#कोरोना शी दोन हात करताना आपली #आर्थिक बाजू ढासळलेली आहे ती सावरण्यासाठी-
१. २० ते ४५ वयोगटातल्या निरोगी नागरिकांना लाॅकडाऊन थोडा सैल करून काम करण्याची मुभा द्यावी
२. अत्यावश्यक सेवा,जीवनावश्यक वस्तूंबरोबरच इतर गरजेचे कारखाने,सेवा आणि दुकाने (माॅल/थिएटर वगळून) चालू करावेत #म 👇
३. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त कृषी ऊत्पादने,इतर माल राज्यांत आणि परदेशात निर्यात करण्याची व्यवस्था ऊभारावी.
४. फळप्रक्रिया ऊद्योग,दूग्धव्यवसाय,इतर शेतीपूरक धंदे,पॅकेज/तयार अन्न तसेच कोल्ड स्टोरेजला प्रोत्साहित करून त्याद्वारे ऊत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत.
#मराठी #म #शेती 👇
५.साफसफाई आणि स्वच्छता या कामी जास्तीत जास्त यांत्रिक ऊपाययोजना वापरून त्या कर्मचाऱ्यांना इतर अनेक अत्यावश्यक सेवेसाठी तयार करावे.
६. मुंबई,पुणे आणि इतर शहरातील निरोगी पण गरीब,मजूर,वयोवृद्ध आणि परप्रांतीय ज्यांना त्याच्या मुळगावी जायचे असेल त्यांना तिकडे क्वारंटनकाईन करण्याची 👇
व्यवस्था करून ताबडतोप पाठविण्यात यावे.
७. या काळात सरकारी कर्मचारी तसेच खाजगी कंपन्यांमधे काम करणाऱ्यांसाठी सरकारने विशेष सोईसुविधा आणि भविष्यात काही ठोस फायदे मिळतील याच्या योजना जाहीर कराव्यात.
८. सरकारने ऊद्योगांसाठी काही फुकट द्यावे ही माझी वैयक्तिक इच्छा नाही 👇 #म
परंतु जे आजपर्यंत प्रामाणिकपणे सर्व कर आणि सरकारी नियम पाळत आलेत त्यांच्यासाठी वेगळे पॅकेज द्यावे आणि ते दिर्घकालीन असावे.
९. हा देश, हे राज्य माझे आहे, याची जागतिकपातळीवरील सामर्थ्यवान प्रदेश म्हणुन गणना व्हावी हे एक ऊद्योजक म्हणून माझे स्वप्न आहे, या कामी जे पडेल ते काम #म 👇
आणि कष्ट करण्याची हिंमत आणि ताकद आहे.
प्रत्येकजण या ध्येयाने झपाटला तर हे शक्य आहे.
याकामी सर्वांचीच मदत लागेल आणि एकत्र राहुन काम केले तर हा आपला महाराष्ट्र देशालाच काय, जगाला पण या कोरोना रूपी अंधारातून प्रकाशाकडे नेऊ शकतो.
धन्यवाद 🙏 #मराठी #महाराष्ट्र #म #Thread #कोरोना
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
