छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच गोष्टी सांगितल्या जातात....!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात....!
1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज "सामाजिक क्रांती"
करणारे होते...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे "लोकपालक" राजे होते...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे "उत्तम प्रशासक" होते...!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून
जगवण्याची शिक्षा देणारे "पर्यावरण रक्षक" होते...!
5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे "स्व-धर्मचिकित्सक" होते ...! 6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या
रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून "अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे चिकीत्सक राजे" 7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! "जलतज्ञ" राजे छत्रपती शिवराय!! 8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे
कोणतेही साधन नसताना अभेद्य असे १०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, "उत्तम अभियंते राजे" 9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!! 10. परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे "मातृभक्त, नारीरक्षक" छत्रपती शिवराय!
छत्रपती शिवरायांबद्दल अनेकांना माहिती नसलेल्या गोष्टी :
१)जगभरात शिवाजी महाराज जयंती
केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. १९ फेब्रुवारी
रोजी सुमारे ११४ पेक्षा जास्त विविध देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.
२)शिवाजी महाराजांचे 'ते' सात घोडे
शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर
नेमकेपणाने केला. शिवाजी महाराजांकडे मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा असे सात घोडे होते. कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर बसले होते. सुरतवर चढाई, आग्र्याहून सुटका अशा मोहिमा मासल्यादाखल देता येतील.
!! स्वराज्याची शिवकालीन जकात वसुली पद्धत व जकातीचे दर तसेच जकात जकात व अर्थव्यवस्था. !!
शिवकाळातील स्वराज्याच्या अर्थ व्यवस्थेचा अभ्यास करताना प्रामुख्याने जकात वसुली, कर वसुली, पेठेचा कारभार, गावचा कारभार यांचा अभ्यास करावा लागतो. स्वराज्यात जास्त करुन माल तयार होत नसे.
तो माल आयात होत असे बंदरावरांवरुन. त्या मुळे बंदरे ताब्यात असणे गरजेचे असायचे. जकात हि दोन प्रकारे वसुल केली जायची. एक बंदरावरील कर वेगळा तो कर हा प्रत्येक व्यापाऱ्यास द्यावा लागे. त्या नंतर माल वाहतूक करत असताना घाट उतरल्यावर जकात वसुल केली जायची. शिवकाळामध्ये कारवार, गोबे,
बेंगुर्ले, मालवण, राजापूर, जैतापूर, खारेपाटण, रत्नागिरी, चिपळूण, हर्णे, दाभोळ, महाड, दंडा-राजपुरी, नागाव, नागोठाणे, चेऊल, पेण, पनवेल, अष्टमी, कारंजा, मुंबई, कल्याण, भिवंडी, वसई, ठाणे इत्यादी लहान मोठी बंदरे प्रसिद्ध होती. यातील बहुतांशी बंदरे स्वराज्यात होती तर गोवे, मुंबई, करंजा
तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30-40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..
बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्याने लाखाच्या कर्जाला किमान १०हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज
वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० हजार काढुन घेतलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपये ढापलं तर काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....
दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन
टँकर धुवा लागतो ना... मग करा दुधाची फॅट कमी, काढा लिटरमागं ५ रुपये भाव कमी. मरतो का शेतकरी एवढ्यानं......
म्हणजे झाला दुधसंघ करोडोपती आणि लागला पठारावरच्या ईलेक्शन जिंकु.
व्याजानं पैसं देणारा सगळं सोनं-नाणं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिर्हाईक शोधतो एवढ्यावरच त्याचं भागत नाही तर
काही जख्ख वृद्धा
तर काही वाहत असतील सरपणाची, माळव्याची ओझी
स्वयंपाकघरातल्या कालवणांचा गंध पसरला असेल वाऱ्यावर
निजली असेल गोठ्यातली गाय वासराला चाटून झाल्यावर
बारीक आवाजात सुरु असतील गप्पा बायकांच्या
विषय तोच असला तरी जिवंतपणा असेल बोलण्यात त्यांच्या
जीर्ण दगडी वाडे काही झुकले
असतील
निष्पर्ण नसूनही झाडे काही वाकली असतील
संथ चालत असतील थकलेली शिसवी माणसं काठी धरून
वाटेने येणाऱ्यास अडवून हालहवाल विचारत असतील, हात फिरवत खांद्यावरून
पानाची चंची उघडली जात असेल
देठ खुडून चुना लावताना जुन्याच गप्पांना रंग चढत असेल
बोलता बोलता विषय निघत असेल