#BrainDump
१० ऑगस्ट २००६ - माझ्या साठी खूप महत्वाचा दिवस कारण ह्याच दिवशी मी माझ्या IT करिअर ला मुंबई मध्ये सुरुवात केली होतो.ह्या १६ वर्षात मी जे काही करू शकलो ते माझ्या पहिल्या कंपनी मध्ये तयार झालेल्या base मुळेच.तर ह्या १६ वर्षातील माझे अनुभव मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय👇
१. IT (technical) दुनिया खूप मोठी आहे.टेक्निकल जॉब्स मध्ये DotNet/JAVA/Python/javascript व्यतिरिक्त पण खूप काही आहे.टूल्स/प्रॉडक्ट्स मध्ये प्रचंड प्रमाणात काम असतं.काही इंडस्ट्री मध्ये विशिष्ट प्रॉडक्ट्स वापरले जातात त्या प्रॉडक्ट्स चे कस्टमायझेशन मध्ये पण खूप काम असतं👇
२. पहिली नोकरी जर MNC मध्ये असेल जॉईन करताना तुम्हाला माहिती नसतं कि तुमचे नेमके कामाचे काय स्वरूप असेल अश्या वेळी जर मनासारखा प्रोफाइल मिळाला तर ठीक नाही तर बघावं कि आपण कशावर काम करतो, त्याचे मार्केट कॅप किती आहे, ह्यावर कुठल्या कंपन्या मध्ये स्पर्धा आहे.👇
Gartner वर खूप साऱ्या गोष्टी माहिती पडतील. ते सगळं बघून ठरवावं. आपली पहिली नोकरी निर्णायक असते पण तीच आपल्या करिअर ची दिशा ठरवेल असे नाही. 👇
३. कुठलीही कंपनी चांगली किंवा वाईट नसते.सगळं तुमच्या प्रोजेक्ट वर आणि त्यातील लोकांवर अवलंबून असतं.तुमचे मॅनेजर आणि टीम मेंबर्स चांगले तर काम करण्याची मजा येते आणि कामाचा ताण येत नाही.👇
४. नोकरी मध्ये थोडा जम बसल्यावर कुठल्या हि कामाला नाही म्हणू नये (अर्थातातच तांत्रिक काम). ते काम आपल्याला नवीन explore करण्याचा आणि आपला कंफर्ट झोन च्या बाहेर डोकावण्याची संधी देत. सेल्फ स्टडी आणि on the job ट्रेनिंग ची सवय सगळ्यात उत्तम. 👇
५. IT इंडस्ट्री मध्ये टिकाव धरण्यासाठी सातत्य आणि चिकाटी हे सगळ्यात महत्वाचे.कारण दर वेळी तुम्हाला नवीन प्रकारचे/स्वरूपाचे प्रश्न उद्भवतील.असे प्रश्न येतील ज्याचे उत्तर google कडे हि नसेल.हात पाय गाळून चालत नाही.अश्या वेळी एक एक पायरी पुढे सरकत हळू हळू प्रश्न सुटतात. 👇
कित्येकदा दिवस/रात्र ह्यामध्ये जाऊ शकतात. इथे थेअरी ऑफ elimination मला नेहमी उपयोगी पडली आहे. बहुतौन्श वेळी आपण बेसिक काही तरी चूक केली असते. 👇
६.IT मध्ये तुम्हाला बरेच why प्रश्न पडतील.हे असं इम्पलिमेन्ट का केलं,हा असा निर्णय का घेतला.जेव्हा सगळ्या why नाही मिळत तोपर्यंत switch चा विचार टाळावा.हे सगळं तुमचं स्किल improvement.तांत्रिक स्किल बरोबरच डोमेन स्किल घेत रहाणे खूप महत्वाचे.ते तुम्हाला नेक्स्ट लेवल ला घेऊन जाईल👇
७. IT इंडस्ट्री मध्ये काम करताना communication/transparency सगळ्यात महत्वाचे. कुठली हि गोष्टं गृहीत धरू नये.कारण गृहीत धरले कि पुढे जाऊन ते आपल्यावरच शेकतं.प्रश्न विचारावे.Absolute clarity आल्यावरच काम सुरु करावे.👇
काम मागे पडत असेल तर "All is well" कधीही म्हणू नये. हि चूक केली तर आपल्याला आणि आपल्या lead/manager ला तोंडघशी पाडणार हे नक्की. 👇
८. तुमच्या टीम मध्ये खूप प्रकारची लोकं असतील. त्यातल्या नकारात्मक लोकांपासून दूर राहावे. पूर्ण टीमचं नकारात्मक असेल तर तातडीने कंपनी/टीम बदलावी. ह्या vibes तुम्हाला गेल्या गेल्या येतील. Always trust your gut feel.👇
९. इन्फ्लुएन्सर ला कितीही म्हणू देत कि "you are not what your code is". पण वर्षाकाठी तुमचे appraisal तुमच्या कामाच्या गुणवत्तेवरच होतं.मी आजवर जितक्याही कंपनी मध्ये काम केला कुणाचीच appraisal प्रोसेस संपूर्ण पारदर्शक नाही बघितली. 👇
१०. IT इंडस्ट्री मध्ये काम बढती होण्यासाठी तुमची Visibility (तुमच्या manager च्या २/३ लेव्हल वरती) खूप महत्वाची असते. ती एका दिवसात बनत नसते. सातत्याने काम करत ती बनते. फ्रेशर असताना हे थोडं कठीण असतं पण सातत्याने चांगलं काम करत राहावे. 👇
११. IT मध्ये पण हाजी हाजी करणारे खूप लोकं सापडतील. इतकच काय तर manager ची पाण्याची बाटली भरून आणणारे लोक पण भेटतील. अशी खुशमस्करी उपयोगाची नाही कारण तुमच्या बॉस च्या बॉस ला पण टीम कडून output पाहिजे असतं. आणि खुशमस्करी output देत नाही.👇
१२. ह्या इंडस्ट्री मध्ये पण प्रांतीय लॉबी दिसतील. लॉबी मध्ये आपल्याला उठून दिसायचं असेल तर आपल्या कडे २ गुण हवे. एकतर आपल्याला इतरांपेक्षा काही तरी जास्ती यायला हवं आणि आपल्या स्वभावात चांगुलपणा हवा. ह्या दोन गोष्टी असतील तर कुठल्याच लॉबी चा फरक पडत नाही👇
१३. तासंतास काम करताना आपल्या तब्येती कडे विशेष लक्ष द्यावे.इथे जर मागे पडलो तर बाकी सगळं व्यर्थ.IT मध्ये धूम्रपान करणारे लोकं खूप सापडतील.आपण करायचे कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण जर आपण धूम्रपान करत आहात तर आपले टर्म इन्शुरन्स/मेडिकल इन्शुरन्स चे हप्ते वाढतात 👇
१४. IT मध्ये काम करताना नेटवर्क सगळ्यात महत्वाचं. कोण कधी आणि कसा उपयोगी पडेल ह्याचा काही नेम नसतो म्हणून switch करताना never burn old bridges.
अर्थातच हे माझे अनुभव आहेत. इतरांचे अनुभव वेगळे राहू शकतात.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#IT#ITJobs#Freshers
आधीच्या 🧵 मध्ये आपण Interfaces आणि Abstract Class बद्दल माहिती घेतली.
आज आपण Java 8 मधील बदलांच्या अनुषंगाने ह्याच प्रश्नाचे स्वरूप कसे बदलू शकतं ते बघूया. Java 8 मध्ये आपण Interfaces मध्ये पण methods चे default implementation देऊ शकतो. 👇
ह्याचाच अर्थ कि आधी interfaces आणि abstract class मध्ये जो एक मूळ फरक होता तोच जसा काही नाहीसा झाला. Java 8 च्या अगोदर Interface मधील method चे फक्त signature देऊ शकत होतो पण आता signature आणि वास्तविक code पण Interfaces मध्ये लिहू शकतो. 👇
तर Java 8 नंतर interfaces आणि abstract class एकसारखेच झालेत का? हा एक trick question म्हणू शकतो. पण ह्याचं उत्तर आहे नाही Java 8 नंतर हि interfaces आणि abstract class एकसारखेच नाहीत.
सगळ्यात पाहिले हे समजायला हवं कि ह्या default methods का आल्या. 👇
फ्रेशर म्हणून एका डेव्हलपर ला मुलाखती दरम्यान विचारला जाणारा प्रश्न म्हणजे Interface आणि Abstract Class म्हणजे काय? आणि कोणत्या वेळी काय वापरावे? दैनंदिन जीवनातील काही उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सगळ्यांना समजता येईल. 👇
🔎Interface - सोप्या भाषेत सांगायचं झालं तर Interface म्हणजे एक साचा. जसा एका मूर्तिकाराकडे मूर्ती बनवायचा एक साचा असतो अगदी तसा. आता समजा कि तुम्ही अमुक एक मूर्ती बनवण्याचा साचा विकताय. 👇
जेव्हा तुम्ही तो साचा विकला, तुम्हाला नाही माहिती कि ह्या साच्यातून मातीची मूर्ती बनणार कि कुठल्या धातूची कि प्लास्टर ऑफ पॅरिस ची. तिचा रंग काय असणार, तिचे डोळे कसे असणार ह्या गोष्टी (implementation) तुमच्या मूर्तिकारावर सोडल्या आहेत. 👇
आमचे प्रॉडक्ट डेटा सेंटर वरून AWS वर जात आहे (टेस्ट सर्व्हर्स).प्रॉडक्ट मध्ये ई-मेल नोटिफिकेशन पाठवण्याचा एक भाग आहे.म्हणूनच AWS वर ई-मेल सर्व्हर सेटअप केले आहे.पण ई-मेल काही जात नव्हते आणि error येत होता Mail server connection failed.👇
Connection failed असा error होता म्हणून AWS चे Security Groups बघितले पण सगळं व्यस्थित होतं. आणि विशेष म्हणजे जसे हे सर्व्हर्स आहेत तसेच दुसरे AWS servers बनवले पण तिथे कधीच असा error नाही आला. 👇
थोडं गूगल केलं तर एका ब्लॉग मध्ये लिनक्स वर असलेली होस्ट फाईल मध्ये एक बदल करायला सांगितला. 127.0.0.1 localhost अशी पाहिली loopback ऍड्रेस ची एन्ट्री होस्ट फाईल मध्ये होती त्या ऐवजी 127.0.0.1 <<host_name>> अशी पहिली एन्ट्री आणि 127.0.0.1 localhost हि दुसरी entry केली.👇
बऱ्याच डेव्हलपर्स ला Linux शिकायचे असते. Java/python ह्या languages जितक्या Linux वर प्रभावशाली आहेत तितक्या Windows वर नाहीत. म्हणून Linux चे ज्ञान असणे आवश्यक ठरते. पण कशी शिकणार/इंस्टॉलेशन हा मोठा प्रश्न पडतो. 👇
Laptop ला Dual boot मध्ये २ OS टाकू शकता पण मला ती एक किचकट पद्धत वाटते. तुम्ही तुमच्या Windows लॅपटॉप च्या command prompt ला cygwin द्वारे Linux terminal सारखे वापरू शकता पण फक्त terminal म्हणजे OS नव्हे. तिथे फक्त तुम्हाला मूलभूत commands वापरता येतील.👇
पण जर आपल्याला स्वतःच्या लॅपटॉप वर मूळ OS न काढता/Dual Boot न करता अगदी सोप्या पद्धतीने Linux टाकता आले तर? ह्या साठीच आपण आज Oracle Virtual Box ह्या मोफत टूल बद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. 👇
IT कंपनी जॉब साठी CS/IT फ्रेशर्सना विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे "What is Encapsulation?" या प्रश्नाला सहसा Data Hiding असं उत्तर मिळतं. पण Encapsulation चा "प्रॅक्टिकल" उपयोग काय तर समाधानकारक उत्तर मिळत नाही.👇
ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी एक गोष्टं सांगतो.
२००६ सालची गोष्टं आहे. Java Developer म्हणून माझा पहिला जॉब आणि पहिला प्रोजेक्ट. 👇
माझ्या टीम लीड ने मला एक Class लिहायला सांगितला. ज्या मध्ये काही attributes आणि methods (behavior) होते. टीम लीड ने सांगितले कि attributes ला private आणि methods public ठेवायच्या. "कन्सेप्ट" क्लिअर नसल्यामुळे मी त्याला विचारले कि आपण नेहेमी attributes private का ठेवतो? 👇
IT कंपनी मध्ये मुलाखत घेतांना विशेषतः Computer/IT Freshers ला विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे What is a Class and What is an Object? 👇
जवळपास सगळ्यांचं उत्तर हे पुस्तकी भाषेतलं असतं कि A Class is Blueprint of Object and an Object is instance of Class. हे उत्तर म्हणजे पत्ता सांगण्यासारखं आहे. बस स्टॅन्ड कुठे तर गणपती मंदिरासमोर आणि गणपती मंदिर कुठे तर बस स्टॅन्ड समोर. दोन्ही अमोरासमोर.👇
ह्याच प्रश्नाला जर थोडं सोप्या भाषेत आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणासहित सांगता आले तर त्याचा 'इम्पॅक्ट' चांगला होतो.
उदाहणार्थ जर तुम्हाला सायकल डिजाईन करायची आहे. तर आपल्याला काय प्रश्न पडणार? 👇