#POST : राजपथ ते 'कर्तव्यपथ' !🇮🇳
इंद्रप्रस्थ असल्यापासून ते न्यू दिल्ली पर्यंतचा या शहराचा आणि शहरामुळे संपूर्ण भारताचा प्रवास हा मोठा रोमांचक आहे हे वेगळे सांगणे गरजेचे नाही. दिल्लीने अनेक राजवटी पहिल्या.
(1/16)
स्वकीय, परकीय अश्या सगळ्या राजवटींना स्वतःमध्ये सामावून घेत असताना या शहराचे स्वतःचे अस्तित्व काही प्रमाणात धूसर झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मुघल आले त्यांनी इथली नवे बदलली, शहरांची नावे स्वतःच्या राजवटीला साजेशी आणि केवळ साजेशीच आहेत म्हणून नाही तर स्वतःचे वर्चस्व गाजवण्यासाठी म्हणून बदलली.
कालांतराने, ब्रिटिश आले, त्यांचा तो दिखाऊ मोठेपणा आला आणि त्याच सोबत यांनीही शहरांची रस्त्यांचे नावे बदलली. थोडक्यात, दुसऱ्याच्या जागेवर बळजबरीने कब्जा करत स्वतःचे नाव लावणे हेच या गोर्यांचे कर्तृत्व .
१९११ मध्ये जेव्हा, ब्रिटिशांनी स्वतःची राजधानी कलकत्त्यापासून दिल्लीला नेण्याचा निर्णय घेतला तेव्हा ब्रिटिश राजवटीने दिल्ली सजवण्याचा निर्णय घेतला. लुटयेन्स नावाच्या एका आर्किटेक्ट ने मोठ्मोठ्याला इमारती बांधल्या ज्या आज आपण विविध सरकारी इमारती म्हणून ओळखतो.
व्हाईसरॉय हाऊस (आजचे राष्ट्रपती भवन) समोर एक मोठा रस्ता, त्याला लागत असलेले छोटेखानी बगीचे त्यांचा राजा जॉर्ज आणि राणी यांसाठी बनवून घेतले आणि या रस्त्याला नाव दिलं 'किंग्सवे' थोडक्यात 'राज्याचा मार्ग'.
कालांतराने, इंग्रजांच्या विरोधात एक लढा उभा राहिला, 'सशस्त्र क्रांतीच्या' जोरावर इंग्रजांची भारतातली मुळे नेताजींसारख्या लोकांनी तकलादू केली आणि १९४७ साली इंग्रज आपला देश सोडून गेले. पण इंग्रज जरी गेले असले तर इंग्रजांची गुलामी करण्याची मानसिकता असलेली लोकं सत्तेवर होती.
१९५० साली, भारत प्रजासत्ताक झाल्यावर तत्कालीन सरकारने 'किंग्सवे' चे भाषांतर करून त्याचे नाव 'राजपथ' असे ठेवले व आज तागायत ते नाव तसेच होते.
१९६८ पर्यंत आज जिथे नेताजींची नवीन २८ फुटी मूर्ती उभी करण्यात आली आहे तिथे आपल्यावर राज्य केलेल्या जॉर्ज पंचम ची मूर्ती होती. स्वातंत्र्याच्या '२१ वर्षानंतर' ती मूर्ती काढण्यात आली.
आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर या रस्त्याचे नाव बदलण्याचे धारिष्ट्य सरकार ने दाखवले. या मागच्या ७५ वर्षांचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर केवळ 'राजपथ' ते 'कर्तव्यपथ' म्हणजे काय हे जरी समजले तरी खूप आहे.
मागच्या ७५ वर्षात आपण अनेक असंख्य स्वातंत्र्य सेनान्यांना असच विसरून गेलो किंवा आपल्याला त्यांना विसरायला सिस्टीम ने भाग पाडलं. केवळ काही ठराविक लोकांनीच, कोटात गुलाब घालून स्वातंत्र्य मिळवून दिलं हे मनावर बिंबवलं गेलं.
नेताजी, वीर सावरकर, टिळक, बिरसा मुंडा, लाला लजपत राय अश्या सगळ्यांचे आपल्या स्वातंत्र्यात योगदान आपल्याला कधीही सविस्तरपणे कळलंच नाही.
या सगळ्यांचे योगदान आपल्याला समजले नाही आणि कदाचित यामुळे आपल्याला आपले देशाप्रती असलेले 'कर्तव्य' समजले नाही !
आज, जेव्हा पंतप्रधान मोदींनी राजपथ या दिल्लीतील एका महत्वाच्या भागाचे नाव बदलून 'कर्तव्य' पथ असे ठेवले आहे तेव्हा ते केवळ नामांतरण नसून ते तुमच्या आमच्या मनाचे परिवर्तन होण्यासाठी केलेले आव्हान आहे.
या देशातली सगळी गुलामीच्या निशाण्या संपवून देशाला सर्वार्थाने इंडिया पासून 'भारताकडे' न्यायचे आहे हे या निर्णयातून मला तरी उमगतं.
राजपथ ते कर्तव्यपथ हि गोष्ट प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचीच असली पाहिजे आणि प्रत्येकाने 'नेताजींसारख्या' कर्तव्यदक्ष देशभक्तांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन कोणत्या न कोणत्या मार्गाने देश सेवा केली पाहिजे यात शंका नाही !
जय हिंद!
- मल्हार पांडे
(16/16)
आपल्या देशातल्या तथाकथित पुरोगाम्यांना प्रत्येक गोष्टीत व्यक्तीची जात पाहून त्यावर टिपण्या द्यायची एक वाईट सवय लागली आहे ! नुकताच सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्त साजरा होणार शिक्षक दिवस साजरा झाला आणि लगेचच जातीयवाद्यांनी...
(1/12)
...जातीयवादाच्या काड्या पेटवायला सुरुवात केली.
ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस हाच शिक्षक दिवस म्हणून का साजरा करावा यावर अनेक कारणे देत सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या कर्तृत्वावर चिकलफेक करण्याचे कार्य, कोणी पाटील नावाचे डॉक्टर करताना दिसले.
खरंतर हे डॉक्टर, कायमच त्यांच्या जातीयवादी विधानांमुळे कुख्यात आहेतच ! पण या गोष्टीवर एक सविस्तर उत्तर देणे आवश्यक वाटले म्हणून हा लेख लिहण्याचा घाट.
डॉ. पाटलांना सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यावर चिखल फेक करण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे त्यांची जात.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपण मानसिक दृष्ट्या अनेक वर्षांसाठी गुलाम होतो हे काही वेगळं सांगणं आवश्यक वाटत नाही.आपल्या शालेय जीवनातील पुस्तकांमध्ये आपण नाझी होलोकास्ट बद्दल नक्की वाचलं असेलच... 1/11
...पण कधी भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदूंची काय अवस्था झाली होती आणि त्यांना काय सहन करावं लागलं होतं या बद्दल कधी वाचलं आहे का ? नक्कीच नाही ! 2/11
काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस पार्टीशन रिमेम्बरंस होरर्स डे म्हणून ओळखला जाईल असे सांगितल्यावर आपल्या देशातील तथाकथित पुरोगाम्यांनी, व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांनीच याचा कडाडून विरोध केला, हे तेच आहेत जे स्टीवन… 3/11
#Thread : म.वि.आ सरकार चे पतन, शरद पवार आणि इतिहासाची पुनरावृत्ती !
भारताच्या राजकारणामध्ये अनेक उलाढाली झालेल्या आपण पाहिल्या आहेत, वाचल्या आहेत. आघाड्या येतात, आघाड्या तुटतात आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते. २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.... 1/20
...यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला हि एका दृष्टीने इतिहासाची पुनरावृत्तीच आहे. 2/20
१९७८ साली, जून-जुलै महिन्यातच अधिवेशन सुरु असताना, रेड्डी काँग्रेस (यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंत दादा पाटील, सुशील कुमार शिंदे) मधील नेत्यांनी शरद पवारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं पाहिलं आघाडी सरकार पडलं आणि वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 3/20
#Thread : नॉर्थ काश्मीर - बॉम्बिंग आणि शेलिंग पासून मुक्त !
अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे काय फरक पडला ? दहशतवादी कारवाया कमी झाल्या का ? असा प्रश्न जसा अनेक वेळेला विरोधकांना पडतो तसाच सरकारच्या समर्थकांना देखील पडतो. याचेच उत्तर या वृत्तात आहे. 1/9
उत्तर काश्मीर मधील माचील सेक्टर मधील दुधी या गावातल्या लोकांनी २०१९ च्या आधी सीझफायर वायोलेशन मुळे
अनेक वर्ष अशांततेचा सामना केलेला आहे. 2/9
पाकिस्तान्यांनी अनेक वेळेला बॉम्बिंग आणि शेलिंग केल्यामुळे इथल्या रहिवास्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे तर काही कुटुंबियांना जवळच्या लोकांना मृत्युमुखी पडताना देखील पाहायला लागले आहे आणि हे असेच गेली अनेक दशके सुरु आहे. 3/9
#Thread : तिस्ता सेटलवाड, गुजरात दंगल आणि 'कोलॉसल फ्रॉड'
२४ जून २०२२ रोजी, सुप्रीम कोर्टाने गुजरात मध्ये २००२ साली झालेल्या दंग्यांमध्ये तेव्हा दोषी ठरवलेल्या सगळ्यांना निर्दोष करार दिला, याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील नाव होते. 1/15
परंतु, एका महिलेला आणि एका इसरो शास्त्रज्ञाला गुजरात ए.टी.एस ने कस्टडी मध्ये घेतले. टिस्टा सेटलवाद आणि आर.बी.श्रीकुमार असे या दोघांचे नाव. 2/15
टिस्टा सेटलवाद ह्या तथाकथित मानवाधिकार ऍक्टिविस्ट ने गुजरात दंगलीनंतर तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व ६२ जणांच्या विरोधात दंगली भडकावण्यासाठी, मुसलमानांना मुद्दाम मारण्यासाठी क्रिमिनल प्रॉसिक्युशन व्हावे अशी मागणी तेव्हा केली होती. 3/15
#Thread :
२५ जून १९७५ रोजी, इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून संविधानाची हत्या केली हे सगळ्यांना माहित आहेच ! पण नेमकं काय काय केलं हे जाणून घेऊया :
भारताची आंतरिक सुरक्षा धोक्यात आली आहे असे कारण देऊन आणीबाणी लागू केली ! 1/10
(खरं कारण - जे.पी. आंदोलनाचे वाढते स्वरूप आणि इंदिरा गांधींच्या विरोधात सामान्य जनतेचा वाढत चाललेला रोष या कारणामुळे काँग्रेस ने आणीबाणी जाहीर केली होती)
२५ जून १९७५ ला आणीबाणीची घोषणा केली व देशभरातील जवळपास सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. 2/10
परंतु, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आले नाही.
प्रेसवर संपूर्ण सेन्सॉरशिप जाहीर करण्यात आली.
कोणत्याही वृत्तपत्राला अटक केलेल्या व्यक्तींची संख्या, नावे, किंवा ठावठिकाणा सांगण्यापासून मनाई केली होती. 3/10