म्हाडा पुणे सर्वसामान्यांना घरे मिळवून देण्याचे काम करत असताना त्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत.
लॉटरी तर निघते पण लोकांना घरेच मिळत नाहीत...
(१/५)
धक्कादायक आकडेवारी😱
१. सोडत जून २०१९
सोडतीतील घरे : ४७५६
प्रत्यक्ष घरांचे वाटप: १९६०
२. सप्टेंबर २०१९
सोडतीतील घरे : २४८८
प्रत्यक्ष घरांचे वाटप: १५३३
३. जानेवारी २०२२
सोडतीतील घरे : ४२२२
प्रत्यक्ष घरांचे वाटप: २४२३
(२/५)
४. जानेवारी २०२३
सोडतीतील घरे : ६०६५
प्रत्यक्ष घरांचे वाटप: ००००
यावर्षीची सोडत तब्बल ३ वेळेस पुढे ढकलली गेली असून त्यात बिल्डरांचे काहीतरी साटेलोटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 🔴
(३/५)
घरे मिळालेल्या लोकांची परिस्थिती?
ज्यांना घरे मिळाली आहेत त्यांना पाणी मिळत नाही, रस्त्याची वानवा आणि वरून पालिकेचा टॅक्स बाबत अनभिज्ञता अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.
म्हाडा मात्र यावर हात वर करत आहे...
(४/५)
अनेकजण आजही प्रतीक्षेत...
३-४ वर्ष उलटून सुध्दा अनेकांना घरे न मिळाल्याने म्हाडा चा भोंगळ कारभार उघड होत आहे.
एका बाजूला बँकेचे हफ्ते, घर भाडे आणि घर मिळण्याच्या दिवसाची अनिश्चितता यामुळे लोकांचा म्हाडा वरील विश्वास उडाला आहे.
पुण्यातल्या जवळजवळ प्रत्येक भागात गेली काही वर्ष रात्री 12 च्या सुमारास येणारे अनुभव. कुठल्यातरी छपरीचा वाढदिवस असतो. 26 ते 30 ची कंबर असणारी 40-50 पोरं 15 -20 बाईक्स वर ट्रिपल सीट आणि 32 ते 48 कंबर असणारे बाप्पे 2-3 कार मधे बसून साडेअकरा पासून
एरियात ढुंगणाला कुत्रा चावल्यासारखं किंचाळत - बोंबलत फिरतात. मग 12 वाजता त्या भागातल्या कुठल्यातरी आतल्या बाजूच्या चौकात सोबत आणलेले 3-4 केक तलवारीने किंवा मोठया चाकूने कापून फटाके फोडून परत एकदा कोकलतात. एकमेकांच्या तोंडाला केक फासून झाल्यावर यांचा तमाशा बघायला
जमलेल्या गल्लीतल्या कुत्र्यांच्या अंगावर मोठ्यानं ओरडत जाऊन त्यांना घाबरवणं, सोबतचे केक -बिअर वगैरेचा कचरा चौकातच फेकून देणं, थोड्या फार शिव्या देऊन ओरडणं असले चाळे करून झाले की 12:30 नंतर परत आरडाओरडा करत निघून जातात.
हा फोटो आहे स्पेन चा इवान फर्नांडीज केनिया च्या हाबेल मुताई ला स्पर्धा जिंकण्यासाठीची रेष ओलांडण्यास मदत करतानाचा.
झाले असे की,
२०१२ साली स्पेनच्या नावरा येथे क्रॉस कंट्री रेस मॅरेथॉन आयोजित केली गेली होती. त्यात अनेक देशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्पर्धक आले होते. इवान फर्नांडिज अनाया हा स्पेनचा धावपटू यात सहभागी झाला होता.
शर्यत अखेरच्या टप्प्यात असताना केनियाचा हाबेल मुताई शर्यत जिंकण्यापासून शेवटच्या ओळीपासून काही फूट अंतरावर होता, परंतु तो चिन्हात गोंधळून गेला आणि त्याला वाटले त्याने शर्यत पूर्ण केली. स्पॅनिश स्पर्धक इवान फर्नांडिज त्याच्या मागे होता.