तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30-40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..
बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्याने लाखाच्या कर्जाला किमान १०हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज
वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० हजार काढुन घेतलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपये ढापलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन
टँकर धुवा लागतो ना... मग करा दुधाची फॅट कमी, काढा लिटरमागं ५ रुपये भाव कमी. मरतो का शेतकरी एवढ्यानं......
म्हणजे झाला दुधसंघ करोडोपती आणि लागला पठारावरच्या ईलेक्शन जिंकु.
व्याजानं पैसं देणारा सगळं सोनं-नाणं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिर्हाईक शोधतो एवढ्यावरच त्याचं भागत नाही तर
शेतकऱ्याच्या चिमुरडीलाही चिरडण्याचा प्रयत्न करतो. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
भाजीमार्केट दलालांना वाटतं शेतकऱ्यांची पट्टी कधी देऊचं नाही आणि सगळा पैसा घशात घालावा. मरतो का शेतकरी एवढ्यानं......
साखरसम्राट यांना वाटतं प्रत्येक 10 टन ऊसा मागे 1 ते 2 टन काटा मारू, ऊसाचे बिल 6-6
महिने द्यायचं नाही,,, मरतो का शेतकरी एवढ्यानं......
लाईन वाल्या साहेबाला वाटते शेतकऱ्याने विजबिल पूर्ण भरावं आणि डीपी मेंटनस निघाला तर सर्व शेतकऱ्यांनी लाख रूपये जमा करून आपल्याकडे द्यावे आणी ते आपण मोठ्या साहेबाला पकडून अर्धे अर्धे खिशात घालावे. वर दिवाळीलापण घरोघरी उकळतोच. मरतो
का शेतकरी एवढ्यानं.
गावगुंडाला वाटतं आपल्यालाही मोकळ्यामोकळ्या १०- १५ हजार मिळवायचे असेल तर करा त्या शेतकऱ्याचा शेतीचा रस्ता बंद, करा खोटानाटा आरोप आणि उकळा पाहिजे तेवढे पैसे. मरतो का शेतकरी एवढ्यानं
कृषी विभागातील साहेबांना वाटते शेतकऱ्यांसाठी आलेल्या योजना म्हणजे आपल्या
बापाच्याचं आहेत, त्या विकुनचं खाव्यात. मरतो का शेतकरी एवढ्यानं....
खत-बियाने दुकानदाराला वाटते बोगस खत-बोगस बियाने शेतकऱ्याला कधी नगदी तर कधी उधार देवुन आपण आपला नफा करून घ्या. मरतो का शेतकरी एवढ्यानं....
शेतमजुर तर मजुरी देवुन वर दारू ची मागणी करतंय. शेतातला भाजीपाला पाहिजे
तेवढा नेताय आणि नाही म्हटलं तर येत नाही कामाला,मरतो का शेतकरी एवढ्यान...
शहरातल्या लोकांना लाखांनी कमवुनसुद्धा वाटत शेतमाल फुकटच मिळावा,मरतो का शेतकरी एवढ्यानं....
बातमीदारांना शेतमालाला भाव वाढल्यावरच बातम्या देण्याचं सुचतं,मंदीत सडघाण झाल्यावर दिसेनासं होतं,मरतो का शेतकरी
एवढ्यानं....
विरोधी पक्षाला वाटतं सत्ता आणण्यासाठी शेतकरी महत्वाचा,पण सत्तेत गेल्यावर पहिला विसर पडतो तो शेतकर्याचाच,ऊद्योगपतींची कोटींची बील माफ करणारं सरकार मोटारींची हजारा़ची बीलं वसुल करूनच घेतं,मरतो का शेतकरी एवढ्यानं... #शेतकरी#म#रिम#मराठी#copied
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
काही जख्ख वृद्धा
तर काही वाहत असतील सरपणाची, माळव्याची ओझी
स्वयंपाकघरातल्या कालवणांचा गंध पसरला असेल वाऱ्यावर
निजली असेल गोठ्यातली गाय वासराला चाटून झाल्यावर
बारीक आवाजात सुरु असतील गप्पा बायकांच्या
विषय तोच असला तरी जिवंतपणा असेल बोलण्यात त्यांच्या
जीर्ण दगडी वाडे काही झुकले
असतील
निष्पर्ण नसूनही झाडे काही वाकली असतील
संथ चालत असतील थकलेली शिसवी माणसं काठी धरून
वाटेने येणाऱ्यास अडवून हालहवाल विचारत असतील, हात फिरवत खांद्यावरून
पानाची चंची उघडली जात असेल
देठ खुडून चुना लावताना जुन्याच गप्पांना रंग चढत असेल
बोलता बोलता विषय निघत असेल