Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture
Sanatan Dharmiya🚩| Unapologetic Hindu🚩| यजुर्वेदीय ।।भारत का रहने वाला हूं भारत की बात सुनाता हूं।।

Jan 12, 2022, 16 tweets

#Thread
-: फलटणचे श्रीराम मंदिर :-
              एखाद्या गावी आपण पहिल्यांदा जावं आणि तिथे जाऊन आपल्याला खंत वाटावी की अरे..! आपण इथे यायला इतका उशीर का लावला..! तसच काहीसं मला फलटण गावी जाऊन वाटलं. तेथील शहररचना,
@ShefVaidya @authorAneesh @MulaMutha
#Temples #मंदिर #राम
१/

जुनी पण नावीन्यपूर्ण अशी बांधकामं आणि एकंदरीत वातावरण ह्या गोष्टींनी मला प्रचंड प्रभावित केले. त्यात अजून आनंद वाढवणारा 'दुग्धशर्करा योग' म्हणजे फलटणमधील अतिशय सुंदर अशी मंदिरे..! पुरातन असे जब्रेश्वर महादेवाचे मंदिर, गिरवीचे श्रीकृष्ण मंदिर आणि फलटणचे प्रसिद्ध राम मंदिर..!
२/

या सर्व मंदिरांना उत्तम स्थितीत पाहून मनाला अतिशय संतोष वाटला.

त्यात मला श्रीराम मंदिराची भावलेली भव्यता,सुंदरता आणि रमणीयता इथे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

फलटण गावात स्थित असणारे श्रीराम मंदिर हे श्रीमंत निंबाळकर यांच्या राजवाड्याच्या परिसरात आहे.
३/

राजवाड्याच्या भव्य दरवाज्यातून आपण आत गेलो की लगेच उजव्या बाजूला राम मंदिराचा भव्य लाकडी सभामंडप आहे.दृष्टी पडताच राम मंदिराची रचना अगदी मोहवून टाकते.

मंदिराच्या इतिहासाविषयी माहिती देणारे दोन शिलालेख राम मंदिराच्या परिसरात आहेत. एक सभामंडपात आहे,
४/

तर एक श्रींच्या गाभाऱ्याच्या जवळ आहे.
गाभाऱ्यात असणाऱ्या शिलालेखानुसार "शालिवाहन शके १६९६ जयनाम संवत्सरी फाल्गुन शुद्ध एकादशी सोमवारी अर्थात १७७४ साली उत्तम मुहूर्तावर श्रीराम,सीतामाई,श्रीलक्ष्मण यांची प्राणप्रतिष्ठा झाली.!" श्रीमती सगुणाबाई निंबाळकर देशमुख यांनी सभामंडपासहित
५/

ह्या देवालयाची निर्मिती करवली. तसेच सभामंडपातील शिलालेखानुसार "शालिवाहन शके १७९७ युवनाम संवत्सरी मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस अर्थात १८७५ साली जीर्ण सभामंडप काढून श्रीमंत मुधोजीराव जानोजीराव निंबाळकर यांनी नूतन मंडप विधियुक्त श्रीचरणी अर्पण केला..!"
६/

मंदिरास उत्तम असा बत्तीस खांबी लाकडी कोरीव सभामंडप आहे. लाकडावरील उत्तम कोरीवकाम तसेच अनेक झुंबर सभामंडपाची शोभा द्विगुणित करत आहेत. मंडपातून वर गाभाऱ्याच्या तिथे जाताच उत्तम अशी दगडात कोरलेले गर्भगृहाचे प्रवेशद्वार दिसते व
७/

त्यातून स्मेरमुखी भगवान रामचंद्र,भगवती जानकी,श्री लक्ष्मण आणि हनुमंतराय यांचे श्रीविग्रह दृष्टीस पडतात आणि मनुष्य देह भान हरपून केवळ आणि केवळ श्रींचा राजस सुकुमार पुतळा डोळ्यात साठवून घेतो आणि आपोआप दोन्ही हात जोडले जाऊन मनात देवास अनन्यभावे शरण जाण्याची भावना जागृत होते.
८/

मन इतके प्रेमभक्तिने ओतप्रोत होते की अखंड काळ केवळ श्रींचे रूप न्याहाळत बसावे असे वाटते.

नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम्।
पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् ॥
९/

अगदी या स्तुतीला अनुसरून असणारे श्रीरामांचे ते सावळे रूप डोळ्यांत भरले की कृतकृत्य झाल्याची अनुभूती येते. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूने बाहेर पडलं की मंदिराच्या मागे जायला रस्ता आहे.
मागे श्रीगणरायाचे,भगवान आशुतोष महादेवांचे,श्री रुक्मिणी पांडुरंगाचे व बलभीम हनुमंत यांची लहान
१०/

स्वरूपातील मंदिरं आहेत. तसेच मागे गेल्यावर मंदिराचा कळस दृष्टीस पडतो त्यातून मंदिराच्या भव्यतेची जाणीव होते.

प्रदक्षिणा पूर्ण करत उजव्या बाजूला आलं की औदुंबर वृक्ष आहे व त्याच्या छायेत भगवान दत्त महाराज उत्तम देवालयात विराजमान आहेत. दत्त महाराजांच्या समोर ही आखीवरेखीव लाकडी
११/

लाकडी सभामंडप आहे. तसेच राममंदिराप्रमाणे संपूर्ण दगडी बांधकाम या मंदिराचे आहे. मंडपातून एकमुखी दत्त महाराजांची "शम्" अर्थात कल्याण करणारी मूर्ती दृष्टीस पडते आणि क्षणभर सद्य अवस्थेचा विसर पडतो. महाराजांचे दर्शन घेऊन सभामंडपात काही काळ विसावा घेऊन मनुष्य तेथील भक्तियुक्त लहरींची

अनुभूती घेऊ शकतो. दत्त महाराजांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेविषयी माहिती देणारा शिलालेख आढळतो. त्यात लिहिले आहे की "शालिवाहन शके १८०३ श्रावण शुद्ध पंचमीस अर्थात १८८१ साली उत्तम मुहूर्तावर श्रीमंत मुधोजीराव जानोजीराव निंबाळकर यांनी श्रीदत्त महाराजांच्या चरणी हे देवालय अर्पण केले..!"

सभामंडपाच्या समोर दोन दीपमाळा आहेत. तसेच परिसरात लक्ष्मीनारायण व राधाकृष्ण यांची देखील लहान मंदिरे आहेत. असा एकंदरीत श्रीराम मंदीर परिसर मनुष्यास आपल्या दुःखाचा व त्रासाचा विसर पाडून आनंदाची अनुभूती देतो.

यात श्रीमंत निंबाळकर घराण्याचे कोटी कोटी धन्यवाद की त्यांच्या पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या श्रीराम भक्तीमुळे व अविरत अशा रामसेवेमुळे हा परिसर तसेच जब्रेश्वराचे मंदिर अत्यंत सुस्थितीत आहे. अगदी सद्य निंबाळकर घरण्याचे वंशज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अविरत प्रभूंच्या सेवेत आहेत. त्यामुळेच हा संपुर्ण परिसर भाविकांना व पर्यटकांना अगदी मोहवून टाकतो व खिळवून ठेवतो.
तेंव्हा प्रत्येकाने अवश्य फलटणला भेट देऊन या मंदिराच्या दिव्यतेचा व भव्यतेचा अनुभव घ्यावा..!

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling