Sachin Survase Profile picture
Owner and founder| @PAPERYFLY BAMBOO TOOTHBRUSHES I @KALLYFSOCAFE I Working for plastic free homes I Zero waste Movement I
Jun 15, 2020 16 tweets 7 min read
Story of hidden side of an Entrepreneur
उद्योजकाच्या अनोळखी विश्वात.
काहीतरी करून दाखवायचं हा विचार ज्या दिवशी येतो त्या दिवसा पासून सुरु होतो एक खडतर, काटेरी प्रवास, जो बाहेरून खूप रंगीबेरंगी दिसतो. सगळं सुरळीत चालू असतं, ३० तारखेला बँकेत पगार जमा व्हायचा, (1/n) सुट्ट्या मिळायच्या, नवरा बायको मुलं असं सगळं सुरळीत चालू असताना काहीतरी करून दाखवायचा विचार त्याला बसू देत नाही. भला मोठ्ठा पगार सोडून काहीतरी करू नको पासून ते आपण करू इथपर्यंत चा प्रवास म्हणजे आपल्या जोडीदाराला समजावून सांगणे.
(2/n)
Jun 1, 2020 5 tweets 2 min read
१. कोणत्याही उद्योगात सुरू करताना खालील बाबींचा नक्की विचार करा.

१.मार्केट चा अभ्यास करा.
२.कच्या मालाची वाहतूक कमी होईल असे ठिकाण निवडा.
३. ह्या उद्योगातील काम करत आहेत अश्या व्यक्तींना भेटून अधिक जाणून घ्या.
#मराठी_उद्योजक
#म
४. ह्या प्रक्रिया साठी लागणारे यंत्र खरेदी करण्या आधी , यंत्र बनविणाऱ्या कंपनी ची प्रत्येक्ष भेट द्या. त्यांनी बनविलेले यंत्र कुठे कार्यान्वित असतील तर त्या ठिकाणी सुद्धा भेट द्या. तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेऊ नका. डिजिटल युग आहे, फोटो मध्येच छान दिसते.
May 18, 2020 27 tweets 11 min read
#थ्रेड
टोमॅटो प्रक्रिया उद्योग - नव संजीवनी
१. महाराष्ट्रातील प्रमुख फळभाज्यांच्या पिकांत टोमॅटोचा समावेश होतो. टोमॅटोचे मूळ स्थान पेरू व मेक्सिको, तर भारतात त्याला आणले पोर्तुगीजांनी.
टोमॅटो सर्वसाधाणपणे भारतीयांच्या परिचयाचा आहे. भारतात बारमाही उत्पन्न येणारा फळ म्हणजे टोमॅटो. २. भारतीय बाजारपेठा मध्ये शेतकऱ्यांना नेहमीच त्याने कष्टाने कमावलेले पीक कवडी मोलात विकताना पाहतो ह्याचे कारण म्हणजे कोणतीही ठोस उपाययोजना नसणे.
परंतु ह्याच कवडी मोलाने विकलेल्या पिकावर मोठ्या कंपन्या भला मोठ्ठा नफा कमावतात.
May 12, 2020 23 tweets 10 min read
#थ्रेड
बांबू उद्योग- एक सुवर्णसंधी

बांबू उत्पादन मध्ये भारत देश जगातील नंबर २ चा देश आहे.बांबू बद्दल असणारी उदासीनता झटकून पुढे येणाऱ्या संधीचा फायदा आपण करून घ्यायला हवा. वातावरणामध्ये होणारे बदल, त्याचा होणार परिणाम ह्या वर अंकुश मिळविण्या साठी प्रत्येक देशाने कंबर कसली आहे. २. ह्या बाबीमध्ये येणाऱ्या काळात बांबू ला विशेष प्राधान्य दिलं जाईल त्यामागचं प्रमुख कारण म्हणुजे कार्बन शोषून घेण्याची सर्वात जास्त क्षमता बांबू मध्ये आहे. भारतामध्ये दर वर्षी एक माणूस साधारण २००० किलो कार्बन उत्सर्जित करतो.
May 8, 2020 17 tweets 8 min read
हेअर सलून आणि ब्युटी स्पा इंडस्ट्री - एक संधी.

१. कोरोना राज्यात आणि देशात धुमाकूळ घालत असताना त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे. मराठी माणसासाठी सर्वात दुर्लक्षित क्षेत्र म्हणजे हेअर सलून. २. काही लोकांना लाज वाटेल परंतु व्यवसाय हा व्यवसाय म्हणून पहिला कि कोणत्याही गीष्टी ची लाज वाटत नाही. ह्या विषयावर सविस्तर लिहिण्याचं कारण म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात होणारी वाढ , आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं असणारं लक्ष , होणारी उलाढाल हि खूप मोठी असणार आहे.
Feb 22, 2020 18 tweets 4 min read
औषधांचा जन्म :
जसा माणसाचा जन्म एक चमत्कार आहे अगदी तसाच औषधांचा जन्म सुद्धा! जेव्हा लाखो शुक्राणू स्पर्धा करत असतात त्यातील क्वचितच एखादा उसेन बोल्ट सारखा पराक्रमी निघतो आणि स्त्री बीजकुशपर्यंत पोहचतो आणि मानव प्राण्याचा जन्म होतो अगदी तसाच औषध जन्माचा विषय पण गुंतागुंतीचा. औषध म्हणजे जन्म मृत्यू मध्ये संजीवनी देणारा रासायनिक पदार्थ. एखाद्या रोगावर नवीन ऍलोपॅथिक औषध निर्माण करायचं झाल्यास ती संपूर्ण प्रक्रिया कशी असते हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया.लाखो रासायनिक पदार्थ प्रयोगशाळेत बनवून झाल्यावर त्यातील एखादाच औषधयामध्ये रूपांतर होत. (२)