९ ऑगस्ट १९४५ ला अमेरिकेने नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकल्यानंतर महायुध्द संपले..आणि
जपानसमोर भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला..झालेले नुकसान अतोनात होते..देशात शत्रू(!!) वास करून होता..बेट असल्याने बहुतेक सर्व गोष्टी आयात कराव्या लागत होत्या..तरीही पुढच्या २० च वर्षात जपान
जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक बनला..कारण होते -
१. जपानी माणसाची शिस्त आणि perfection ची आवड
२. महायुद्धामुळे आलेला नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव
३. युद्धानंतर जपानी चलनाची (yen ) कमी झालेली किंमत वा
ह्या गोष्टींमुळे काहीच वर्षात जपान जगातील सर्वात परफेक्ट आणि स्वस्त
+
वस्तू बनवणारा देश बनला..जपानी तंत्रज्ञान जगावर राज्य करू लागले..
Pac-Man..Supar Mario सारखे व्हिडिओ game,
Sony चे प्रसिद्ध वॉकमन,
Nikon,Cannon सारखे कॅमेरे,
होंडा,टोयोटा सारख्या ऑटो कंपन्या इ यांनी ह्याच काळात जग जिंकले..!
जगात अमेरिका,युरोपातील देश तसेच तंत्रज्ञान वापरून
+
~ तशाच वस्तू तयार करू शकायचे..पण..युद्धामुळे..जपानी चलन - येन डॉलरच्या तुलनेत इतके स्वस्त होते की त्याचं वस्तू जपान प्रगत देशांपेक्षा अर्ध्या किमतीत तयार करत होता..!
आणि म्हणूनच असा स्वस्त पण मस्त जपानी माल जगभर लोकप्रिय होत होता.. अमेरिकेत तर होंडाने इतका धुमाकूळ घातला..की
+
अमेरिकेची लाडकी हार्ले डेव्हिडसन कंपनी बंद पडून हजारो नोकऱ्यांवर गदा येते का काय असे वाटू लागले..😅
आणि त्याचवेळी जपानची अर्थव्यवस्था वर्षाला १०% वाढीची २०वर्ष पूर्ण करत होती..त्यांची भरभराट चालूच होती !
अशा वेळी..अमेरिका,युरोपातील प्रगत देश अर्थातच हे सगळं बघत बसणार नव्हती-
+
ह्या सगळ्याचे मूळ डॉलर येनच्या तुलनेत महाग आहे हे कळल्याने त्या अमेरिकादी देशांनी जपानी वस्तूवर मोठे कर लादणे..बंदी घालणे अशा छुप्या गोष्टींना सुरुवात केली..!
म्हणून मग नंतर..जपानला करार(The Plaza Accord) करावा लागला..ज्यात येनच्या तुलनेत डॉलर,पौंड इ ~ ५०% पडणार असे ठरले 😐
+
आता..जपानी वस्तू महाग होणार.. आणि म्हणून त्यांची मागणी कमी होणार..पर्यायाने अर्थव्यवस्था मंदावणार..असे जपानी सरकारला आणि त्यांच्या रिझर्व्ह बँकेला वाटले.. आणि म्हणून त्यांनी व्याजदर एकदमच २.५% वर आणून ठेवले..!
आणि..ह्या एका छोट्या निर्णयाने जपानी माणसासोबत सगळेच बदलून टाकले -
+
आता विचार करा..
आपल्याला जर आज सहज २.५% नी कर्ज मिळायला सुरुवात झाली तर आपण काय करू ? तेच जपानी लोकांनी केले..
त्यांनी स्टॉक आणि जमिनी घ्यायचा सपाटा लावला..इतका पैसा झपाट्याने मार्केट मध्ये आल्याने शेअर वाढू लागले..वर्षाचे २.५% व्याज काही दिवसात फेडून..पुन्हा मोठे कर्ज
+
घेऊन शेअर्स घेणे चालूच राहिले..
त्याने शेअर मार्केट अजूनच वेगाने वर जायला लागले..लोकांकडे पैसा खुळखुळायला लागला..बाजार खरेदी वाढली..इतका पैसा आल्याने..जमिनी घेणारेही कमी नव्हते..त्यात जपान पडले बेट..आधीच जमीन कमी..त्यात इतकी मागणी..आल्याने.. जमिनीच्या किमती आकाशाला भिडल्या !
+
असे म्हणतात- जपानमध्ये ९०च्या आसपास जमिनीच्या किमती इतक्या वाढल्या होत्या की अमेरिकेने तेव्हा त्यांची जपान मधील काही जमीन जरी विकली असती तर त्यांच्या देशावरचे सगळे कर्ज एका फटक्यात फिटले असते..!(आणि आज त्यांची कर्जामुळे होणारी डोकेदुखी झाली नसती.. असो..!)
पण तसे झाले नाही-
+
आणि जपानी माणसाने कर्जावर कर्ज आणि त्यावर पुन्हा कर्ज घेणे चालूच ठेवले.. त्या पैशांवर सगळेच श्रीमंत झाले..
लोकांना पैसा कुठे ठेवावा.. कुठे गुंतवावा कळेनासे झाले..सगळे जण टीप्स मागत फिरू लागले.. Groww करू लागले..
न् इथेच ह्या गोष्टीच्या हिरोईनची एन्ट्री होते..Nui तिचे नाव-
+
आता..जपानी संस्कृतीत अळीचे फुलपाखरात रूपांतर..तसेच.. Larva चे बेडकात रूपांतर अशा metamorphosis ला जादूई मानले गेले आहे..!
आपली हिरोईन Nui..ही दिवसभर ओसाका मधल्या एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करायची आणि रात्री कोण्या दैवी बेडकासोबत तिचे बोलणे होते असे दाखवून बया पैसे लाटायची..😄
+
तिला ह्या टीप्सच्या धंद्यात मोठा वाव दिसला..लोक टीप्स शोधत असतानाच तिने एका बँक मॅनेजर मित्राच्या मदतीने हा Gama Gareu(बेडूक)मला रोज उद्या कोणता शेअर वर जाणार हे सांगतो अशी अफवा उठवली..!
आणि मग काय.. तेव्हाच वातावरणच असे काही होते की..काहीच दिवसात..
लोक..अगदी करोडोंचा फंड सांभाळणारे लोकही त्या बोलत्या बेडकाचा सल्ला घ्यायला येऊ लागले !
तिचा game सोपा होता.. ज्या शेअरचे नाव ती सांगायची..तो शेअर तो आधीच घेऊन ठेवायची..आणि वर गेला की सगळ्यात आधी ती विकायची..सोबत.. बँक मॅनेजर मित्र होताच.. कर्ज द्यायला..!
दिवस जात होते तसा-
+
तिचा नफा वाढत होता.. आणि त्या नफ्यावर ती अजून मोठे कर्ज घेऊन..अजून जास्त नफा कमवायला लागली.. आणि पुढच्या १-१.५ वर्षातच Nui जपान मधील सगळ्यात मोठी गुंतवणूकदार..₹२० हजार कोटींची मालकीण बनली..आणि तिच्यावरचं कर्ज किती असेल ~ २० हजार कोटी..
पण लबाडीच ती..कधी ना कधी फसणार होतीच -
+
आणि तशी ती फसली..आणि शेअर मार्केट गडगडले..आणि मार्केट कधी एकटे पडत नाही..सगळ्या जपानी लोकांना घेऊनच ते आपटले..!
आता..कर्ज घेतले होते समजा १०० आणि मार्केट पडल्याने तारण ठेवलेल्या शेअर्सची किंमत झाली ५०..मग कर्जे बुडविली गेली.. मुद्दाम नाही.. पैसाच उरला नाही ना ? अन्
+
पैसाच उरला नाही मग जमिनी तरी कोण घेणार.. त्यांचे ही भाव चांगलेच आपटले..बँकांची बुडीत कर्ज ३०% पर्यंत पोचली..आणि ८५-९० सालात जगातील सर्वात श्रीमंत देश बनलेला जपान..मंदीच्या दुष्काळात अडकला..!
आणि ही मंदी थोडी थोडकी नाही तर तब्बल ३३ वर्ष चालली..!
+
आज, २०२३ ला जपान त्या मंदीतून बाहेर येईल अशी चिन्हे दिसताहेत..जपानचा सेन्सेक्स - Nikkei..३० वर्षांहून आधी केलेला उच्चांक(~३१ हजार) मोडू पाहतो आहे..
आणि त्याच निमित्ताने लिहिलेला हा थ्रेड..
A
टीप -
१. Nikkei अजूनही 89-90 सालच्या उच्चांकापासून(~४० हजार) बराच लांब आहे..!
+
२. जपानच्या ह्या गोष्टीतून शिकण्यासारखं खूप आहे..जसं
स्टॉक मार्केट मधील हाव कशी असते ?
टीप्स वर अवलंबून राहिल्यास काय होतं ?
फक्त मिळतंय म्हणून लोन पे लोन घेतल्याने काय होऊ शकतं..?
RBI जे रेपो रेट जाहीर करत असते त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो ? इ इ
+
३. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे थ्रेडमध्ये वापरलेली सर्व चित्रे ही
Midjourney नावाच्या Artificially Intelligent BOT कडून त्या त्या टुविटचे key words देऊन काढून घेतली आहेत..🤯😄
सध्या त्याचे subscription चालू झाले असले तरी अधून मधून फ्री trial चालू असते..✌️
+
आता इथपर्यंत पोचलाच आहात तर अशाच Geopolitical आणि economy related २-३ thread जोडतो..कसे वाटतात बघा..आणि तुमच्याकडे कोणता intresting विषय असेल तर तोही सुचवा..😃🙏
Dedicated Freight Corridor म्हणजेच ' रेल्वेच्या फक्त मालगाड्या चालण्यासाठीचा वेगळा रुळ ' हा भारतातील प्रत्येक नागरिकाला मदत करेल असा महत्त्वाचा प्रोजेक्ट..!
पण..
फक्त एक वेगळा रुळ काय बनवला त्यात इतके काय विशेष आहे ???