पहिल्या भागात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने नोटबंदीच्या कायदेशीर वैधतेवर दिलेला बहुमताचा निर्णय आपण बघितला.
या भागात नोटबंदी अवैध घोषित करणारा जस्टीस BV नागरत्ना यांचा अल्पमत निर्णय बघू...
आर्थिक नीतीचे पूनर्विलोकण -
याबाबत जस्टीस नागरत्ना यांनी म्हंटले कि आर्थिक नीतीचे न्यायालयीन पूनर्विलोकण हे मर्यादित कक्षेत असते. आर्थिक नीतीच्या मेरिट्स बद्दल न्यायालय स्वतःचे मत लादु शकत नाही.
न्यायालयीन हस्तक्षेप हा केवळ अश्याच प्रकरणा पुरता मर्यादित असतो जिथे..
आर्थिक बाबींशी निगडित नीती, कायदा करताना कुठल्याही कायदेशीर किंवा घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन झाले असेल.
एखाद्या नीतीचे गुणदोष, उपयुक्तता, यश-अपयश ई बाबींचा विचार करण्यास न्यायालय नकार देऊ शकते कारण या गोष्टींची चिकित्सा एक्सपर्ट लोकांच्या साहाय्याने करणे हे सरकारचे क्षेत्र आहे.
सेक्शन 26 RBI ACT चे इंटरप्रिटेशन -
सेक्शन 26 हे बँक नोट्स च्या लीगल टेंडर(कायदेशीर चलन म्हणून मान्यता) बद्दल आहे.
यात 26(1) मधे प्रत्येक बँक नोट ला देशात कुठल्याही ठिकाणी चलन म्हणून मान्यता असेल अशी तरतूद आहे. याचे दोन आयाम आहेत. एक म्हणजे चलन म्हणून मान्यता आणि..
दुसरे त्यावर नमूद रकमेची सरकारद्वारे दिली जाणारी गॅरंटी.
सेक्शन 26(2) मधे तरतूद आहे कि RBI सेंट्रल बोर्डच्या शिफारसीने, केंद्र सरकार गॅझेट मधे आदेश काढून कोणत्याही किंमतीच्या कोणत्याही सिरीज च्या नोट्स चे लीगल टेंडर रद्द करू शकते म्हणजे मान्यता रद्द करू शकते.
केंद्र सरकारचा असा आदेश काढण्याचा अधिकार सेंट्रल बॉर्डच्या शिफारसीमधून येतो. असा आदेश काढणे हि प्रशासकीय कृती आहे जी सेंट्रल बोर्डच्या शिफारसीआधारे केली जाते. यावरून असे स्पष्ट होते कि सरकारला केवळ सेंट्रल बँक च्या शिफारशीनेच असा आदेश काढता येऊ शकतो.
अटर्नि जनरल यांनी यावर आक्षेप घेताना मुद्दा मांडला होता कि केवळ RBI च्या शिफारसीने आदेश काढता येतो असे म्हणता येणार नाही. अश्या सकुंचित अर्थाने केंद्र सरकारला विमुद्रीकरणाचे काहीच अधिकार राहणार नाहीत.
या मुद्द्यात तथ्य आहे. केंद्र सरकारचा संबध केवळ आर्थिक सुव्यवस्थे पुरताच..
मर्यादित नसुन देशाची एकता-अखंडितता, मित्रराष्ट्र संबध, आंतरिक-बाह्य सुरक्षा या सर्व गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळे जर केंद्र सरकारचे असे मत असेल की काही ठराविक उद्दिष्टांसाठी जसे की ब्लॅक मनी, फेक करन्सी, टेरर फंडिंग नष्ट करणे ई. साठी नोटबंदी करणे गरजेचे आहे तर सरकार त्यासाठीचा
प्रस्ताव पुढे करू शकते.
अटर्नी जनरल यांनी दुसरा मुद्दा मांडला होता कि केंद्र सरकारला केवळ एकच नव्हे तर सगळ्या किंमतीच्या, सर्व सिरीजच्या नोट बंद करण्याचा अधिकार आहे. सेक्शन 26(2) मधील ANY शब्दाचा अर्थ All असा होतो.
यासाठी दोन प्रश्ननांचा विचार करावा लागेल.
