मराठी गुंतवणूकदार Profile picture
#शेअर_बाजार व गुंतवणूक माहिती. व्यवसायवृद्धी. सेबी अधिकृत ब्रोकर. गुंतवणूक सल्ला नाही. MF SIP. NPS. Insurance. डिमॅट अकाउंट लिंक- https://t.co/3VXhmUaIMS
Feb 17, 2022 7 tweets 2 min read
संघर्ष दीर्घकाळ चालतो आणि एक दिवस विजयाचा असतो! कुठलीही गुंतवणूक अशीच आहे. शेअर बाजारात किंवा MF मध्ये आपण अनेक वर्षे गुंतवणूक करत असतो. आपले शेअर्स वाढत नसतील तर वैफल्य येतं. पण वाईट काळ संपतो अन quality शेअर परत एकदा वाढू लागतात अन अवघ्या काही महिन्यात तुफान परतावा मिळतो.
1 टर्म इन्शुरन्स काढतानाही तेच असतं. उगाच कंपनीला प्रीमियम भरत आहोत असं मनात विचार येतो. पण त्या लोकांना याचं महत्व कळतं जेंव्हा दुर्दैवी मृत्यू नंतर आर्थिक आधार मिळतो. बरीच मंडळी महिन्याला 500-1000 रुपयांची बचत करतात, RD वगैरे करतात.
2
Dec 21, 2020 10 tweets 2 min read
#गुंतवणूक कराच!
तर... मागे म्हंटल्याप्रमाणे मंदी काही सांगून येत नसते. ती अचानकच येत असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. काही अंशी अंदाज होताच पण एका सत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पडझड होईल असं कोणीच गृहीत धरून चाललं नव्हतं.
👇👇👇 19 डिसेंबरला सांगितलं होतंच की "मंदीची लाट" येण्यासाठी काय निमित्तमात्र ठरू शकेल. पडझड सुरू झाली आहे आणि काही काळ ती सुरू राहील असा अंदाज आहेच. इतके दिवस करेक्शनची वाट पाहणारे आजच्या बाजारातील रक्तपात बघून घाबरले असतील. पण खरं सांगायचं झालं तर हीच संधी आहे!
👇👇👇
Oct 25, 2020 6 tweets 2 min read
।। दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा।।
टिप्स
अंधाधून ट्रेडिंग
स्वस्त विचार
अफवा
बेशिस्त
भावनिक दृष्टिकोन
अहंकार
नैराश्य
कर्ज
व्यसन

हे आहेत शेअर बाजारातील दहा अवगुण! जोपर्यंत यावर मात करता येणार नाही तोपर्यंत तुमची गुंतवणूक आणि ट्रेडिंग निरर्थक असेल...
👇👇👇 1. टिप्स- आपली गरज आणि रिस्क न ओळखता इतरांच्या सल्ल्यावरून (टिप्स) शेअर्स खरेदी करणे.

2. अंधाधून ट्रेडिंग- हातात मोबाईल आहे, त्यात इंटरनेट आणि ट्रेडिंग app आहे म्हणून मनात येईल तसं अविचारी ट्रेड घेणे.

3. स्वस्त विचार- Qyality शेअर्स घेण्याऐवजी छोटे अर्थात Penny Stocks घेणे.
👇
Mar 22, 2020 31 tweets 41 min read
#कोरोना_वायरस मुळे भारतात “Work From Home” हा मार्ग अवलंबला जात आहे. या निमित्तानेच आपण शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना घरबसल्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी काही लेख मी या थ्रेडमधून पोस्ट करत आहे. फार विचार न करता पेपरमधील लेख निवांतपणे वाचतो तसे हे लेख वाचा.
#Thread 1
शेअर बाजार हे गुंतवणुकीचं एक माध्यम आहे. पण गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊयात या पोस्टमध्ये!
#मराठी #गुंतवणूक #sharemarket #ब्लॉग #मराठी_गुंतवणूकदार

latenightedition.in/wp/?p=3445
Mar 6, 2020 12 tweets 3 min read
येस बँक का बुडाली?
वाचा #thread
बँका का बुडतात हा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्याआधी बँका काम कशा करतात हा मुद्दा जाणून घेऊयात!

कुठल्याही व्यवसायात काहीतरी भांडवल, रॉ प्रॉडक्ट म्हणजे वस्तू किंवा सर्विस असते। बँकेकडे "पैसा" हेच भांडवल आणि पैसा हेच रॉ मटेरियल आहे।
#मराठी_गुंतवणूकदार बँकेकडे ग्राहक (सामान्य ग्राहक व संस्था) पैसे ठेवतात अन त्या ठेवींवर त्यांना व्याज मिळतं। साधारणपणे FD (Fixed Deposits) वर ते 7% वगैरे असतं आणि बचत खात्यावर 4% वगैरे असतं। यात काही अंशी कमी जास्तही असेल।