शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करता कि म्युच्युअल फंड मध्ये ?
गुंतवणूक कोणतीही असो सर्वात महत्वाचं असत ते म्हणजे डिमॅट अकाउंट.
आणि आपल डिमॅट अकाउंट / म्युच्युअल फंड अकाउंट वाचवायचं असेल तर वेळीच नॉमिनी अपडेट करा !!

शेवटची तारिख ३१ मार्च २०२३.
🧵१/६
नॉमिनी ऍड कारण का महत्वाचे आहे?

२०२१ च्या एका रिपोर्ट नुसार ८२,००० करोड चे बँक अकाउंट, लाईफ इन्शुरन्स आणि PF बँकेत कोणी क्लेम न केल्यामुळे तसेच पडून आहेत असं का झालं ?
कारण त्यांनी नॉमिनीची माहिती भरलीच नाही आणि त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या परिवाराला हे पैसे मिळालेच नाहीत.
त्यामुळेच आता SEBI या बद्दल ठोस पावले उचलली आहेत जर तुम्ही ३१ मार्च २०२३ पर्यंत हि माहिती भरली नाही तर तुमचं डिमॅट अकाउंट फ्रीझ केलं जाईल.
नॉमिनी तुमच्या परिवारातील कोणतीही व्यक्ती असू शकते जस कि आई, बाबा, बायको , मूल, भाऊ - बहीण.
प्रोसेस सोपी आहे

सर्वप्रथम तुमच्या डिमॅट अकाउंट ला लॉगिन करा, सर्व प्लॅटफॉर्म मध्ये हि प्रक्रिया वेगळी असू शकते त्यामुळे अकॉउंट मध्ये डॉक्युमेंट कुठे सबमिट करायचे हे शोधा, झिरोधा साठी स्क्रीनशॉट बघा.
थोड्याफार फरकाने सर्व सारख्या आहेत.
#Zerodha #Kite
इथे तुम्ही जर एक नॉमिनी टाकत असाल तर १००% अलोकेशन राहील जर २-३ असतील तर % बदलून तुम्ही टाकू शकता. सोबत तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव, जन्मतारीख आणि पॅनकार्ड ची माहिती टाकावी लागेल.
हि माहिती भरल्यावर सबमिट वर क्लिक करताच तुम्ही NSDL च्या वेबसाईट वर याला,
इथे तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल मग एक OTP येईल तो टाकून सबमिट करा. म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण होईल, तुमचा नॉमिनी २-३ दिवसांत अकॉउंट मध्ये वेरिफाय करून अपडेट केला जाईल.
३ दिवसच बाकी आहे केलं नाही तर आत्ताच करा !!!
#मराठी #म
#६/६
#UPDATE
सेबीने ट्रेडिंग आणि डीमॅट खातेधारकांसाठी नामांकनाची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अतरंगी - कल्पेश 〠 ♻️

अतरंगी - कल्पेश 〠 ♻️ Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Atarangi_Kp

Mar 30
वाहन चालविण्याचा परवाना काढायचा म्हटलं कि RTO ला चकरा आणि एजेंट ला भरमसाट पैसे !!
सोबत डोक्याला नाहक त्रास !!
आता हि सुविधा एकदम सरळ सोप्पी झाली आहे, आपण ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसेन्स बस काही दिवसांत मिळवू शकता.
#मराठी #म
🧵1/n Image
लर्निंग लायसन्स ची प्रोसेस:
१. सर्वप्रथम तुम्हाला सारथी परिवहन या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. (लिंक साठी प्रोफाइल Bio चेक करा)
२. इथे आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला आपलं राज्य निवडावं लागेल.
३. राज्य निवडताच तुम्ही खालील पेज वर याल.
४. इथे तुम्हाला Apply Learning Licence ImageImage
वर क्लिक करायचे आहे.
५. मग तुम्हाला पुढची पूर्ण प्रक्रिया दिसेल त्याला OK करून पुढे जायचं आहे.
६. पुढच्यापर्यायामध्ये General निवडून सबमिट वर क्लिक करा.
७. पुढे तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन साठी येईल तिथे आधार नंबर टाकून OTP व्हेरिफाय करा.
८. हि प्रक्रिया होताच तुमच्या आधार Image
Read 8 tweets
Mar 29
गावच्या जमिनीचा ७/१२ उतारा आणि ८-अ उतारा सोबत नकाशा मिळवायचाय ?
मग भू-नकाशा महाराष्ट्र ला भेट द्या.
आता घरबसल्या / शहरात बसून तुम्ही ऑनलाइन गावच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता ते सुद्धा मोबाईल वर.

गावच शेत आणि जमीन हा मोठा संवेदनशील विषय आहे नाही का ?

#मराठी #म
🧵१/५ Image
जमिनीच्या हद्दी वरून होणारे वाद काही नवीन नाही त्यामुळे आपल्याजवळ हि माहिती असणे खूप गरजेचे आहे, आणि आता ती तुम्हाला एका क्लिक मध्ये मिळेल.

भू नकाशा ऑनलाईन कसा बघायचा?

१. सर्वप्रथम तुम्हाला' महा नकाशा महाभूमी' या वेबसाईट ला भेट द्या. (गुगल करा / लिंक बायो मध्ये आहे)
२.आता तुमच्या समोर त्या वेबसाईटचे मुखपृष्ट ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.

३. कॅटेगिरी पर्यायांमध्ये रुरल (ग्रामीण भाग) किंवा अर्बन (शहरी भाग) निवडावे लागेल.

४. सर्व माहिती निवडल्यानंतर तुम्हाला नकाशा लोड होईल. (थोडा धीर धरा स्लोव आहे) Image
Read 5 tweets
Mar 28
आधार कार्ड १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक जुने आहे?
तर वेळीच आधार कार्ड अपडेट करा, विनाकारण च्या चार्जेस / लेट फी पासून वाचा !!
पत्ता आणि नाव यात काहीही बदल नसेल तरीसुद्धा अपडेट करणे आहे बंधनकारक !!
प्रोसेस साठी पूर्ण थ्रेड नीट वाचा 👇
🧵 १/n
#मराठी #Aadhar #आधार
आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी फेब्रुवारी २०२३ मध्ये युआडीएआयने महत्वाची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून एजन्सीने केली, यामध्ये त्यांनी म्हटलंय कि तुमचं कार्ड (Issue Date) जर १० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला तुमचा पत्ता आणि ओळख अपडेट करावी लागेल म्हणजेच त्यासंबंधीचे
डॉक्यूमेंट्स वापरकर्त्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने पुन्हा सबमिट करावे लागतील.
जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्स अपडेट करता तर तुम्हाला ₹.५० आणि ऑनलाईन करता तर ₹.२५ सेवा शुल्क भरावे लागते, पण आनंदाची गोष्ट हि कि ऑनलाईन सेवा १४ जून २०२३ पर्यंत पूर्ण मोफत राहील.
Read 8 tweets
Mar 27
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती, बार्टी, सारथी इत्यादी संस्था मोफत शिक्षण संधी देतात. यापैकी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘महाज्योती’ यांच्यामार्फत महाज्योती फ्री टॅबलेट योजना राबविली जात आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण घेऊ
#मराठी
🧵 १/n
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय (Medical) व अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशाकरिता तयारी करत असतात. अशा विद्यार्थ्यांना मोफत NEET, CET परीक्षांच प्रशिक्षण देण्याचे काम महाज्योत संस्था दरवर्षी करते.दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोफत प्रशिक्षण सुरू झाल आहे
नोटीस👇
यासाठी पात्र विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर Online अर्ज करावा लागेल.
२०२५ मध्ये होणाऱ्या NEET, CET परीक्षांची तयारी करण्यासाठी महाज्योती संस्थाकडून विद्यार्थ्यांना १८ महिन्यांकरिता मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना
Read 10 tweets
Mar 27
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात घरांसाठी अर्थसहाय्य केले जाते.
ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात तर शहरी भागांमध्ये महानगरपालिका /तत्सम विकास विभागाकडे अर्ज सादर केले जातात या योजनेअंतर्गत नवीन घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदीसाठी अनुदान पुरवले जाते
🧵
१/n
सविस्तर माहिती वर दिलेल्या संकेतस्थळावर ते वेळोवेळी देत असतात आत्तापर्यंत ८२ करोड रुपये त्यांनी खर्चून १२२ लाख घरे या योजनेअंतर्गत बांधण्यात आल्याची माहिती संकेतस्थळावर आहे.
तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुमचं नाव त्यात आहे का हे तुम्हाला या यादीमध्ये पाहायचे असल्यास
संकेतस्थळावर जाऊन आधार नंबर टाकल्यानंतर तुमचं नाव तिथं आले का नाही तिथे तुम्हाला कळेल
जर तुम्ही फ्लॅट घेत असाल तर सबसिडी किती मिळेल हे जर पाहायचा असेल तर तुम्ही तिथे वर सबसिडी कॅल्क्युलेटर चा ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता यानुसार तुम्हाला सबसिडी दिसेल.
Read 8 tweets
Mar 26
तुमच्या लॅपटॉपमधील डेटा गमावणे हे एक भयानक स्वप्न असू शकते 😱

गेल्या ४ दिवसांपासून @RohanMagdum7 याला याचा भयानक त्रास सहन करावा लागला.

तुमचा मौल्यवान डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या खबरदारीचा हा धागा नक्की वाचा 🛡️💻
मूळ ट्विट: @RohanMagdum7
मराठी वाचकांसाठी👇
🧵
१. नियमित बॅकअप 🔄:
तुमच्या डेटाचा बॅकअप नियमित घ्या.

Google ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स किंवा iCloud सारख्या बाह्य हार्ड ड्राइव्ह किंवा क्लाउड स्टोरेज वापरा.

मानवी त्रुटी टाळण्यासाठी स्वयंचलित बॅकअप सेट करा.
२. सॉफ्टवेअर अपडेट करा 🚀:

तुमची ऑपरेटिंग सिस्टम आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवा.

असुरक्षा दूर करण्यासाठी अनेकदा महत्त्वाचे सुरक्षा पॅच येत असतात.

शक्य असेल तेव्हा स्वयं-अद्यतन म्हणजे ऑटो अपडेट सक्षम करा.
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(