PaisaPani Profile picture
अर्थ विषयावरील सर्व अपडेट्स आपल्या मराठी भाषेत तुमच्यासाठी... 📲Whatsapp- https://t.co/G87QKpUJZs 📲Telegram- https://t.co/oO9DDgqffm 📲YouTube- https://t.co/dwgx70PxBb

Feb 28, 2023, 10 tweets

म्युच्युअल फंड की स्टॉक - गुंतवणूक नक्की कशात करावी?
बऱ्याच नवीन गुंतवणूकदारांचा स्टॉक विकत घ्यावेत? की म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी? याबाबत गोंधळ उडताना दिसतो. या थ्रेड मधून आपण दोन्हीही पर्यायांची थोडक्यात तुलना करणार आहोत. #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी

थेट कंपन्यांच्या स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक लॉंग टर्ममध्ये मोठा कॉर्पस निर्माण करू शकते. मात्र बरेच गुंतवणूकदार मार्केटमध्ये शॉर्ट टर्म साठी येणाऱ्या बदलांमुळे भावनिक होऊन खालील चुका करताना दिसतात - #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी

१. स्टॉकच्या किमतीत शॉर्ट टर्ममध्ये होणारे चढउतार पाहून खरेदी विक्री करणे.
२. भावनिक होऊन गुंतवणूक करणे किंवा गुंतवणूक काढून घेणे.
३. थोड्या स्टॉक्समध्ये खूप जास्त गुंतवणूक करून डायव्हर्सिफिकेशन न करणे.
४. गुंतवणूक करताना स्टॉकबाबत कोणतीही माहिती न घेणे,रिसर्च न करणे.#Thread #म

स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे आणि मोठे रिटर्न्स मिळवणे हे बऱ्याच जणांना मार्केटकडे आकर्षित करू शकते. मात्र निफ्टी 500 मध्ये असलेल्या कंपन्यांचा 31 डिसेंबर 2022 पर्यंतचा गेल्या पाच वर्षाचा रिटर्न पाहिला तर काहीसे वेगळे चित्र दिसते. #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी

या इंडेक्समध्ये असलेल्या 402 कंपन्यांपैकी 95 कंपन्यांनी 20% पेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. मात्र जवळपास 110 कंपन्यांनी निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. तर 115 कंपन्यांनी 0 ते 10 टक्के आणि 82 कंपन्यांनी 10 ते 20 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत.#Thread #StockMarket #MutualFunds

या आकडेवारीकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणे दिसायला सोपे असले तरी त्यातून रिटर्न्स मिळवणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा रिसर्च करावा लागतो.
#Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी

तसेच कंपन्यांची माहिती काढावी लागते आणि जिथे तुम्हाला खरोखर खात्री असेल अशाच ठिकाणी गुंतवणूक करणे योग्य ठरते. हे करूनही तुम्ही केलेली गुंतवणूक पुरेसे रिटर्न्स देईलच याची खात्री मात्र कोणीही देऊ शकत नाही. #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी

या उलट तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केलीत तर हेच काम काहीसे सोपे देखील होते. म्युच्युअल फंडाकडे फंड मॅनेजर, त्याच्या हाताखाली असलेले रिसर्च ॲनालिस्ट सेक्टर ॲनालिस्ट हे लोक प्रोफेशनली काम करून गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी

असे असले तरी म्युच्युअल फंड हेदेखील स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे त्यातही रिस्क असतेच. हा थ्रेड वाचून तुम्ही तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी की म्युच्युअल फंडात याचा निर्णय घेऊ शकता. #Thread #StockMarket #MutualFunds #म #मराठी

पैसापाणीचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल आताच जॉईन करा.
🎙व्हॉट्सॲप- chat.whatsapp.com/JqOKOXDyeGV7Ka…
🎙युट्यूबला सबस्क्राईब करा- youtube.com/@PaisaPani/?su…
🎙टेलीग्राम- t.me/paisapani

#म #मराठी

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling