म्हणजे 40 लाखांची परतफेडीत फक्त व्याजापोटी तुम्ही मुदलाहून जास्त म्हणजे 128% रक्कम अधिक देता.
थेट सांगायचं तर गुंतवणूक संदर्भातील कंपाऊंडिंगचा नियम इथे मात्र तुमच्या विरोधात असतो.
पण याच कंपाऊंडिंगच्या मदतीने वर्षाला फक्त 3 अधिक हफ्त्यांसह गृहकर्ज व्याजासह परत मिळवता आलं तर?
👇
नक्की काय करायचं ?
गृहकर्जाचे वर्षाला 12 नव्हे तर 15 मासिक हफ्त्यांची तरतूद करा. म्हणजे ३ हफ्ते जास्त.
म्हणजे,
₹34,583 X 3 = ₹1,03,749 (तीन मासिक हफ्त्यांची एकूण रक्कम )
आता हि रक्कम तुम्हाला दर महिना #SIP पद्धतीने गुंतवायची आहे.
म्हणजे, ₹1,03,749 / 12 = ₹8,645.75
👇
आपण ₹8,646 विचारात घेऊ.
याचा अर्थ तुम्हाला दर महिना ₹8,646 ची SIP करायची आहे.
‘इतिहासातील आकडेवारी हि भविष्यातील कामगिरीबाबतची शाश्वती मानू नये’ हे वाक्य लक्षात ठेवूनच आपण इथे निर्देशांकाच्या परताव्याचा संदर्भ घेऊ.
👇
मागील 20 वर्षांचा विचार केल्यास निफ्टी निर्देशांकाने दरवर्षी सरासरी(#CAGR) 14% आसपास परतावा दिला आहे.
अर्थात 2 वर्षापूर्वीच्या कोविड घसरणीनंतर बाजाराने घेतलेल्या झेप विचारात घेतली तरी ऐतिहासिक दाखल्यांनुसार मार्केटने दीर्घकाळात 12% च्या आसपास सरासरी परतावा दिल्याचं दिसतं
👇
यातून पुढील 22 वर्षांसाठी वार्षिक 12% इतका सरासरी परतावा जरी जमेस धरला तरी हि रक्कम असेल, ₹1,12,04,315
यात तुमची मूळ गुंतवणूक असेल ₹22,82,544
तर तुम्हाला मिळालेला परतावा असेल ₹89,21,718
👇
म्हणजे एसआयपीद्वारे केलेल्या या गुंतवणुकीतून तुमची मूळ गुंतवणूक वजा करूनही तुम्ही तुमच्या होमलोनच्या परतफेडीत व्याजासकट भरलेल्या रकमेच्या जवळपास रक्कम तुम्हाला इथे मिळाल्याचे दिसेल.
अन् हे गृहकर्जाच्या दरवर्षाला तीन अतिरिक्त हफ्त्यांच्या तरतुदीतून सध्या होऊ शकते.
👇
या नियमित #SIP ला काही वर्षांनी नित्यनेमाने येणाऱ्या #DIP चा म्हणजे मोठ्या घसरणीचा अतिरिक्त मुहूर्त साधलात तर तुमच्या सरासरी परताव्यात वाढणारे एक – दोन अतिरिक्त टक्के तुम्हाला दुधावर येणाऱ्या सायीसारखे भासतील.
👇
अर्थात वरील उदाहरणात गृहकर्जावरील व्याजरकमेसंदर्भात मिळणारी ‘कर सवलत’ आणि SIP गुंतवणुकीच्या परताव्यावर लागणारा ‘दीर्घकालीन भांडवली नफा’ अर्थात ‘लॉंग टर्म कॅपिटल गेन' कर, हे दोन घटकही लक्षात घेण्यासारखे.
👇
मित्रांनो गुंतवणुकीसंदर्भात नेहमी वापरल्या जाणाऱ्या ‘एसआयपी’ आणि ‘कंपाऊंडिंग’ या दोन शब्दांची महती एव्हाना अनेकांना माहित झालेली आहे. पण त्याचं महत्व सांगण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या दृष्टीकोनानुसार उदाहरण मांडत असतो.
👇
अगदी तसंच वरील उदाहरणातून दिलेली माहिती हा पूर्णपणे आमचा दृष्टीकोन असून तो गुंतवणूक सल्ला मानू नये. कारण आमचा तर्क, आमचा अंदाज आणि आमचा अभ्यास चुकीचाही ठरू शकतो. आणि म्हणूनच कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
👇
माहिती आवडली असल्यास थ्रेडचं पाहिलं👇🏽 ट्विट रिट्विट करा. 🙏🏽 #म
तुम्ही कधी स्वताला 'पोस्ट-डेटेड चेक' दिलाय ? तो सुद्धा काही वर्षे पुढील तारखेचा ?
आज आपण एका अशाच व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने आयुष्यातील एका संघर्षाच्या टप्प्यावर स्वतःला असाच पोस्ट-डेटेड चेक दिला होता, तो सुद्धा तब्बल दहा मिलियन म्हणजेच एक कोटी डॉलर्सचा.
👇 #Thread#म
हि गोष्ट आहे एका ख्यातनाम कलाकाराची जो आज हॉलीवूडमध्ये आघाडीचा अन् गुणी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे.
पण एक काळ होता जेव्हा केवळ एक धडपड्या कलाकार अशी ओळख असणारा तो स्वतःला सिद्ध करू शकेल अशा एका संधीच्या शोधात होता.
त्या तरुणाचे स्वप्न होते उत्तम कॉमेडियन आणि अभिनेता होण्याचे.
👇
अनेक अडथळे आणि संघर्ष नशिबी येऊनही त्याने आपले स्वप्न कधीच सोडून दिलं नाही.
उमेदवारीच्या काळात अशाच एके दिवशी, काहीतरी अचानक मनात आल्यासारखं त्याने आपल्या बँक खात्याचा चेकबुक शोधला, जवळच पेनाने त्यावर स्वतःच्या नावे $10 दशलक्ष म्हणजेच एक कोटी डॉलर्सचा चेक लिहिला, पण..👇
यूपीआयद्वारे चुकीच्या खात्यात पैसे पाठवले गेल्यास काय करावे?
तूमचे पैसे परत मिळविण्यासाठी खालील पर्यायांचा वापर करू शकता.
🔸जर तुम्ही GPay, PhonePe, Paytm सारख्या #UPI एपद्वारे हस्तांतरण व्यवहार केला असेल तर सर्वप्रथम त्या एपच्या ग्राहकसेवेशी संपर्क करून मदत मागू शकता. #म
👇🏽
🔸त्याच दरम्यान तुमच्या बँकेच्या हेल्पलाइनशी सुद्धा संपर्क साधून व्यवहाराची माहिती द्या.
याआधी तुमच्या फोनवर त्या चुकीच्या व्यवहाराद्वारे पैसे खात्यातून वजा झाल्याचा तुम्हाला बँकेकडून आलेला मेसेज जपून ठेवा. या मेसेजमधील तपशील रकमेच्या परताव्यासाठी आवश्यक ठरतात.
👇🏽
🔸रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चुकीच्या खात्यावर पैसे पाठवल्यास, तुम्ही 👉🏻 bankingombudsman.rbi.org.in
या बँकिंग लोकायुक्त संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तक्रार करू शकता.
👇🏽
भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 डिसेंबर 2022 पासून रिटेल डिजिटल रुपया ( e₹ ) ची किरकोळ वापरासाठी प्रायोगिक तत्वावर सुरवात केली आहे.
या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (#CBDC) असे नाव देण्यात आले आहे.
थोडक्यात पाहूया नक्की काय आणि कसा आहे डिजिटल रुपया.
उद्या आपलं शेअर मार्केट कसं सुरुवात करेल याचा अंदाज बांधण्यासाठी आज संध्याकाळी अमेरिकन बाजाराची सुरवात कशी झाली आणि ते बंद होताना वाढीसह झाले कि घटीने ?
बरं एसजीएक्स निफ्टीची आताची स्थिती काय आहे ?
अगदी भल्या पहाटे तिथे काय परिस्थिती आहे ?
या बाबींचा अंदाज घ्यावा लागतो.
👇
#शेअरमार्केट मध्ये बऱ्यापैकी स्थिरावलेल्यांसाठी वर सांगितलेलं नवीन नाही.
पण यातीलही अनेकजण किंवा बाजारात सुरुवात करू पाहणाऱ्यांचा याबाबत गोंधळ उडतो.
म्हणजे जगातील हे बाजार किती वाजता सुरु होतात?
त्यांच्या वेळा काय ?
महत्वाचे निर्देशांक कोणते ?
युक्रेन आज धगधगतंय, पण आज भारतासह जगभरातील अब्जावधी लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेल्या एका शोधाची पाळेमुळे त्याच युक्रेनपर्यंत जातात.#Thread#म
गोष्टीसाठी तयार?
वर्ष 1992 चा काळ,अमेरिकेत बिल क्लिंटन यांनी जॉर्ज बुश सिनिअर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती👇
आखात वरवर तरी शांत झाल्याचं भासत होतं, भारतापुरतं सांगायचं तर पंतप्रधान नरसिंह राव व अर्थमंत्री मनमोहन सिंह या द्वयींकडून खुलं आर्थिक धोरण नामक औषधाचा कडूजार डोस देशाच्या अर्थव्यवस्थेला देऊन झाला होता.
तसं बरच काही झालं होतं त्यावर्षी पण आपली आजची गोष्ट युक्रेनमध्ये सुरू होते.👇
तेच ते आज जळत असलेलं युक्रेन..
तर झालं काय होतं,
त्या वर्षी म्हणजे 1992 साली जॅन कौम नावाचा एक 16 वर्षांचा मुलगा युक्रेनमधून त्याच्या आई व आजीबरोबर अमेरिकेत कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यू या गावी आपली गरीबी व दारिद्र्य सोबत घेऊनच आला.
👇