#Thread
-: फलटणचे श्रीराम मंदिर :-
              एखाद्या गावी आपण पहिल्यांदा जावं आणि तिथे जाऊन आपल्याला खंत वाटावी की अरे..! आपण इथे यायला इतका उशीर का लावला..! तसच काहीसं मला फलटण गावी जाऊन वाटलं. तेथील शहररचना,
@ShefVaidya @authorAneesh @MulaMutha
#Temples #मंदिर #राम
१/
जुनी पण नावीन्यपूर्ण अशी बांधकामं आणि एकंदरीत वातावरण ह्या गोष्टींनी मला प्रचंड प्रभावित केले. त्यात अजून आनंद वाढवणारा 'दुग्धशर्करा योग' म्हणजे फलटणमधील अतिशय सुंदर अशी मंदिरे..! पुरातन असे जब्रेश्वर महादेवाचे मंदिर, गिरवीचे श्रीकृष्ण मंदिर आणि फलटणचे प्रसिद्ध राम मंदिर..!
२/
या सर्व मंदिरांना उत्तम स्थितीत पाहून मनाला अतिशय संतोष वाटला.

त्यात मला श्रीराम मंदिराची भावलेली भव्यता,सुंदरता आणि रमणीयता इथे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

फलटण गावात स्थित असणारे श्रीराम मंदिर हे श्रीमंत निंबाळकर यांच्या राजवाड्याच्या परिसरात आहे.
३/
राजवाड्याच्या भव्य दरवाज्यातून आपण आत गेलो की लगेच उजव्या बाजूला राम मंदिराचा भव्य लाकडी सभामंडप आहे.दृष्टी पडताच राम मंदिराची रचना अगदी मोहवून टाकते.

मंदिराच्या इतिहासाविषयी माहिती देणारे दोन शिलालेख राम मंदिराच्या परिसरात आहेत. एक सभामंडपात आहे,
४/
तर एक श्रींच्या गाभाऱ्याच्या जवळ आहे.
गाभाऱ्यात असणाऱ्या शिलालेखानुसार "शालिवाहन शके १६९६ जयनाम संवत्सरी फाल्गुन शुद्ध एकादशी सोमवारी अर्थात १७७४ साली उत्तम मुहूर्तावर श्रीराम,सीतामाई,श्रीलक्ष्मण यांची प्राणप्रतिष्ठा झाली.!" श्रीमती सगुणाबाई निंबाळकर देशमुख यांनी सभामंडपासहित
५/
ह्या देवालयाची निर्मिती करवली. तसेच सभामंडपातील शिलालेखानुसार "शालिवाहन शके १७९७ युवनाम संवत्सरी मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस अर्थात १८७५ साली जीर्ण सभामंडप काढून श्रीमंत मुधोजीराव जानोजीराव निंबाळकर यांनी नूतन मंडप विधियुक्त श्रीचरणी अर्पण केला..!"
६/
मंदिरास उत्तम असा बत्तीस खांबी लाकडी कोरीव सभामंडप आहे. लाकडावरील उत्तम कोरीवकाम तसेच अनेक झुंबर सभामंडपाची शोभा द्विगुणित करत आहेत. मंडपातून वर गाभाऱ्याच्या तिथे जाताच उत्तम अशी दगडात कोरलेले गर्भगृहाचे प्रवेशद्वार दिसते व
७/
त्यातून स्मेरमुखी भगवान रामचंद्र,भगवती जानकी,श्री लक्ष्मण आणि हनुमंतराय यांचे श्रीविग्रह दृष्टीस पडतात आणि मनुष्य देह भान हरपून केवळ आणि केवळ श्रींचा राजस सुकुमार पुतळा डोळ्यात साठवून घेतो आणि आपोआप दोन्ही हात जोडले जाऊन मनात देवास अनन्यभावे शरण जाण्याची भावना जागृत होते.
८/
मन इतके प्रेमभक्तिने ओतप्रोत होते की अखंड काळ केवळ श्रींचे रूप न्याहाळत बसावे असे वाटते.

नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम्।
पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् ॥
९/
अगदी या स्तुतीला अनुसरून असणारे श्रीरामांचे ते सावळे रूप डोळ्यांत भरले की कृतकृत्य झाल्याची अनुभूती येते. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूने बाहेर पडलं की मंदिराच्या मागे जायला रस्ता आहे.
मागे श्रीगणरायाचे,भगवान आशुतोष महादेवांचे,श्री रुक्मिणी पांडुरंगाचे व बलभीम हनुमंत यांची लहान
१०/
स्वरूपातील मंदिरं आहेत. तसेच मागे गेल्यावर मंदिराचा कळस दृष्टीस पडतो त्यातून मंदिराच्या भव्यतेची जाणीव होते.

प्रदक्षिणा पूर्ण करत उजव्या बाजूला आलं की औदुंबर वृक्ष आहे व त्याच्या छायेत भगवान दत्त महाराज उत्तम देवालयात विराजमान आहेत. दत्त महाराजांच्या समोर ही आखीवरेखीव लाकडी
११/
लाकडी सभामंडप आहे. तसेच राममंदिराप्रमाणे संपूर्ण दगडी बांधकाम या मंदिराचे आहे. मंडपातून एकमुखी दत्त महाराजांची "शम्" अर्थात कल्याण करणारी मूर्ती दृष्टीस पडते आणि क्षणभर सद्य अवस्थेचा विसर पडतो. महाराजांचे दर्शन घेऊन सभामंडपात काही काळ विसावा घेऊन मनुष्य तेथील भक्तियुक्त लहरींची
अनुभूती घेऊ शकतो. दत्त महाराजांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेविषयी माहिती देणारा शिलालेख आढळतो. त्यात लिहिले आहे की "शालिवाहन शके १८०३ श्रावण शुद्ध पंचमीस अर्थात १८८१ साली उत्तम मुहूर्तावर श्रीमंत मुधोजीराव जानोजीराव निंबाळकर यांनी श्रीदत्त महाराजांच्या चरणी हे देवालय अर्पण केले..!"
सभामंडपाच्या समोर दोन दीपमाळा आहेत. तसेच परिसरात लक्ष्मीनारायण व राधाकृष्ण यांची देखील लहान मंदिरे आहेत. असा एकंदरीत श्रीराम मंदीर परिसर मनुष्यास आपल्या दुःखाचा व त्रासाचा विसर पाडून आनंदाची अनुभूती देतो.
यात श्रीमंत निंबाळकर घराण्याचे कोटी कोटी धन्यवाद की त्यांच्या पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या श्रीराम भक्तीमुळे व अविरत अशा रामसेवेमुळे हा परिसर तसेच जब्रेश्वराचे मंदिर अत्यंत सुस्थितीत आहे. अगदी सद्य निंबाळकर घरण्याचे वंशज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अविरत प्रभूंच्या सेवेत आहेत. त्यामुळेच हा संपुर्ण परिसर भाविकांना व पर्यटकांना अगदी मोहवून टाकतो व खिळवून ठेवतो.
तेंव्हा प्रत्येकाने अवश्य फलटणला भेट देऊन या मंदिराच्या दिव्यतेचा व भव्यतेचा अनुभव घ्यावा..!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा।

Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishwambharMule

Jul 13, 2022
-:नास्ति तत्त्वं गुरोः परम्:-
(गुरू आणि सद्गुरू)
#Thread
#गुरूपौर्णिमा #GuruShishyaParampara
#GuruPurnima2022
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस संपूर्ण भारतवर्षात 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो.
१/२५
@ShefVaidya @Drsunandambal
जन्माला आल्यापासून ते मृत्यूपावेतो प्रत्येक क्षणी केवळ आणि केवळ गुरुंच्या मार्गदर्शनाने ह्या अपार संसारसागरात मनुष्य वावरु शकतो, म्हणून प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
२/२५
'गुरू' शब्दाच्या व्याख्येचा विचार करायचा झाला तर, शास्त्रकार सांगतात,
गुरु - गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।
अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते।।
अर्थात 'गु' कार म्हणजे अज्ञानरुपी अंधकार व 'रु' कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज.
३/२५
Read 25 tweets
Sep 27, 2021
#Thread
#ज्ञानेश्वरी_जयंती
-:अद्वैतामृतवर्षिणी भगवती ज्ञानेश्वरी जयंती :-
आज मराठी भाषेतील सर्वच पैलूने श्रेष्ठ ठरणारा ग्रंथ कुठला असा जर प्रश्न विचारला गेला तर याचे सर्वानुमते केवळ एकच उत्तर आहे तो ग्रंथ म्हणजे 'भगवती ज्ञानेश्वरी'.
१/
@Kal_Chiron @ShefVaidya @swamiyogeshji Image
कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मज्ञानाचा सागर,भक्तीचा रसकल्लोळ तर मराठी साहित्याचा अद्वितीय आविष्कार आहे.
केवळ संस्कृत भाषेच्या जाणकार लोकांमध्ये सीमित झालेले ब्रह्मज्ञानाचे भांडार ज्ञानेशांनी अगदी सामान्य लोकांना ज्ञानेश्वरीद्वारे खुले करून दिले व त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज
२/ Image
साधकांची 'माऊली' झाली..! आणि त्यानंतर मग जो अमृताचा वर्षाव सगळ्या महाराष्ट्र भूमीवर झाला की अगदी आजपर्यंत साधक लोक त्यात अखंड न्हाहून आपल्या जीवनाची इतिकृत्यता करून घेत आहेत.
योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी गलितगात्र झालेल्या अर्जुनाच्या निमित्ताने भगवद्गीतेचा साक्षात्कार अखिल
३/
Read 17 tweets
Aug 8, 2021
#दीपअमावस्या
दीपसूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेजमुत्तमम्‌।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव।।
आज आषाढ वद्य अमावस्या. आजच्या अमावस्येला 'दीप अमावस्या' देखील म्हणतात. आपल्या सनातन धर्मात आपल्याला आपल्या कार्यात आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी
१/
काही ना काही व्यवस्था केलेली आहे. जसं की सूर्य आपल्याला पाणी प्रदान करतो म्हणून आपण दररोज जल 'अर्घ्य' देऊन त्याविषयी कृतज्ञता दाखवतो. त्याचप्रमाणे दीप हा आपल्याला प्रकाश प्रदान करतो, प्रत्येक जीवास 'तिमिरातून तेजाकडे' जाण्याची प्रेरणा देतो म्हणून ह्या विषयी कृतज्ञता व्यक्त
२/
व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस आहे.
आजच्या दिवशी घरातील सर्व समई नीरांजन वैगरे गोष्टी धुवून स्वच्छ केल्या जातात व नंतर त्याची पूजा केली जाते. आजच्याचं दिवशी समई निरांजन स्वच्छ करण्याचं व पूजा करण्याचं कारण हेच की उद्यापासून श्रावण महिना चालू होणार व
३/
Read 5 tweets
Jul 23, 2021
#Thread
#गुरुपौर्णिमा
श्रीगुरु आणि सद्गुरु :-
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस भारतवर्षात 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जीवाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्व आहे. आज भारतातील दिव्य ज्ञानामृत केवळ आणि केवळ 'गुरू - शिष्य' परंपरारुपी
१/
#GuruPurnima2021
@ShefVaidya
गंगेतूनचं प्रवाहित होत होत आपल्यापर्यंत आले आहे.
भारतवर्षातील अनेक थोर ऋषीमुनींनी व संत मंडळींनी आपल्या दिव्यवाणीद्वारे गुरुमहिमा सांगितला आहे. त्यापुढे माझा हा लेख म्हणजे सूर्यप्रकाशासमोर एखाद्या पणतीच्या प्रकाशासारखे आहे. पण ह्या थोरामोठ्यांकडून जे
२/
काही मतीस कळाले ते मांडण्याचा प्रपंच इथे करत आहे.
आता महत्वाचा प्रश्न म्हणजे की 'गुरु' या शब्दाची व्याख्या काय? तर शास्त्रकारांनी गुरु ह्या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की,
गुरु -
गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ।।
३/
Read 16 tweets
Jul 11, 2021
#कालिदासदिन
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
आज "आषाढस्य प्रथम दिवसे" अर्थात आषाढाचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन..!
महाकवी कालिदासांनी आपल्या दिव्य काव्यप्रतिभेच्या जोरावर अनेक रचना करून संस्कृत
१/
@Kal_Chiron @ShefVaidya
भाषेला अधिकच सुंदर केले आणि समस्त रसिक लोकांना उपकृत केले.
"उपमा कलिदासस्य" ही उक्ती नेहमी सांगितली जाते ज्याचा अर्थ उपमा असावी तर कालिदासासारखी..!
आपण जर कालिदासाच्या काही रचनांवर ओझरती नजर जरी फिरवली तरी आपल्याला त्याचा प्रत्यय येईल..!
रघुवंशात कालिदास म्हणतात,
२/
क्व सूर्यप्रभवो वंशः क्व चाल्पविषयामतिः ।
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनाऽस्मि सागरम् ॥
अर्थात - कुठे तो सूर्यापासून उत्पन्न झालेला वंश आणि कुठे मी (कालिदास) त्यांचं गुणगान करण्याचा प्रयत्न करणारा अत्यंत अल्पमति. हे म्हणजे एखाद्या लहानशा नावेने मोठा सागर पार करण्याचे दिव्य
३/
Read 8 tweets
Jul 10, 2021
ही ऐतिहासिक स्थळे आपली उर्जाकेंद्रे आहेत..!
यातून ऊर्जा घेऊन आपण आपल्या कार्यात कार्यरत होऊन आपल्या राष्ट्राला एका नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो..!
ही स्थळे म्हणजे आपल्या दिव्य इतिहासाची व आपल्या थोर पुरुषांची साक्ष देतात. तेंव्हा ही स्थळे
१/
@Vinay1011 @malhar_pandey @HearMeRoar21
सुस्थित राहणे ही एका सशक्त राष्ट्राची गरज आहे.
पण खंत आज अशी आहे की आपल्या देशात आपल्या थोर राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना कायम उपेक्षित ठेवून शासनाने केवळ आक्रमकांचा उदो उदो केला आणि ही सर्व दिव्य स्थळे दुर्दशेत गेली.
आता परिस्थिती बदलत आहे हे पाहून हायासे वाटते.
पण सगळा भार
२/
शासनावर का सोडायचा??
आपण पण प्रत्येक नागरिक या राष्ट्राचे आणि या थोर पुरुषांचे काही देण लागतो, तेंव्हा हाच विचार करून @Jhunj_Org ने श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या समाधीचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.
हे काम अत्यंत भव्य आहे कोणा एका व्यक्तीकडून हे पूर्ण होणारे नाही.
३/
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(