🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Sep 23, 2020, 11 tweets

आज टाईम्स मासिकाने भारताचे पंतप्रधान आ.नरेंद्र मोदी यांना जगातले १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले!!
पण स्थान देतानाच टाईम्सने थोडसं विश्लेषण ही नमुद केलयं ज्याकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे!!🧐🧐🤔🤔
#म #मराठी #रिम #times100 #Modi

टाईम्स म्हणतयं की,"लोकशाही म्हणजे फक्त निवडणूका घेणे अस नाही.गेली सत्तर वर्षे झालं जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश म्हणुन भारताकडे पाहिलं जात व भारताचा एक वेगळाच लौकिक आहे..१.३ अब्ज लोकसंख्येत ख्रिश्चन,मुसलमान,शीख,बौद्ध,जैन अशा अनेक धर्माचे-पंथाचे-समाजाचे नागरिक राहतात..#म

दलाई लामा सर्वधर्मसमभाव तसेच बंधुत्व व स्थिरतेसाठी भारताचं कौतुक करतात...
पण नरेंद्र मोदी यांनी या वातावरणाला वादग्रस्त केले आहे.भारतात आजही ८०% लोकसंख्या हिंदू आहे पण मोदींनी अस सरकार चालवल ज्याला कशाचीच पर्वा नाही.हिंदु राष्ट्रवादची कास धरलेल्या भारतीय जनता पक्षाने सहिष्णुतेला

रद्दबातल केल आहे.त्यांनी मुस्लिमांना लक्ष्य केल आहे व कोरोना संकट हे असंतोषाला दाबायचे साधन बनले आहे.जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणखी अंधारात गेली आहे.."
अशा शब्दात टाईम्सने मोदी व सरकारवर भाष्य केलं आहे!!
टाईम्सने गेल्यावर्षीच्या मासिकावर सार्वत्रिक निवडणुकावेळीस मोदींचा फोटो

छापला होता व त्यावरून ही मोठा वाद झाला होता.. त्यावेळी टाईम्सने मोदींचा फोटो छापताना 'India's divider in chief' अस लिहील होतं..त्यावेळी भाजपने आरोप केला होता की, पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा त्यावेळी म्हणाले होते

‌2014 मध्ये असंख्य विदेशी मासिकांनी मोदींवर टीका करणारे लेख छापले होते.
2015 मध्येही टाईम मासिकाच्या मे महिन्याच्या अंकात पंतप्रधान मोदींवर कव्हरस्टोरी केली होती. त्यावेळी त्याच शीर्षक होतं- why Modi matters..
ह्यासोबतच आयुष्यमान खुराणा,सुंदर पिचाई, रवींद्र गुप्ता व बिल्कीस बानो

यांनाही टाईम्सने सन्मानित केले आहे..

** #CAA विरोधात आवाज उठवणार्या दिल्लीतील शाहिनबाग परिसरात झालेल्या आंदोलनाचा ८२ वर्षाचा चेहरा 'बिल्कीस बानो' यांचा ही १०० जणांच्या यादीत समावेश करण्यात आलाय..यांना 'शाहिनबाग की दादी' अशी उपाधीही दिली गेली. @Digvijay_004 @MarathiDeadpool

‌टाईम मासिकाने त्यांच्याविषयी लिहिलं आहे की "बिल्कीस या भारतातील वंचितांचा चेहरा बनल्या. आंदोलन सुरू आहे त्याठिकाणी त्या सकाळी आठपासून रात्री 12 पर्यंत उपस्थित असत. त्यांच्याबरोबरीने हजारो महिलाही या आंदोलनात सहभागी होत. महिलांनी केलेल्या या आंदोलनाला विरोधाचं प्रतीक मानलं गेलं.

सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी नेता ज्यांना तुरुंगात टाकण्यात आलं त्यांच्यासाठी बिल्कीस बानो आशेचा किरण ठरल्या. लोकशाही जिवंत राखणं किती आवश्यक आहे याची जाणीव त्यांनी करून दिली.

"शाहीन बाग आंदोलनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एकदा म्हणाले होते की

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात आम्ही एक पाऊलही मागे हटणार नाही. त्यावर बिल्कीस बानो म्हणाल्या, गृहमंत्री म्हणतात की आम्ही एक इंचही मागे हटणार नाही तर मग मी सांगते आम्हीही एक पाऊल मागे हटणार नाही,"असं टाइम मॅगजिनने म्हटलं आहे.
सौजन्य:-बीबीसी मराठी @anil010374 @Political__SCI

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling