मी पण बोलतोच Profile picture
#आराध्यदैवत #मराठीसाठीकाहीपण #कोंकण #महाराष्ट्रीयन #हिंदू #भारतीय #ऐतिहासिक #मजेशीर #प्रेरणादायक #विरंगुळा #थोडक्यात #युक्तीचा_ठेचा #राजकीय
16 Jan
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#Threadकर

🚩१६ जानेवारी १६६०🚩
अफजलखान वधानंतर पन्हाळगड, कोल्हापूर प्रांत हरलेल्या आदिलशहाने मराठ्यांवर दुसरी मोहीम उघडली. रुस्तुम झमान, फाझल खान छत्रपती शिवरायांवर चालून आले असता
त्यांचा पराभव होऊन त्यांनी पुन्हा विजापूरची वाट धरली.

🚩१६ जानेवारी १६६६🚩
पन्हाळगड जिंकण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डाव 'नेताजी पालकर' वेळेवर न आल्याने फसला. १००० मावळे कापले गेले आणि मराठ्यांचा पराभव झाला. नेताजी पालकरांना छत्रपती शिवरायांनी बडतर्फ केले आणि
त्या जागी कुडतोजी गुजरांना 'प्रतापराव' ही पदवी देऊन सरनौबत बनवले.

🚩१६ जानेवारी १६६८🚩
इंग्लंडच्या राजाने १६ जानेवारी १६६८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी दयावी म्हणून विनंती केली. उत्तरादाखल २ ऑगस्ट १६६८ रोजी महाराजांनी
Read 12 tweets
15 Jan
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#Threadकर

🚩१५ जानेवारी १६५६🚩
महाराजांनी छापा घालुन जावळी काबीज केली.
महाराजांच्या बळापुढे चंद्रराव मोरे यांचे बळ अपुरे पडू लागले. चतुर्बेट संभाजी कावजी कोंढालकर यांच्या हाती पडले. जोहोरखोरेही रघुनाथपंतांनी Image
काबीज केले. हणुमंतराव मोरे या धुमश्चक्रीत मारला गेला. तर प्रतापराव मोरे निसटून विजापूरला पळून गेला. सिवथर खोरेही महाराजांनी जिंकले. इथल्या बाबाजीराऊ या मोरे यांचा कारभारी याला कैद करून महाराजांनी त्याचे डोळे काढले. खासा चंद्रराव व मुरारबाजी यांनी जावळी बराच वेळ लढविली. पण अखेर
चंद्ररावास माघार घ्यावी लागली. तो आपल्या बायकामुलांसह रायरी किल्ल्यावर लपून बसला. जावळी महाराजांनी सर केली. जावळीवर महाराजांचे निशाण लागले तो दिवस होता.

🚩१५ जानेवारी १६८१🚩
राज्याभिषेकाचे तुलादान विधी!
राज्याभिषेकाचे तुलादान विधी पार पडले. त्याजबरोबर विधीवत करावयाचे अनेक विधी
Read 16 tweets
9 Jan
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
#Threadकर

🚩९ जानेवारी १६३३🚩
पहांटे भंडाऱ्याच्या होंगरावर प्रसिद्ध सत्पुरुष तुकारामबोवा यांना स्वप्नांत गुरुपदेश झाला.
हा गुरुपदेश होण्यापूर्वी तुकारामाची मानसिक व्यथा पाहण्यासारखी आहे. शके १५२० मध्ये
एकनाथमहाराज समाधिस्थ झाल्यावर दहाच वर्षांनी तुकोबांचा जन्म देहू येथे झाला. त्यांच्या घरामध्ये भगवद्भक्ति पहिल्यापासूनच असून वडील बोल्होबा यांची पंढरीची वारी अखंडपणे चालू होती. घरी थोडी शेती, व्यापारधंदा व सावकारी होती. या कुटुंबांत वयाची तेरा वर्षे तुकोबांनी आनंदांत घालवली.
त्यानंतर त्यांचे लग्न झाले. पहिली बायको दमेकरी निघाली म्हणून दुसरे लग्न केले. बोल्होबांनी सर्व संप्तार तुकोबांच्या गळ्यांत टाकला. तुकाराम- बोवांनीहि आरंभाच्या काळांत चोखपणे संसार केला. पण त्यानंतर एका- मागून एक दुःखाचे डोंगर कोसळले. वयाच्या सतराव्या वर्षी वडील निवर्तले.
Read 27 tweets
27 Oct 20
#इतिहास_शिवरायांचा
#शिवकालीन_दिनविशेष

🚩२७ ऑक्टोबर १६६७🚩
संभाजीनगर(औरंगाबाद) येथे "छत्रपती संभाजीराजे" आणि "शहजादा मुअज्जम" यांची भेट.
यावेळी शंभूराजेंबरोबर "सरनोबत प्रतापराव गुजर, निराजी पंत, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी सबनीस" इत्यादी मंडळी होती. Image
संभाजीनगर(औरंगाबाद) ला गेल्यावर शंभूराजेंनी "महाराजा जसवंतसिंह" यांचीही भेट घेतली होती.

🚩२७ ऑक्टोबर १६७१🚩
"छत्रपती शिवरायांचा" शिवापट्टण येथे मुक्कामी.

सुरतेच्या लुटीनंतर पाठलागावर असलेल्या दाऊदखानाचा विचार न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सैन्यासह वन्हाड प्रांतात
लुटीला सुरुवात केली तर मोरोपंतांनी बागलाण प्रांतात धुमाकूळ मांडला. मनसोक्त लूट करून पुन्हा दोन्ही सैन्याने एकत्र येत फतुल्लाखानाकडून साल्हेरचा किल्ला हस्तगत केला. पुढे १६७१ चा पावसाळा संपताच शिवाजी महाराज शिवापट्टणला विश्रांतीसाठी गेले होते.
Read 8 tweets
5 Oct 20
#चिपळूणच्या_गोविंदगडावरची #चित्तथरारक_ऐतिहासिक_घनघोर_लढाई
#सरनोबत_नरवीर_पिलाजी_गोळे

🚩५ ऑक्टोबर १७३३🚩

शब्दांकन: सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा वंशज,
आग्रावीर अँड मारुती बबन गोळे

सर्व दुर्ग मित्रांना, दुर्ग अभ्यासकांना, दुर्ग भटक्यांना नमस्कार Image
मित्रांनो इतिहासाची पाने जेवढी उलगडून पहिली जातात, वाचली जातात तेवढा इतिहास हा जगासमोर आणता येतो,
इतिहासाचा अभ्यास करत असताना, नवनवीन संशोधन करताना कधी कधी आपल्याच घराण्याचे जर मूळ पत्र सापडले तर जो आनंद मिळतो त्याला जोड नाही,
इतिहासात छत्रपती शिवराय, यांनी जवळपास 350 गड, दुर्ग स्वराज्यत समाविष्ट केले, काही नवीन बांधले, अन त्याच गडांमुळे नंतरच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य हे अटकेपार झेंडा लावण्यात यशस्वी झाले, प्रत्येक गडावर रणसंग्राम झाला आहे, प्रत्येक दुर्गावर घनघोर युद्ध झाले आहे,
Read 39 tweets