संपूर्ण धर्माला एका चष्म्यातून बघु नका..परवा तबलिगी जमातीने जे केल ते नक्कीच चुकीचं होत किंवा त्यानंतर झालेली दगडफेक अथवा डॉक्टरांप्रती केल्या गेलेले बिभित्स व लाजीरवाणं वर्तन निश्र्चितच अक्षम्य..ती घटना समाजजीवनाला काळिमा फासणारी अशीच आहे🙏🏻.मित्रांनो तुम्हीदेखील लहानपणापासून
कोणत्या ना कोणत्यातरी मुस्लीम धर्मीय शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण घेतलं असेल, ज्यामुळे तुम्ही आजच्या हुद्द्यावर आहात व तुम्ही आयुष्यात जे काही आहात त्यात त्यांचा खारीचा वाटा असेलच.. लहानपणी किंवा आत्ताजरी आजारी पडलात तरी डॉ.मुस्लीम आहे का हिंदू हे न पाहता बिनधास्तपणे उपचारदेखील
घेत असचाल..हीच लवचिकता बाळगायचा प्रयत्न करा..मान्य आहे कट्टरता,अशिक्षितपणा ह्यामुळे समाज भरकटलेला आहे नवीनपणा स्विकारत नाहीय व त्यात तबलिगींचे गुरु त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत.पण गव्हासोबत किडे रगडणे योग्य नाही.सर्वात भयंकर काय असेल तर धार्मिक विष..
शेवटी एकच..तुलना होऊच शकत नाही तरीही बोलतो..कसाब आणि #कलाम(साहेब) मधला फरक समजुन घ्या..ईन्सान #कर्म से पहचाना जाता है, नाकी उसके धर्म से!🙏
आपलाच कुणाल पवार🙏..टिप-हा लेख मार्च मधील आहे.आज उच्च न्यायालयाने सरकार आणि न्युज चॅनलला फटकारले त्यामुळे. #म #मराठी #रिम #धर्म #माणुस
#tabligi #tabligijamat #godimedia #propoganda #religion #loksatta #sakal #sakalnews #lokmat #मटा #lokmat #HinduMuslim @CMOMaharashtra
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
