपूर्ण ज्ञान आपण नक्कीच या द्रुतगतीने सादर केलेल्या 'मै पतिया लिख भेजी' या छोट्या ख्यालामध्ये स्पष्ट होतं. या रागाचा विलंबितही कहर आहे!
संपूर्ण ऐका इथं
👇
वसंतरावांनी सर्वात जास्त मास्टरी केलेला राग म्हणजे "मारवा". ते मारवा रागाचे अनभिषिक्त सम्राट म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांच्यासारखा गगनभेदी मारवा त्यांच्यानंतर झाला नाही, असं पुल सांगत. इथं मारवा सादर करताना काय एकेक मुरक्या ते घेत आहेत!
संपूर्ण ऐका👇
इथं वसंतराव सादर करत आहेत, तेजोनिधी लोहगोल. कट्यार काळजात घुसली या अजरामर संगीत नाटकात हे गीत जेव्हा वसंतराव सादर करत तेव्हा श्रोते भान हरपून त्यांच्या गायकीला दाद देत. वसंतराव स्वतःच एक तेजोनिधी होते. हे गीत ललित पंचम रागातील आहे. वसंतरावांनी अक्षरशः सौंदर्याचा धुमाकूळ घालतात.👇
तेजोनिधी लोहगोल,
भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने
झगमगले भुवन आज
हे दिनमणि व्योमराज,
भास्कर हे गगनराज
कोटी कोटी किरण
तुझे अनलशरा उधळिती
अमृतकण परि होउन
अणुरेणु उजळिती
तेजातच जनन मरण,
तेजातच नविन साज
हे दिनमणि व्योमराज,
भास्कर हे गगनराज

संपूर्ण
👇
वसंतरावांचं नाट्यगीतांसंदर्भात असणारं आकलन अगाध होतं. जितक्या सहजतेने ते ख्यालगायकीतील विलंबित उलगडत तितकीच सहजता त्यांच्या नाट्यगीतांमध्ये सुद्धा होती. त्यांच्या नाट्यगीतांचा तर वेगळा थ्रेडच होईल. ती गीते म्हणजे एकेक आकाशगंगाच आहेत.
उदाहरणार्थ- 'रवी मी' हे 👇गीत.
वसंतरावांचा 'रवी मी'चा वरील परफॉर्मन्स त्यांनी त्यांच्या बालपणीच्या गुरूंना, म्हणजे दीनानाथ मंगेशकरांना आदरांजली म्हणून प्रस्तुत केलेल्या कार्यक्रमात सादर केला होता. त्या कार्यक्रमात दीनानाथांचे अनेक पैलू त्यांनी उलगडले होते.

जरूर ऐका/बघा.
👇
वसंतरावांनी दीनानाथांना आदरांजली म्हणून प्रस्तुत केलेल्या कार्यक्रमात जी भैरवी सादर केली आहे, ती सुद्धा नजर लागावी अशी! एकेक तान मोजून-मापून आणि तरीही भैरवीच्या सौंदर्याचा स्वतःचा खूप दीप थॉट त्यात जाणवत राहतो.

#immortal

संपूर्ण ऐका इथं.
👇

प्रिय वसंतराव!
काश. काश, आपण असताना मी जन्मलो असतो आणि आपली भेट झाली असती. काश, मला आपलं गाणं प्रत्यक्ष ऐकता आलं असतं. काश, मला आपला तबला ऐकता आला असता. काश!!
🥺🥺

Talented Tabla Player, Brilliant Theatre Actor, Brilliantly Gifted Singer Dr Vasantrao Deshpande
🙏

Immortalराव ❤️
@threadreaderapp

Kindly Unroll

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Bhushan Eshwar

Bhushan Eshwar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Bhushan_Eshwar

Jul 11
सार्वजनिक व्यक्तिमत्वे, आदर्श आणि समाज
-
विजय तेंडुलकर
(हमीद, या अनिल अवचट लिखित पुस्तकाच्या प्रस्तावानेतून.

👇
समाज म्हणजे कोण?? तर हाडामांसाची आणि वासनांची खरीखुरी शरीरे आणि अनावर गुणदोषांची स्खलनशील जिवंत मने वागवणारी माणसे. आदर्शांचे अनुकरण प्रत्यक्षात म्हणजे कृतीत करण्याइतकी यांतली बहुसंख्य मूर्ख नसतात.
👇
आदर्शांना नमस्कार घालून ती आपली शारीर आणि बरे वाईट जगणे निवांतपणे जगतात. तोंडाने उदात्त आणि सुंदर बोलत जगण्यातले कुरूप आणि बिनउदात्त जगून ते भावी पिढ्यांपासून लपवू शकतात. उरलेली थोडी माणसे आदर्शांचे अनुकरण करू मागत शेवटी एका अपरिहार्य समस्येशी पोचतात.
👇
Read 14 tweets
Jul 10
चंद्रकंस हा रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा राग आहे. जेव्हा मालकंसमधला कोमल निषाद वगळून त्या ठिकाणी शुद्ध निषाद लावला जातो, तिथं चंद्रकंसची निर्मिती होते. शुद्ध निषाद हा या रागाचा फार महत्वाचा स्वर आहे; आणि अर्थातच हा राग उत्तरप्रधान आहे.

👇
मालकंस प्रमाणे इथं पंचम व रिषभ वर्ज्य असतात; गंधार व धैवत कोमल असतात. हा राग कर्नाटकी शास्त्रीय संगीतातून उत्तरेकडील संगीतपद्धतीत आलाय. त्यामुळे या रागात विलंबित किंवा धृत बंदिशी आहेत, तराणे सुद्धा आहेत; पण ठुमरी/टप्पा/होरी असे उपशास्त्रीय प्रकार गाण्याची पद्धत रूढ नाही.

👇
मात्र ! कर्नाटकी शास्त्रीय संगीतात स्वतःचं स्थान निर्माण केलेल्या अतिशय टॅलेंटेड अशा रजनी-गायत्री या भगिनींनी तर चंद्रकंसमध्ये थेट संत तुकारामांचा अभंगच सादर केलेला आहे! मित्रांनो, कर्नाटकी शास्त्रीय संगीताचं सौंदर्य आणि सामर्थ्य या गायकीतून तुम्हाला नक्कीच उलगडेल.
तो अभंग असा
👇
Read 4 tweets
May 27
29 मे 1953 रोजी शेर्पा तेनझिंग नोर्गे आणि सर एडमंड हिलरी या दोन मानवांनी ब्रिगेडियर सर जॉन हंट यांच्या मार्गदर्शनाखाली जगातील सर्वात उंच जागा असलेल्या माउंट एव्हरेस्ट इथं पाऊल ठेवलं आणि जागतिक विक्रम केला. जवळपास सर्वांनी ही माहिती शालेय अभ्यासक्रमात वाचली/ऐकली असेल.
⬇️ Image
मला आजरोजी माहित झालेलं एक फॅक्ट सांगतो. 1953साली भारताचे पंतप्रधान होते- पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांना एव्हरेस्ट सर झाल्याची बातमी समजल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी तेनझिंग यांच्या घरी जाऊन त्यांना अत्यानंदाने मिठी मारली आणि स्वतःच्या गाडीत बसवून दिल्लीला घेऊन आले.
⬇️ Image
त्यांना स्वतःच्या ठेवणीतीत सर्वोत्तम उंची वस्त्रे त्यांना बहाल केली. मोतीलाल नेहरू यांनी वापरलेले 2 दागिने शेर्पा तेनझिंग यांना कायमचे देऊन टाकले. तसेच बंगालचे तात्कालिक मुख्यमंत्री डॉ बी सी रॉय यांना अर्जंट पत्र लिहून शेर्पा तेनझिंग यांना राहण्यास स्वतंत्र बंगला मिळवून दिला.
⬇️
Read 12 tweets
Apr 30
'भारतीय शास्त्रीय संगीतातील स्त्रिया'
थ्रेड पहिला.

सुरश्री गानसम्राज्ञी वंदनीय 'केसरबाई केरकर'

#SeriesOfThreads
#शास्त्रीय_संगीत
#DoyensOfClassicalMusic
#म #मराठी @MarathiRT @ashish_jadhao
हा काळ सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा. भारतीय शास्त्रीय संगीत हा मुख्यत्वाने पुरुषांचा प्रांत समजला जाई. भलेभले पुरुष गायक आपल्या प्रतिभेने राज/लोकमान्यता मिळवत होते. सुरसम्राट अल्लादिया खाँ, फैय्याझ खाँ, अब्दुल करीम खाँ, सवाई गंधर्व, बालगंधर्व हे त्यांत आघाडीवर होते.
हा तो काळ आहे, जेव्हा फुले दाम्पत्याने 1848साली नुकतीच मुलींसाठीची शाळा सुरू केली होती. तरीही या काळात मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी एत्तदेशीय पितृसत्ता किती झटत होती हे आपण जाणतो. मग पुरुषसत्ताक कलेच्या प्रांतात बायकांनी कला शिकायला जाणं हा फारच मोठा विद्रोह झाला असता.
Read 22 tweets
Apr 27
ज्या जिग्नेश मेवाणी यांना मोदी सरकारच्या विरोधात एक ट्विट बद्दल अटक करून नेण्यात आलेलं होतं, त्यांना म्हातारे आईवडील आहेत.

ज्या रिया चक्रवर्तीचं मिडीया ट्रायल चालवून मुख्य मुद्द्यांपासून भरकटवण्याचा प्रयत्न केला गेला, तिला सुद्धा म्हातारे आईवडील आहेत.
👇
फर्जी टूलकिट प्रकरणात बंदी बनवलं गेलेल्या दिशा रवी या हवामानबदल संदर्भातील कार्यकर्तीला सुद्धा आईवडील होते.

जामिया मिलिया इस्लामिया मधील विद्यार्थी असलेल्या सफुरा झरगर या सीएए कायद्याविरोधात प्रोटेस्ट करत असताना पकडून डांबण्यात आलं, त्यावेळी सफुरा झरगर गरोदर होत्या.
👇
पिंजरा तोड आंदोलनाच्या कार्यकर्त्या व जेएनयू च्या विद्यार्थिनी नताशा नरवाल यांनाही दिल्लीतील फेब्रुवारी 2020 साली झालेल्या दंगलीबद्दल केवळ संशयावरून युएपीए लावून जेव्हा जवळपास वर्षभर तुरुंगात डांबलं गेलं, तेव्हा तुरूंगाबाहेरचे त्यांचे वडील महावीर नरवाल कोव्हीड होऊन वारले.
👇
Read 10 tweets
Apr 22
ब्राह्मणी विचारसरणी कलेच्या क्षेत्रात सर्वात जास्त घुसलेली आहे. शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात तर खूप जास्त. कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे सोडले, तर सगळेच शास्त्रीय गायक भटशाहीचे सुप्त पाईक झालेले असल्याचे पुरावे सांगता येऊ शकतात.
👇
कुमार तर चारचौघात मी फक्त गाण्यालाच धर्म मानतो, असं सांगायचे! माझं घराणं माझ्यापासून सुरु होतं म्हणताना गाणं हाच धर्म असणारे वसंतराव त्या काळात तथाकथितांच्या टीकेचा विषय झाले होते. दोघांनी शास्त्रीय गाण्यात विद्रोह केला. रागांना नव्या पद्धतीने मांडलं आणि लोकप्रिय केलं.
👇
परंपरेलाच गुरु मानणाऱ्यांनी कुमार आणि वसंतरावांना नेहमीच कमी लेखलं. नव्याने विचार मांडणाऱ्यांना कमी लेखून त्यांच्या टॅलेंटला अनुल्लेखाने मारणं ही ब्राह्मणशाही नाही तर काय आहे? जे नवं गाणं कुमार ने किंवा वसंतरावांनी आणलं, तसा विद्रोह करायला कोण आज धजावत आहे?
Read 22 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(