मा.निर्मला सितारामनजी..देशाला खर्या अर्थाने दिशा देणारे जे ठराविक सर्वोच्च मंत्रीपदं आहेत त्यातल्या एका पदावर आपण विराजमान आहात..पण ज्यादिवशी पासुन आपण अर्थमंत्री पद धारण केले तेव्हापासून नेहमीच media समोर आपल्याला ऐकताना आपण मंत्री कमी आणि पक्षाच्या
प्रवक्त्या असल्याचा भास झाला..आणि माझ्या मताला बळकटी द्यायला आपल्या सभोवतालची मंडळी तेव्हढीच जबाबदार आहे..उदाहरणं देतो त्याशिवाय माझ्या thread ला आणि मताला बळकटी येणार नाही..
१)जेव्हा वाहनक्षेत्रात तीव्र मंदी कशामुळे चालुय अस विचारलं गेल तेव्हा आपण निरागसपणे म्हणालात,"ओला,उबर
मुळे वाहनांचा खप कमी झालाय,त्यांचा वापर वाढलाय म्हणुन कोणी गाड्या विकत घेईना"..मला वैयक्तिक वाटत की देशातल्या मेट्रो सिटी आणि महत्त्वाची शहर सोडली तर ओला,उबर दुसरीकडे कुठे अस्तित्वात नाही..मग त्याचा एव्हढा परिणाम कसा झाला?(माझ चुक असेल तर दुरूस्त करावे🙏)
२)देशात मंदी आलीय अस
म्हणल्यावर ह्यांचा एक खासदार म्हणतो,"एवढी लग्न होत आहेत मग मंदी कस काय म्हणता??" असो..
३)आणखी एका पठ्ठ्याच विधान असच आलं जेव्हा त्याला विचारलं आर्थिक मंदीबद्दल काय वाटत आपल्याला,तो म्हणतो"रेल्वेला एव्हढी गर्दी आहे तर आर्थिक मंदी कुठं दिसतीय तुम्हाला"
४) महाराष्ट्राच्या सांसदरत्न
आ.सुप्रियाताईंनी आपल्याला लोकसभेत कांद्याच्या दराबद्दल विचारल तेव्हा आपलं उत्तर ऐकुन मला खुप मनस्ताप झाला(कारण माहित नाही,आपण माझ्या मतदारसंघाच्या प्रतिनिधी ही नाही तरीपण)"मी ज्या कुटुंबातुन येते त्यांना कांदा,लसणाच्या किंमतीबद्दल विशेष काही देणंघेणं नाही कारण आम्ही ते खात नाही"
आणि आज आपण हे विधान केलं,आजची पत्रकार परिषद घ्यायच्या अगोदर तुम्ही अक्षय कुमारचा 'Oh my God' चित्रपट पाहिला होता का?त्यामध्ये दाखवलयं परेश रावलने त्याच्या दुकानाचा विमा उतरवला असतो पण भुकंपामुळे त्याच दुकान कोसळतं,तो नुकसानभरपाई मागायला गेल्यावर विमाकंपनी त्याला 'Act of god' च्या
Scheme खाली गोल करते..पुढचा सिन मजेदार आहे,ज्यांनी पाहिलाय त्यांना समजलं असेल मला काय म्हणायच आहे ते..असो🙏😄 मला एव्हढच म्हणायच आहे आपल्याला हातळताना आलेल्या अपयशाचे चेंडु इकडुन तिकडे ढकलताना कधी कधी स्वतावर पण जबाबदारी घ्या म्हणजे बरं वाटलं🙏🙏..अर्धवट GST,फसलेली नोटाबंदीमुळे
अर्थव्यवस्था कोलमडली होतीच आता कोरोनामुळे आणखी कठीण म्हणजेच खपल्यात जमा आहे.🤕🙏
मी खासगीकरणावर ही बोललोय त्याची thread खाली आहे नक्की वाचा🙏
#म #धागा #मराठी #रिम #स्वलिखीत #अर्थव्यवस्था #NirmalaSitharaman #सरकार #Ola #uber #केंद्र_सरकार #NCP #लोकसभा #GSTCouncil #privatisation
@anil010374 @ankita__SA @paddy_064 @OfficeOfPunekar @incognitoGumnam @AtulAmrutJ @PomaneSpeaks @NCPspeaks @NCPspeaksBMT
खासगीकरण बद्दल🙏
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
