यूपीआयद्वारे चुकीच्या खात्यात पैसे पाठवले गेल्यास काय करावे?
तूमचे पैसे परत मिळविण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकता.
🔸जर तुम्ही GPay, PhonePe, Paytm सारख्या #UPI एपद्वारे हस्तांतरण व्यवहार केला असेल तर सर्वप्रथम त्या एपच्या ग्राहकसेवेशी संपर्क करून मदत मागू शकता. #म
👇🏽
🔸त्याच दरम्यान तुमच्या बँकेच्या हेल्पलाइनशी सुद्धा संपर्क साधून व्यवहाराची माहिती द्या.
याआधी तुमच्या फोनवर त्या चुकीच्या व्यवहाराद्वारे पैसे खात्यातून वजा झाल्याचा तुम्हाला बँकेकडून आलेला मेसेज जपून ठेवा. या मेसेजमधील तपशील रकमेच्या परताव्यासाठी आवश्यक ठरतात.
👇🏽
🔸रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चुकीच्या खात्यावर पैसे पाठवल्यास, तुम्ही 👉🏻 bankingombudsman.rbi.org.in
या बँकिंग लोकायुक्त संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तक्रार करू शकता.
👇🏽
यासाठी तुम्ही बँकेत जाऊनही अर्ज देऊ शकता, अर्जात तुमच्या बँकेच्या तपशिलासोबत, पैसे चुकून ज्या खात्यात पाठवले गेले आहेत तो खाते क्रमांकही टाकावा लागेल.
👇🏽
🔸NPCI कडे तक्रार.
जर चूकभूलीने झालेल्या व्यवहारांतील लाभार्थी कोण आहे हे तुम्हाला माहीत असेल आणि ती व्यक्ती तुम्ही संपर्क करून पैसे परत पाठवण्याची विनंती करूनही तुमचे पैसे परत करण्यास नकार देत असेल, तर तुम्ही #NPCI वेबसाइटवर जाऊनही त्या व्यक्तीविरोधात तक्रार करू शकता.
👇🏽
NPCI वेबसाईट वर कशी तक्रार कराल ?
✅NPCI च्या वेबसाईटला npci.org.in भेट द्या.
✅येथे उजव्या कोपऱ्यातील ‘गेट इन टच’ या टॅबवर कर्सर नेल्यावर दिसणाऱ्या 'युपीआय कम्प्लेंट' या पर्यायावर क्लिक करा.
👇🏽
✅ त्यानंतर ट्रान्सेक्शन्स या पर्यायाची निवड करा.
✅ आता तुम्हाला ट्रान्झॅक्शन नेचर, इश्यू, ट्रान्झॅक्शन आयडी, बँक, रक्कम, ट्रान्झॅक्शनची तारीख, ईमेल व मोबाइल नंबर हे तपशील द्यावे लागतील.
✅सोबतच तुमचे बँक खाते विवरण अर्थात ‘अकाऊंट स्टेटमेंट’ जोडून आपली तक्रार सबमिट करावी.
🙏🏽
माहिती आवडली असल्यास थ्रेडचे पाहिले👇🏽 ट्विट रिट्विट करा. 🙏🏽
भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 डिसेंबर 2022 पासून रिटेल डिजिटल रुपया ( e₹ ) ची किरकोळ वापरासाठी प्रायोगिक तत्वावर सुरवात केली आहे.
या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (#CBDC) असे नाव देण्यात आले आहे.
थोडक्यात पाहूया नक्की काय आणि कसा आहे डिजिटल रुपया.
उद्या आपलं शेअर मार्केट कसं सुरुवात करेल याचा अंदाज बांधण्यासाठी आज संध्याकाळी अमेरिकन बाजाराची सुरवात कशी झाली आणि ते बंद होताना वाढीसह झाले कि घटीने ?
बरं एसजीएक्स निफ्टीची आताची स्थिती काय आहे ?
अगदी भल्या पहाटे तिथे काय परिस्थिती आहे ?
या बाबींचा अंदाज घ्यावा लागतो.
👇
#शेअरमार्केट मध्ये बऱ्यापैकी स्थिरावलेल्यांसाठी वर सांगितलेलं नवीन नाही.
पण यातीलही अनेकजण किंवा बाजारात सुरुवात करू पाहणाऱ्यांचा याबाबत गोंधळ उडतो.
म्हणजे जगातील हे बाजार किती वाजता सुरु होतात?
त्यांच्या वेळा काय ?
महत्वाचे निर्देशांक कोणते ?
युक्रेन आज धगधगतंय, पण आज भारतासह जगभरातील अब्जावधी लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेल्या एका शोधाची पाळेमुळे त्याच युक्रेनपर्यंत जातात.#Thread#म
गोष्टीसाठी तयार?
वर्ष 1992 चा काळ,अमेरिकेत बिल क्लिंटन यांनी जॉर्ज बुश सिनिअर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती👇
आखात वरवर तरी शांत झाल्याचं भासत होतं, भारतापुरतं सांगायचं तर पंतप्रधान नरसिंह राव व अर्थमंत्री मनमोहन सिंह या द्वयींकडून खुलं आर्थिक धोरण नामक औषधाचा कडूजार डोस देशाच्या अर्थव्यवस्थेला देऊन झाला होता.
तसं बरच काही झालं होतं त्यावर्षी पण आपली आजची गोष्ट युक्रेनमध्ये सुरू होते.👇
तेच ते आज जळत असलेलं युक्रेन..
तर झालं काय होतं,
त्या वर्षी म्हणजे 1992 साली जॅन कौम नावाचा एक 16 वर्षांचा मुलगा युक्रेनमधून त्याच्या आई व आजीबरोबर अमेरिकेत कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यू या गावी आपली गरीबी व दारिद्र्य सोबत घेऊनच आला.
👇
उदा.बेस्ट ऑफर शोधून अनेक युटीलीटी बिल्स ऑनलाईन भरणा, क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर करून वाणसामान खरेदी अशा अनेक प्रकारातून महिन्याकाठी काही शे रुपये वाचवता येतात.
👇🏽
असे वाचलेले पाच-सहाशे रुपये बचत हीच कमाई अर्थात ‘सेव्हिंग इज अर्निंग’ या न्यायाने गुंतवणूक म्हणून वापरता येतात. आजच्या दराने असे पाच-सहाशे रुपये तुम्हाला महिन्याला 3 निफ्टीबीज देऊ शकतात.
👇🏽
अदानी समूहाची एनडीटीव्हीवर अप्रत्यक्ष पद्धतीने पकड.
अदानी समूहाची मीडिया कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड (AMNL) NDTVमधील 29.18% हिस्सा अप्रत्यक्ष पद्धतीने खरेदी करेल.
आजच्या मीडिया रिपोर्ट्समधुन ही माहिती समोर आलेय.अदानी ग्रुपने NDTV त स्टेक खरेदीची खुली ऑफर सादर केलेय.
👇🏽
विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VPCL) या AMG Media Networks Limited (AMNL) ची पूर्ण मालकीच्या उपकंपनीमार्फत हे अधिग्रहण केले जाईल.
आणि AMG Media Networks Limited (AMNL) ही अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची आहे.
👇🏽
या संदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, VCPL ला RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमधील 99.5% स्टेक खरेदी करण्याचा अधिकार आहे. VCPL ने या अधिकारातून हिस्सा खरेदीचा निर्णय घेतला आहे.
RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड ही प्रवर्तक समूह कंपनी आहे.
👇🏽