🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Sep 8, 2020, 13 tweets

१ मे १९६० ला #महाराष्ट्र स्थापन झाल्यावर राज्याचे सुसंघटित व्यवस्थापन राबविण्यासाठी वेगवेगळे विभाग करण्यात आले.ह्या थ्रेडमध्ये आपण त्याबद्दल व राज्यातील सर्वात मोठा सर्वात लहान जिल्हा,नागरी प्रशासन-ग्रामीण प्रशासन ह्याबद्दलही माहिती घेऊया..
#म #मराठी #धागा #महाराष्ट्र

(अ) महाराष्ट्रात एकुण ६ प्रशासकीय विभाग आहेत.
(१)नागपूर
(२)अमरावती
(३)औरंगाबाद
(४)नाशिक
(५)पुणे
(६)कोकण
*'औरंगाबाद' विभागात सर्वात जास्त जिल्हे(८) असुन सर्वात जास्त म्हणजे एकुण ७६ तालुके आहेत.
*'कोकण' विभागाची सगळ्यात जास्त लोकसंख्या असली तरी सगळ्यात कमी तालुके 'कोकण'मध्ये आहेत.

*'पुणे','नाशिक' व 'अमरावती'मध्ये सर्वात कमी (५) जिल्हे आहेत.

(ब) महाराष्ट्रात एकुण ५ प्रादेशिक विभाग आहेत.
(१)कोकण (मुंबई)
(२)पश्चिम महाराष्ट्र (पुणे)
(३)खानदेश (जळगाव)
(४)मराठवाडा (औरंगाबाद)
(५)विदर्भ (नागपूर)
आज महाराष्ट्रात ३६ जिल्हे,३५८ तालुके,५३४ शहरे व ४३,६६५ खेडी आहेत.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिले तर,

*प्रशासकीय विभाग:-औरंगाबाद सर्वात मोठा(६४८१३चौ.कि.मी.) तर कोकण सगळ्यात लहान(३०७२८ चौ.कि.मी.)

*प्रादेशिक विभाग:-विदर्भ सगळ्यात मोठा(९७४०४ चौ.कि.मी,११ जिल्हे,१२० तालुके) तर खानदेश सर्वात लहान(२४,९१५ चौ.कि.मी,३ जिल्हे,२५ तालुके)

*सर्वात मोठा जिल्हा:-अहमदनगर

*सर्वात लहान जिल्हा:-मुंबई शहर

*सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा:-नांदेड व यवतमाळ (१६ तालुके)

*सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा:-मुंबई शहर (० तालुके)

राज्यातील शहरी भागाचा विकास करण्याकरता शासनाने नगरविकास खाते सुरू केले व त्याद्वारे महानगरपालिका,नगरपालिका व नगरपंचायती स्थापन केल्या.
*महानगरपालिका(मनपा):- यांचा कारभार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार चालतो.(बृहन्मुंबई मनपासाठी मुंबई मनपा अधिनियम,१८८८).एकुण २७ मनपा

असुन बृहन्मुंबई सर्वात मोठी महानगरपालिका आहे.
विभागानुसार मनपा संख्या:-
नागपुर(२)
अमरावती(२)
औरंगाबाद (४)
पुणे(५)
नाशिक(५)
मुंबई (कोकण)(९)
*२७वी व कोकणातील ९ वी मनपा रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे स्थापन करण्यात आली आहे.(2016 साली)

*नगरपालिका:- राज्यात एकुण २३४ नगरपालिका व १२४ नगरपंचायती आहेत.यांचा कारभार नगरपरिषद,नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम १९६५ नुसार चालतो.

*कटक मंडळे(कॅन्टाॅनमेंट झोन):- लष्कराची छावणी असलेल्या ठिकाणी कटक मंडळे स्थापली जातात.त्यांचे प्रशासन लष्कराच्या प्रशासकाद्वारे(कटक मंडळ कायदा १९२४ नुसार) बघितले जाते.सध्या भारतात ६२ कटक मंडळे असुन महाराष्ट्रात ७ आहेत.
(अहमदनगर,औरंगाबाद,देहु रोड,खडकी,पुणे,देवळाली व कामठी)

वरती आपण नागरी प्रशासन पाहिले आता ग्रामीण प्रशासनाकडे वळुया.
राज्यातील ग्रामीण भागातील प्रशासनासाठी महाराष्ट्राने 'त्रिस्तरीय रचनेचा' स्वीकार केला असुन महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार कामकाज पाहिले जाते.
(१)जिल्हा परिषद
(२)पंचायत समिती
(३)ग्राम पंचायती

*जिल्हा परिषद:-ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था असुन राज्यात सध्या मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता एकुण ३४ ZP अस्तित्वात आहेत.
*पंचायत समिती:-महाराष्ट्रात सध्या ३५१ पंचायत समिती अस्तित्वात आहेत.

*ग्रामपंचायत:-महाराष्ट्रात सध्या २८३३२ ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.(एकुण खेडी-४३६६५)

अशाप्रकारे जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला असुन आवडल्यास नक्की शेअर करा🙏♥️🔥..
#म #मराठी #रिम #महाराष्ट्र #Maharashtra #महानगरपालिका #नगरपालिका #मुंबई #नागपूर #विदर्भ #जिल्हा_परिषद #पंचायत #cantonment_board @Atarangi_Kp @MarathiDeadpool @ImLB17 @sub_naikade

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling