काल मी #राज्यपाल पद,त्याची निवड,कालावधी व विशेषाधिकार ह्याबाबत थ्रेड लिहिला होता..आज मी राज्यपाल ज्या ठिकाणी राहतात त्या '#राजभवन' ची थोडक्यात पण उपयुक्त माहिती द्यायचा प्रयत्न केलाय ज्यामध्ये तिथे कसे जायचे,काय काय पाहायला भेटेल इ..
आवडल्यास नक्की शेअर करा!! #म #मराठी #धागा
राजभवनाची सर्व विस्तृत माहिती तुम्हाला वेबसाईट वर मिळुनच जाईल(rajbhavan-maharashtra.gov.in) पण मी वाचकांमध्ये जिज्ञासा व उत्सुकता वाढवण्यासाठी थोडीफार माहिती देतोय🙏.मुंबई राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. मुंबई शहरातील ती एक अतिशय सुंदर वास्तू आहे.
राजभवन अंदाजे 50 एकर जमिनीवर वसलेले आहे व त्याच्या तीनही बाजूंना समुद्र आहे. मलबार हिल येथील राजभवन संकुल हे मैलभर लांब असलेली दाट वने, वाळुचे समुद्र किनारे आणि अनेक प्रकारच्या टवटवीत हिरवळीने व्यापले आहे.
तुम्हाला राजभवन पाहण्यासाठी जाता येऊ शकते.राजभवनातले काही प्रतिबंधीत ठिकाणं सोडले तर उरलेले ठिकाणं तुम्ही पाहु शकता पण त्यासाठी मी वर दिलेल्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला २५ रू. शुल्क भरून बुकिंग करावे लागते.एका दिवसात फक्त २० लोकांचीच बुकिंग होऊ शकते.🙏😄
बुकिंग केल्यावर तुम्हाला सकाळी ६ वाजता तिथे पोहचावे लागते कारण ६.१५ ते ८ हा वेळ सामान्य नागरिकांना राजभवन दाखवायला राखुन ठेवला आहे.आत गेल्यावर तुम्हाला परिसरात फिरवण्यासाठी एक Electric car आहे.
सुरूवातीला तुम्हाला ज्याठिकाणी शाही मेजवानी बसते त्या ठिकाणी घेऊन जातात.ब्रिटीशकालीन बांधकाम,प्रशस्त हाॅल,सर्व मान्यवरांना बसण्यासाठी शाही थाटातल्या खुर्च्या व ब्रिटीश कालावधीपासुन जेव्हढे गव्हर्नर होऊन गेले त्यासर्वांची माहिती असणारा एक फलक ह्यासर्वांबद्दल माहिती दिली जाते.
Royal Balcony व Sunrise Point:-
त्यानंतर तुम्हाला Royal Balcony दाखवली जाते जिथे राजभवनमधील कार्यक्रमाच्या वेळीस वेगवेगळे वाद्य वाजवले जातात.त्याला लागुनच Sunrise point आहे जिथे उभारून तुम्ही समोर पसरलेला अथांग समुद्र आणि उगवत्या सूर्याचे मनोवेधक दर्शन घेऊ शकता🔥♥️
Bunker:-
आ.विद्यासागर राव राज्यपाल असताना ऑगस्ट,२०१६ ला राजभवनाखाली १५० मीटर लांब व ५००० स्के.फु. पसरलेला बंकर सापडला ज्यामध्ये एकुण १८ खोल्या आहेत.गर्व्हनर वर जर जिवघेणा हल्ला झाला तर सुखरूप पळुन जाण्यासाठी तयार केलेला हा बंकर होता. #Temple
सागरमाता मंदिर व बोटॅनिकल गार्डन:-
बाजुलाच १३ व्या शतकात बांधलेले सागरमाता मंदिर असुन सुर्याची पहिली किरण त्याच्यावर पडल्यानंतर ते मंदिर खुप आकर्षक दिसते.पुढे गेल्यावर राजभवनामार्फत तयार केलेले बोटॅनिकल गार्डन असुन त्यामध्ये विविध वनस्पती व प्राणी आपणास पाहायला मिळतील. #Garden
आत्ताच अलिकडच्या काळात राजभवना जवळ २ महाकाय तोफ सापडल्या आहेत.काहींच्या म्हणण्यानुसार ब्रिटीश कालावधीपासुन ह्या तोफा तिथे आहेत तर काहींच्या म्हणण्यानुसार त्यापेक्षाही जुन्या आहेत.प्रत्येक तोफेच वजन हे जवळपास २२ टन च्या आसपास आहे.🙏 #म #रिम #मराठी
सकाळी ८ चा चहा:-
सर्व ठिकाणे पाहुन झाल्यावर तुम्हाला एक मार्गदर्शक ब्रिटीश कालावधीतल्या मुंबईची माहिती देतो व नंतर तुम्हाला चहा आणि बिस्किट दिले जाते.खासियत ही की,
ज्या कपात चहा आणि ज्या प्लेटमध्ये बिस्कीट दिले जाते त्यांच्यावर आपल्या देशाचे राजचिन्ह छापलेले असते.🔥 #म #मराठी
#म #मराठी #रिम #राज्यपाल #महाराष्ट्र #महाराष्ट्र_सरकार @MarathiDeadpool @Digvijay_004 @sub_naikade @ImLB17
@Gaju3112 @arvindgj @PriyadarshiniD3 @Bhilavadeamol @wankhedeprafull @Shiva__1 @NamdevAnjana @swapnp
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.