I - केंद्र सरकारला सेक्शन 26(2) मधे नोटबंदी चा प्रस्ताव पुढे करण्याचा आणि गॅझेट नोटिफिकेशन द्वारे नोटबंदी करण्याचा अधिकार आहे का ?
II - केंद्र सरकारच्या नोटबंदी करण्याच्या अधिकारांची व्यापकता. म्हणजेच सगळ्या किंमतीच्या,सगळ्या सिरीजच्या..
नोट्स बंद केल्या जाऊ शकतात का ?
विमुद्रीकरण करण्याचा प्रस्ताव सरकार किंवा RBI यांच्याकडून पुढे केला जाऊ शकतो. मात्र सरकारकडून नोटबंदीचा प्रस्ताव पुढे केला जाणे आणि RBI ने तसा प्रस्ताव देणे यात फरक आहे. जेव्हा RBI नोटबंदी करण्याचा प्रस्ताव देत असते तेव्हा तो केवळ
विशिष्ट सिरीजच्या नोटांसंदर्भातच दिला जाऊ शकतो. सेक्शन 26(2) मधल्या ANY शब्दाचा अर्थ ALL असा घेतला जाऊ शकत नाही.
केंद्र सरकारला सर्व सिरीजच्या सर्व किमतीच्या नोटांचे विमुद्रीकरण करण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकारचा अधिकार RBI च्या अधिकारांप्रमाणे संकुचित नाही.
कारण केंद्र सरकारचा अधिकार हा सेक्शन 26(2) च्या अंतर्गत येत नाही. तो सातवी अनुसूची केंद्रीय सूची विषय (36- चलन,नाणी,लीगल टेंडर ई.) अंतर्गत येतो. केंद्र सरकार द्वारा प्रस्तावित नोटबंदी हा अधिक गंभीरता असलेला व अर्थव्यवस्था आणि नागरिकांवर व्यापक परिणाम करणारा मुद्दा आहे.
केंद्र सरकारचे हे अधिकार व्यापक असल्यामुळे त्यांची अंमलबजावणी प्रशासकीय नोटिफिकेशन ऐवजी संसदीय मार्गनेच झाली पाहिजे. संसदेने ज्यात लोकप्रतिनिधिंचा समावेश असतो, सर्वंकष चर्चा करून अश्या विमुद्रीकरनाला मान्यता व पाठिंबा देणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारकडे नोटबंदी करण्यासाठी अनेक कारणे असू शकतात आणि असे ते सेंट्रल बोर्डच्या शिफारसीशिवाय देखील करू शकतात. सेंट्रल बोर्डचे मत नकारात्मक असेल तर सरकार यासाठी कायदा करून नोटबंदी करू शकते जसे 1978 साली करण्यात आले होते.
यात तातडीचा, गुप्ततेचा प्रश्न असतोच, त्यासाठी सरकारकडे अध्यादेश काढण्याचा व नंतर संसदेकडून त्यासाठी कायदा मंजूर करून घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
थोडक्यात, जेव्हा RBI नोटबंदीचा प्रस्ताव पुढे करत असते तेव्हा त्यांनी सेक्शन 26(2) नुसार शिफारस करणे गरजेचे आहे.
याउलट जेव्हा केंद्र सरकार नोटबंदीचा प्रस्ताव पुढे करते तेव्हा त्यांनी RBIचे मत जाणून घ्यावे कारण RBIची चलनव्यवस्थापणात महत्वाची भूमिका आहे. हे मत बंधनकारक नाही. अश्यावेळी सरकारने नोटबंदी साठी संसदीय मार्गद्वारे कायदा करावा. गॅझेट नोटिफिकेशन द्वारे सर्व सिरीज च्या बाबतीत नोटबंदी..
केली जाऊ शकत नाही कारण जेव्हा प्रस्तावक सरकार असते तेव्हा ते सेक्शन 26(2) अंतर्गत कार्य करत नसते. सर्व किंमतीच्या सर्व नोटांचे विमुद्रीकरण करण्याचा प्रस्ताव सरकारच पुढे करू शकते आणि त्याची अंमलबजावणी संसदीय चर्चेद्वारे कायदा करूनच केली जाऊ शकते.
निर्णय प्रक्रिया -
सरकार व RBI ने दाखल केलेली कागदपत्रे यावरून असे दिसते कि सदर नोटबंदी करण्याचा प्रस्ताव सरकारने पुढे केला होता. 7 नोव्हेंबर 2016 तसे पत्र RBI ला पाठवण्यात आले. 8 नोव्हेंबर संध्याकाळी RBI बोर्डची बैठक झाली आणि सरकारला शिफारस करण्यात आली. रात्री गॅझेट नोटिफिकेशन..
काढले गेले. सरकारचे पत्र, सेंट्रलबोर्ड समोरील प्रस्ताव व शिफारसपत्र बघिलतल्यावर असे दिसून येते कि 'सरकारची ईच्छा होती' त्याप्रमाणे 'शिफारस केली' गेली.
यावरून हे स्पष्ट होते कि बँकेने स्वतंत्र भूमिकेत या निर्णयाचा विचार केला नव्हता. किंबहुना बँकेकडे विचार करण्यासाठी वेळ हि नव्हता.
500,1000 च्या सर्व सिरीजच्या नोटांचे विमुद्रीकरण करण्याची प्रक्रिया अवघ्या चोवीस तासांत करण्यात आली.
नोटबंदीचे उद्देश आणि स्वरूप याबाबत बँक आणि सरकरच्या प्रतिज्ञापत्रात तफावत आहे. सरकारने ब्लॅक मनी,फेक करन्सी, इलिगल फायनांसिंग यासाठी वर्तमान 500-1000 नोटा बंद करण्याचे म्हंटले..
होते तर बँकेच्या शिफारसीत आर्थिक समावेशन, डिजिटल पेमेंट्स चालना यासाठी जुन्या नोटांचे विमुद्रीकरण करण्याचे म्हंटले होते.
उपरोक्त स्पष्ट केल्याप्रमाणे सेक्शन 26(2) मधे Any चा अर्थ All असा घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे 500-1000 किमतीच्या सर्व सिरीजच्या नोटांचे विमुद्रीकरण..
करण्याची शिफारसच मुळात नियमबाह्य ठरते. ऑल असा अर्थ घेणे म्हणजे सेंट्रल बोर्डला दिशाहीन, अतिव्यापक अधिकार प्रदान करणे.
एखादी कृती करण्यासाठी कायद्यात विशिष्ट प्रक्रिया नमूद केलेली असेल तर त्याव्यतिरिक्त दुसऱ्या प्रक्रियेद्वारे ती कृती केली जाऊ शकत नाही. तसेच त्यासाठी नमूद..
असलेल्या कायदेशीर साधनाचाच आधार घेतला जाऊ शकतो. सेक्शन 26(2) तिथे लागू होत नाही जिथे प्रस्ताव सरकारकडून पुढे केला जातो. केंद्र सरकार ने 26(2) मधे नोटिफिकेशन काढने हे कायद्याचे चुकीचे रिडिंग आहे. सरकारने विमुद्रीकरण करताना योग्य प्रक्रियेचे पालन केलेले नाहि !
कायद्यामधे ज्या संस्थेला विशेषाधिकार देण्यात आलेला आहे त्याच संस्थेने हे अधिकार वापरून निर्णय घेणे अपेक्षित असते. जेव्हा अशी संस्था तिच्यासमोरील तथ्यांच्या आधारे निर्णय घेण्याऐवजी दुसऱ्या संस्थेच्या आदेशाने अधिकार वापरते तेव्हा अशी कृती हि अवैध असते.
इथे प्रस्तावक केंद्र सरकार आहे, बँक नाही. सेंट्रल बोर्ड ने घाईघाईने शिफारस पारित केली. यासारख्या प्रत्येक नागरिकावर परिणाम करणाऱ्या व्यापक गंभीर निर्णयाबाबत पुरेशी काळीज व विचार केला गेला नाही. सेंट्रल बोर्डाने केवळ सरकारच्या आश्वासनसच्या आधारे शिफारस केली, स्वतः स्वतंत्रपणे
याचा विचार केला नाही. सेंट्रल बोर्डचे अधिकार केवळ विशिष्ट सिरीज च्या नोटांबद्दल आहेत. केंद्र सरकार प्रस्ताव पुढे करते तेव्हा सेंट्रल बोर्डच्या शिफारसीचा आधार घेऊ शकत नाही. केंद्र सरकार तशी शिफारस मागवू देखील शकत नाही कारण तसे करणे म्हणजे सेंट्रल बोर्ड ने स्वतः एक्सपर्ट म्हणून..
स्वतःच्या विचाराने निर्णय घेण्याऐवजी केवळ सरकारला होकार देणे. केंद्र सरकार जेव्हा बँकेचे मत घेत असते तेव्हा त्यांना सर्वंकष विचार करायला वेळ द्यायला पाहिजे होता.
या सर्वाचा विचार करता 8 नोव्हेंबर चे नोटबंदी नोटिफिकेशन बेकायदेशीर असल्याचा निर्णय जस्टीस नागरत्ना यांनी दिला !
बहुमताच्या निर्णयाने केंद्र सरकारला कायद्याच्या कचाट्यातुन मुक्त केले असले तरी सरकार उत्तरदायित्वापासून मुक्त होऊ शकत नाही. ज्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेत खोडा घातला, लोकांना प्रचंड हाल सहन करावे लागले, काहींचे प्राण गेले अश्या निर्णयाचे साध्य काय याचे उत्तर द्यावेच लागेल.
अल्पमताचा निर्णय महत्वाचा असतो कारण त्यातून भविष्यात धडा घेतला जाऊ शकतो. जस्टीस फजल अली, HR खन्ना, सुब्बा राव, DY चंद्रचूड हि काही मोठी नावे आहेत ज्यांनी महत्वाच्या प्रकरणात ठामपणे सरकार विरुद्ध अल्पमत निर्णय दिले आहेत.
या नावात एका नावाची भर पडली ते म्हणजे जस्टीस BV नागरत्ना !
8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री पंतप्रधानांनी ऐतिहासिक नोटबंदी लागू करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
पाच न्यायधीशांच्या घटनापीठाने नुकतेच या याचिकांवर निर्णय दिलेला आहे.
4:1 अशा बहुमताने सुप्रीम कोर्टाने नोटबंदी करण्याचा निर्णय कायदेशीर रित्या वैध असल्याचे म्हंटले आहे.
जस्टीस नझिर, जस्टीस गवई,जस्टीस बोपन्ना व जस्टीस रामसुब्राह्मण्यम यांनी बहुमताचा निर्णय दिला आहे तर
जस्टीस BV नागरत्ना यांनी मात्र नोटबंदी निर्णय बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे.
या भागात जस्टीस गवई यांनी लिहिलेला बहुमताचा निर्णय बघू.
न्यायालयाने सहा प्रश्न/मुद्दे तयार केले होते ज्याधारे नोटबंदीच्या वैधतेवर निर्णय देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशातील सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रिये बाबत उलटसुलट चर्चा होत आहेत. या अनुषंगाने न्यायाधीशांच्या नियुक्ती बाबत संविधान सभेतील चर्चा, घटनात्मक तरतूदी...
नियुक्ती प्रक्रियेबाबतचे महत्वाचे निर्णय, सध्याची प्रचलित कॉलेजिअम म्हणजेच न्यायवृंद व्यवस्थेचा उगम, विद्यमान सरकारने तो बदलण्याचा केलेला प्रयत्न व त्यावरचा निर्णय आणि आवश्यक सुधारणा या सर्व बाबींचा सविस्तर आढावा या थ्रेड मालिकेतुन घेण्याचा प्रयत्न आहे....
न्यायपालिका हि संसद व प्रशासन यांच्यावर अंकुश ठेवण्याचे कार्य करत असते. हि संसदीय लोकशाहीतील चेक्स & बॅलन्स व्यवस्था आहे. यामुळे संसद-शासन व न्यायपालिका यांच्यात अधिकारांबद्दल जगभरात चढाओढ बघायला मिळते. न्यायाधीशांची नियुक्ती याच Power Tussle चा एक भाग आहे.
26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले. संविधान सभेतील चर्चेच्या काळापासून ते आजतागायत आपले संविधान इतर देशांच्या संविधानातुन 'उधार' घेतलेले किंवा 'कॉपी-पेस्ट वर्क' असल्याची टीका..
होत आली आहे. संविधान सभेत जेव्हा अशी टिका झाली तेव्हा त्यामागे संविधानावर पाश्चात्य प्रभाव व भारतीयत्वचा अभाव असल्याची भावना होती. अलीकडे अशी टीका हि घटनाकारांचे कार्य कमी लेखण्यासाठी, डॉ.आंबेडकरांबद्दल असलेल्या आकसापोटी केली जाते.
भारतीय संविधानात इतर देशांच्या संदर्भाचा आधार घेऊन अनेक तरतूदी समाविष्ट केल्या आहेत यात दुमत नाही. पण त्याला कॉपी-पेस्ट म्हणणे याला 'घटनात्मकता' हि संकल्पना न समजून घेता केलेली टिका म्हणता येईल.
संविधान म्हणजे थोडक्यात 'रुल बुक'. समाजव्यवस्थेचे किंवा शासनव्यवस्थेचे मूलभूत नियम.
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील न्यायधीशांच्या नियुक्ती करणाऱ्या कॉलेजिअम व्यवस्थेबाबत सामान्य लोकांमधे नाराजी असल्याचे विधान करून मंत्री किरण रिजिजू यांनी कॉलेजीएम सिस्टीम बाबत चा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.
पुन्हा याबाबतीत न्यायिक सुधारणा करण्याबाबत कुजबुज सुरू झालेली आहे.
वास्तविक कॉलेजिअम व्यवस्था हि सर्वोत्तम व्यवस्था आहे असे खुद्द न्यायपालिकेचे देखील मत नसावे. अनेक माजी न्यायधीशांनी सुधारणेची गरज बोलून दाखवलेली आहे. यात सुधारणा व्हाव्यात हि सर्वसाधारण भावना आहे.
मात्र या सुधारणा करत असताना न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आणि स्वतंत्रता अबाधित राहणे अत्यंत महत्वाचे आहे !!
उपाययोजना पुढे न करता, समावेशक चर्चेसाठी पुढाकार न घेता केवळ आहे त्या
व्यवस्थेवर आक्षेप घेत राहणे यात सुधारणेचा कमी आणि कोर्टाला टार्गेट करण्याचा हेतू जास्त दिसतो.
नार्को टेस्ट, ब्रेनमॅपिंग ई. चाचण्या आणि अनुच्छेद 20(3) !
गुन्हेगारी तपास प्रक्रियेत माहिती मिळवण्यासाठी, पुरावे मिळवण्यासाठी केले जाणारे वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग हा कायम चर्चिला जाणारा विषय. आरोपी व्यक्तींकडून सत्य माहिती काढून घेण्यासाठी त्यांच्यावर..
नार्कोएनालिसिस, पॉलिग्राफी किंवा ब्रेन मॅपिंग सारख्या चाचण्या करणे हा त्याचाच एक भाग. या चाचण्यांची वैधता, उपयुक्तता हे हे मुद्दे भारतात देखील अनेकदा वादग्रस्त ठरलेले आहेत. महाराष्ट्तील तेलगी प्रकरण किंवा दिल्लीतील तलवार डबल मर्डर प्रकरण यात नार्को चाचणी हा विषय गाजला होता.
हाथरस प्रकरणात पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची नार्को चाचणी करण्यावरून देखील हा मुद्दा चर्चेत आला होता.
अश्या प्रकारच्या चाचण्यांची घटनात्मक वैधता, आरोपी व्यक्तींचे हक्क, यातील माहितीची उपयुक्तता ई. सर्व गोष्टींचा विचार सुप्रीम कोर्टाने सेलवी वि. कर्नाटक सरकार या प्रकरणात केला आहे.
2013 पासून PewDiePie हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइबर काऊंट नुसार जगात एक नंबर होते. भारतीय चॅनेल टीसिरीज हे हळूहळू करत दोन नंबरवर पोहोचले आणि सुरू झाली या दोन चॅनेलमधे नंबर वन ची स्पर्धा.
अल्पकाळातच या स्पर्धेने राष्ट्रीय स्वरूप धारण केले आणि भारतीय चॅनेल जगात एक नंबर बनवण्यासाठी भारतीय नेटकऱ्यांनी जोरदार पाठिंबा दिला. या देशकार्यात टिसिरीज सबस्क्राइब करून हातभार लावला. परिणामी भारतीय चॅनेल टिसिरीज नंबर वन झाले आणि आजही आहे.
गौतम भाई अदानी मोठ्या मेहनतीने थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने जागतिक श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांच्यापुढे आहे अमेरिकन एलोन मस्क. या एलोन चे चाहते भारतात जरी असले तरी इथे मुद्दा देशाचा आहे.