Ajay Profile picture
Jan 31 8 tweets 4 min read
गोष्ट तारण ठेवलेल्या शेअर्सची
(Loan Against Securites/शेअर्स)

#अडाणी ग्रुप

कोणतीही बँक शेअर्स तारण म्हणून घेताना त्या शेअर्सच्या किंमतीच्या ६०-८०% रक्कम कर्ज म्हणून देते.

जर त्या शेअर्सची किंमत वाढली तर जास्तीचे कर्ज घेता येते..पण जर का किंमत खाली आली तर..२ गोष्टी होतात -

#म
१. एकतर बँक त्या व्यक्तीला/कंपनीला त्यांचे कर्ज safe राहावे म्हणून जास्तीचे (~ फरकायेवढे) पैसे मागते..ह्याला म्हणतात margin. किंवा

२. ते 👆 पैसे मिळणार नसतील तर एका मर्यादेनंतर त्यांच्या कडील शेअर्स विकायला चालू करते..! आणि हे असे शेअर विकायला चालू केले की अजूनच जास्त पडतात -
कारण बँकाकडील शेअर्सच्या पुरवठ्याने, खूप जास्त शेअर्स विकायला आल्याने भाव अजूनच पडतात

आणि

परत पर्यायाने बँकांना शेअर्स विकावे लागतात..हे दुष्टचक्र चालूच राहते..

जोपर्यंत बँकाकाकडील शेअर्स संपत नाही तोपर्यंत..!!🤯

Btw..हे असे मागे अशातच #yesbank च्याबाबतीत घडलेले आहे..!
आता आपण अडाणी कडे येऊ.. 👇

पहिले चित्र आहे -

अडाणीचे किती % शेअर्स बँकाकडे तारण आहेत..! (Sept २०२२ data)

(विशेष गोष्ट पाहिली का -अडाणीने
~ ५०,००० कोटीला Acc-अंबुजा सिमेंट कंपनी कर्जाने विकत घेतली व त्या कर्जासाठी त्याच कंपनीचे सगळेच्या सगळे १००% शेअर्स तारण ठेवले..🤯)
आता दुसरे चित्र बघा -

ह्यात अडाणीचे शेअर्स all time high पासून ~ किती % खाली आले आहेत ते दिलेले आहे.

आता यापुढे शेअरची किंमत अजून खाली तर काय होऊ शकते हे मी सांगणार नाही..ते तुम्हाला याआधीच सांगितले आहे..!

तरी एक गोष्ट सांगतो 👇
अडाणीकडे सध्या भारतातील सर्वात Cream assets आहेत..त्याला ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी फक्त त्याचा चालू असलेला FPO म्हणजे दुसरा IPO यशस्वी होणे गरजेचे आहे..म्हणजे त्याला पाहिजे असलेले ' Margin ' भेटेल..! कर्ज थोडे कमी होईल आणि भावाला जरा हायसे वाटेल..😅
बाकी तो FPO यशस्वी होईल न होईल पण ज्यांना अडाणी चे शेअर्स घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी ही तशी बरी संधी आहे असे दिसते.

आणि मी काय करतोय हे विचाराल तर - मार्केटमध्ये इतर पण ४-५ हजार शेअर्स आहेत..ह्याच शेअर्स मध्ये काय धन गाडून ठेवलंय ह्या मताचा मी आहे..😉😅🙏
टीप - ह्या अडाणी saga मुळे शेअर मार्केटच्या बऱ्याच किचकट गोष्टीत आपल्या लोकांचा इंटरेस्ट वाढल्याने Loan against Securites, Margin ,FPO इ गोष्टी समजावणे सोपे झाले आहे..हा वरील thread त्याचाच एक प्रयत्न आहे..🙏

#StockMarketअभ्यास

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ajay

Ajay Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @amhiraigadkar

Jan 28
अडाणीचा सामना कोणासोबत आहे ??

Mr.Robot च्या पहिल्याच episode मधले लोक ते हेच 👇..हे लोक नक्की कोण ते कळत नाही..माहीतही नाही जगाला..त्यांचा फक्त पैसा दिसतो..अफाट पैसा..आणि तो पण साधासुधा नाही..Best of a Kind..Generational Wealth..म्हणजे पिढ्या न् पिढ्या चालत आलेला पैसा..! १/५

#म Image
ह्या लोकांनी फक्त पैसा कमावलाच नाही तर तो टिकवला पण..त्यासाठी तशी system च तयार केलीये..आणि हे सगळं गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे..म्हणजे विचार करा..अमेरिकेलाच स्वतंत्र होऊन झालीत ~ २५० वर्ष..इंग्लंडमध्ये तर गेल्या ~ १००० वर्षात कोणी बाहेरच्याने येऊन राज्य केलेले नाही..२/३ Image
अन् तीच गोष्ट इतर युरोपची..त्यांचा पैसा गेल्या काही शतकांपासून(😱🤯🔥) चक्रव्याढ पद्धतीने वाढतोय..न् आपल्याकडे आता कुठे SIP चळवळ रुजतिये..अजून पण शेअर मार्केट म्हणजे जुगार समजला जातो..आणि मग..आपण रिस्क फ्री LIC काढत बसतो आणि LIC आपल्या पॉलिसीच्या हफ्त्याने अडाणीमध्ये SIP करते..😐 Image
Read 5 tweets
Jan 26
अडानीचा Game तसा सोपा आहे..

फक्त ६ टप्प्यात सांगायचा प्रयत्न करतो..👇

Step १ - आपल्या कंपनीचा IPO करायचा.
IPO केला म्हणजे आपल्या कंपनीचे किमान २५% शेअर्स मार्केटमध्ये देवाणघेवाण होते..आणि ती देवाणघेवाण किती किमतीला होते त्यावर पूर्ण कंपनीची किंमत ठरते.

#म
Step २ - IPO त शेअर विकून आलेले पैसे मॉरिशस किंवा केमन आयलंड सारख्या कमी/ शून्य व्याजदर असलेल्या देशातल्या आपल्या किंवा आपल्याच कोणाच्या कंपनीच्या अकाउंटवर घ्यायचे.
म्हणजे सरकारला कराचा एक नवा पैसा द्यायला नको..😐

>>एकाच दिवशी तयार केलेल्या अडानीच्या ?खोट्या कंपन्या 👇
Step ३ - हा करमुक्त पैसा २ पद्धतीने वापरायचा..
१) त्याच देशात नवनवीन कंपन्या तयार करायच्या आणि त्यात हा पैसा वळवायचा आणि त्याने भारतातल्या आपल्याच कंपन्यांचे IPO केलेले शेअर्स विकत घ्यायचे..पण इतके शेअर एकच कंपनी घेत असेल तर शंका येऊ शकते म्हणून-

>> पैसा कसा वळवला असू शकतो👇
Read 15 tweets
Jan 19
२०२४ निवडणुका,बँका आणि शेअर मार्केट

आता जश्या जश्या २०२४ च्या निवडणुका जवळ येतील..तेवढा जास्त पैसा सरकार अर्थव्यवस्थेत ओतायला सुरुवात करेल.. मोठंमोठे प्रोजेक्ट/बजेट तयार होतील..पण..हा पैसा सरकारकडे असेलच असे नाही..मग तो पैसा बँकाच्या कर्जांमार्फत खेळवला जाईल..गेली ४-५ वर्ष..

#म
बँकांची कर्जे बुडीत दाखवण्यात गेली आहेत..म्हणून आता बँका आमचा बिझिनेस कसा वाढतोय..आमचा प्रॉफिट कसा वाढतोय हे दाखवतील..त्यांच्या शेअरची किंमत झपाट्याने वाढेल..त्या सोबतच हे सगळे infra/ रस्ते कंपन्या त्यांच्या शेअर्सची किंमत वाढेल..पण हे सगळं..फक्त निवडणुकांचा निकाल येईपर्यंत..
तो एकदा आला की पुन्हा येरे माझ्या मागल्या..सरकार (नेहमी सारखंच) काय वेळेवर पैसे देणार नाही..मग..infra कंपन्या तोट्यात जाणार..कर्ज घेऊ घेऊ वाढलेल्या कंपन्या तोट्यात जायची शक्यता वाढणार.. अन् मग परत ह्याला त्याला सगळ्यांना कर्ज देणाऱ्या बँका NPA दाखवू दाखवू तोट्यात जाणार..
Read 4 tweets
Nov 13, 2022
राजधानी जिंजी - मराठी स्वातंत्र्य संग्रामाचा जागता साक्षीदार

साल होते १६८९

१६८० साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर,संभाजी महाराजांना दगाफटका झाला.

