म्युच्युअल फंड की स्टॉक - गुंतवणूक नक्की कशात करावी?
बऱ्याच नवीन गुंतवणूकदारांचा स्टॉक विकत घ्यावेत? की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी? याबाबत गोंधळ उडताना दिसतो. या थ्रेड मधून आपण दोन्हीही पर्यायांची थोडक्यात तुलना करणार आहोत. #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
थेट कंपन्यांच्या स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक लॉंग टर्ममध्ये मोठा कॉर्पस निर्माण करू शकते. मात्र बरेच गुंतवणूकदार मार्केटमध्ये शॉर्ट टर्म साठी येणाऱ्या बदलांमुळे भावनिक होऊन खालील चुका करताना दिसतात - #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
१. स्टॉकच्या किमतीत शॉर्ट टर्ममध्ये होणारे चढउतार पाहून खरेदी विक्री करणे.
२. भावनिक होऊन गुंतवणूक करणे किंवा गुंतवणूक काढून घेणे.
३. थोड्या स्टॉक्समध्ये खूप जास्त गुंतवणूक करून डायव्हर्सिफिकेशन न करणे.
४. गुंतवणूक करताना स्टॉकबाबत कोणतीही माहिती न घेणे,रिसर्च न करणे.#Thread#म
स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे आणि मोठे रिटर्न्स मिळवणे हे बऱ्याच जणांना मार्केटकडे आकर्षित करू शकते. मात्र निफ्टी 500 मध्ये असलेल्या कंपन्यांचा 31 डिसेंबर 2022 पर्यंतचा गेल्या पाच वर्षाचा रिटर्न पाहिला तर काहीसे वेगळे चित्र दिसते. #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
या इंडेक्समध्ये असलेल्या 402 कंपन्यांपैकी 95 कंपन्यांनी 20% पेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. मात्र जवळपास 110 कंपन्यांनी निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. तर 115 कंपन्यांनी 0 ते 10 टक्के आणि 82 कंपन्यांनी 10 ते 20 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत.#Thread#StockMarket#MutualFunds
या आकडेवारीकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणे दिसायला सोपे असले तरी त्यातून रिटर्न्स मिळवणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा रिसर्च करावा लागतो. #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
तसेच कंपन्यांची माहिती काढावी लागते आणि जिथे तुम्हाला खरोखर खात्री असेल अशाच ठिकाणी गुंतवणूक करणे योग्य ठरते. हे करूनही तुम्ही केलेली गुंतवणूक पुरेसे रिटर्न्स देईलच याची खात्री मात्र कोणीही देऊ शकत नाही. #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
या उलट तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलीत तर हेच काम काहीसे सोपे देखील होते. म्युच्युअल फंडाकडे फंड मॅनेजर, त्याच्या हाताखाली असलेले रिसर्च ॲनालिस्ट सेक्टर ॲनालिस्ट हे लोक प्रोफेशनली काम करून गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
असे असले तरी म्युच्युअल फंड हेदेखील स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे त्यातही रिस्क असतेच. हा थ्रेड वाचून तुम्ही तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी की म्युच्युअल फंडात याचा निर्णय घेऊ शकता. #Thread#StockMarket#MutualFunds#म#मराठी
तुम्हाला दुकानदाराने डुप्लीकेट चार्जर📲देऊन गंडवले तर...कदाचीत असे चार्जर खराब क्वॉलीटीचे📵 असल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. परंतू हे डुप्लीकेट चार्जर्स 📲ओळखणे सोप्पे आहे. थ्रेड👇
#Thread #म #मराठी 1/n
आजकाल अनेक मोबाईल कंपन्या मोबाईल सोबत चार्जर्स देत नाहीत. तसेच बऱ्याच वेळा आपला चार्जर खराब देखील होतो. अशावेळी चांगला चार्जर विकत घेणे मोठे कठिण होते. परंतू त्यावर उपाय सापडला आहे. चार्जर घेताना त्यावर तीन सिंबॉल प्रिंट केलेले असतात. ते नक्की पाहून घ्या.
#म #मराठी
2/n
डबल स्केअरचे जे सिंबॉल असते त्याचा अर्थ चार्जर इलेक्ट्रिक शॉक फ्री आहे. होमचा अर्थ असा आहे की हे चार्जर तुम्ही घरात वापरू शकता. याशिवाय ८ सारख्या सिंबॉलचा अर्थ आहे हे हाय क्वॉलीटी चार्जर असून यापासून चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो.
#म #मराठी 3/n
आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या कर्ज घेतल्याशिवाय शक्य होत नाहीत आणि म्हणूनच आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी कर्ज घेतो. मात्र या कर्जाचे मॅनेजमेंट व्यवस्थित केले नाही तर त्याचा डोंगर उभा राहतो.
#म #मराठी
त्यातून मार्ग काढणे कधीकधी अतिशय जिकिरीचे होऊ शकते. मग या कर्जाच्या डोलाऱ्याखाली अनेकदा कुटुंब देखील उध्वस्त होते. म्हणूनच आजच्या थ्रेडमधून आपण कर्जमुक्त होण्याचे सहा मार्ग पाहणार आहोत. #म #मराठी
पहिला मार्ग आहे तो म्हणजे डेट कन्सॉलिडेशन, म्हणजे तुमची जी कर्जे आहेत किंवा क्रेडिट कार्डवरचे बॅलन्स आहेत, ते तुम्ही एकाच कर्जात एकत्र करायचे. या एकाच कर्जाचा व्याजदर इतर कर्जांच्या व्याजदरापेक्षा कमी असेल. #म #मराठी
डिजिटल एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करणारी बायजूज ही भारतीय युनिकॉर्न कंपनी आता घराघरामध्ये पोहोचली आहे. अगदी शनिवार, रविवार तुम्ही घरच्यांसोबत शॉपिंग मॉलमध्ये गेलात तर तिथेही या कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुमचा पिच्छा सोडत नाहीत. #म #byjus
ऑनलाइन शिक्षण कसे महत्त्वाचे आहे आणि ऑनलाइन हेच कसे भविष्य आहे हे सगळ्यांना पटवून देत बायजूज ही कंपनी मोठी झाली. मात्र 2021 मध्ये या कंपनीने डिजिटल हेच भविष्य हा आपला मंत्र बाजूला ठेवत आयआयटी आणि मेडिकल प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देणारी #म #मराठी #byjus
आकाश एज्युकेशन सर्विसेस ही कंपनी विकत घेतली. नुसती विकतच घेतली नाही तर त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केला. किती? तर तब्बल एक बिलियन डॉलर. म्हणजे साधारण आठ हजार कोटी रुपये!! जगभरामध्ये शिक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेले हे सगळ्यात मोठे डील असेल. #म #byjus
थ्रेड👇
लॉकरमधून वस्तू चोरीला गेल्यास बँक भरपाई देते?
#मराठी #म #Banks
@MarathiRT @MarathiBrain @RtMarathi @Mazi_Marathi @HashMarathi तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या मौल्यवान वस्तू, सोनं वगैरे बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवता. यासाठी बॅंक तुमच्याकडून वार्षिक चार्जेसही घेते. परंतू जर त्या लॉकरमधील वस्तूंची चोरी झाली तर?.
@MarathiRT @MarathiBrain @RtMarathi @Mazi_Marathi @HashMarathi तुम्हाला यासाठी बॅंक कर्मचाऱ्याशी भांडण्याची गरज नाही. आरबीआयचा एक नियम तुम्हाला ग्राहक म्हणून इथे कामाला येतो.
एकच कंपनी अनेक स्टॉक एक्सचेंजेसवर लिस्टेड का असते?
थ्रेड👇
#म #मराठी #StockMarket #StockExchange
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi भारतात अनेक कंपन्या या बीएसई किंवा एनएसई अशा दोनही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट आहेत. इंफोसिससारखी कंपनी तर बीएसई एनएसई आणि अमेरिकेतील NASDAQ एक्सचेंजवरही लिस्ट आहे.
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi कंपनी जेव्हा स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते, तेव्हा तीला वन टाइम फी बरोबरच अन्युअल फीदेखील भरावी लागते. मग कंपन्या इतका खर्च करून कंपन्या वेगवेगळ्या एक्सचेंजेसवर का लिस्ट होतात. तर त्याला मुख्य तीन कारणं आहेत.
भारतात पहिली नोटबंदी कधी झाली होती?
थ्रेड👇
#म #मराठी #Money
भारतात १९५४ साली आरबीआयने ५ हजार व १० हजारांच्या नोटा छापल्या होत्या. पुढे या नोटा २४ वर्ष चालू राहिल्या. परंतू १९७८ साली या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.
थोडक्यात काय तर १९७८ पहिल्यांदा नोटबंदी करण्यात आली होती. तेव्हा ५ हजार व १० हजारांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात आल्या होत्या. बाकी इतर नोटा मात्र चलनात होत्या.