त्यांच्या काळातच रायगडावर राजकारण पेटले होते..त्यांच्या क्रूर, मानसिक खच्चीकरण करू पाहणाऱ्या मृत्यूनंतर तर राजकारणाने

#म
अधिकच वेग पकडला..त्यानेच स्वराज्य पोखरून निघते काय असे वाटत असतानाच खुद्द राजधानी रायगडालाच जिंकून..एकाच झटक्यात मराठा साम्राज्य संपवायच्या हेतूने झुल्फिकारखानाने रायगडास वेढा घातला.

अशा वेळेस महाराणी येसूबाईंना संभाजी महाराजांचा पुत्र म्हणून शाहूंना गादीवर बसवणे शक्य होते पण..
त्यांनी स्वराजरक्षणासाठी पतिवियोगाचे दुःख सारून राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले.

व येवढेच करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी स्वतः रायगड लढवता ठेऊन छत्रपती राजाराम महाराजांना सुरक्षित दक्षिणेत जाण्यासाठी गडउतार व्हायला सांगितले..!
Read 26 tweets
Sep 3, 2022
अचानक ३ दिवसाची सुट्टी भेटली..😀

मग काय..ज्या बसमध्ये जागा भेटली त्या बसचे बुकिंग करून निघालोही..!

ह्या वेळेस एक नवा प्रयोग..Live Travel Blog..!👇

सुरुवात रायगड जिल्ह्याच्या अश्या जागेपासून जिथून कमीत कमी ७ राज्यात एका रात्रीच्या प्रवासात पोहचू शकतो..!

#प्रवासवर्णन

#म ImageImage
महामुंबईत..

विमानांसाठी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट..

जहाजांसाठी जेएनपीटी बंदर..

रेल्वेसाठी सीएसटी..

आणि

बससाठी कळंबोली MacDonalds..!
खरे तर , कर्नाटकात जायचे तर VRL travels..नाहीतर SRS travels च्या बसेस बेस्ट आहेत.

पण..ऐनवेळी..त्यांची तिकिटे भेटली नाही..म्हणून.. Citizen travels ची बस घ्यावी लागली.

आतापर्यंत तरी ह्या ट्रॅव्हल्सचा आंबट गोड अनुभव..👇
Read 19 tweets
Sep 2, 2022
TL वर आलं की २-४ नग बघायला भेटले नाही असं होतंच नाही..😏

काय तर म्हणे - कॅन्सर वर लस येणार हे मी ज्योतिष पाहून भाकीत आधीच वर्तवलं होतं..🥴

लोकांना खरं वाटू नये म्हणून सांगतो..

१. Cervical कॅन्सर हा असा एकमेव कॅन्सर आहे..ज्यासाठी लस उपलब्ध आहे..!🤯

#म
२. असे असूनही भारतात दरवर्षी ~ दर ५ मिनिटाला cervical कॅन्सर ने एका महिलेचा मृत्यू होतो..😑

३.मग ही लस कोणी घेत का नाही ?

कारण अज्ञान..!

~ २००५ मध्ये ह्या लसीचा शोध लागल्यानंतर आज..*भारत हा जगातील असा एकमेव देश आहे,ज्या देशात ही लस सरकारी कार्यक्रमात सामाविष्ट केलेली नाही..😑
४. पण ही लस खाजगी डॉ कडे भेटते का ?

भारतात ही लस एक MNC विकते..३ डोसची एकूण किंमत ~ ५-८००० ₹

प्रॉब्लेम फक्त हा आहे की लस ideally १६ वर्षाच्या आत / जास्तीत जास्त २६ वर्षापर्यंत च्या महिलांना देता येते..!
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(