Ajay Profile picture
उद्देश - मराठी घरात गुंतवणूक रुजावी ह्यासाठी प्रयत्न करणे..🔥 स्वप्न - मराठी माणूस म्हणजे 'गुंतवणूकदार' अशी ओळख जगभर झालेली बघणे..✌️🔥

May 12, 2022, 24 tweets

लंकादहन..🔥

श्रीलंका..!

१९४८ मध्ये ~ भारतासोबतच स्वतंत्र झालेला हा देश..अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला.. पांढऱ्या शुभ्र वाळूने नटलेल्या समुद्र किनाऱ्यांची खाण असलेला हा आपला शेजारी आज आगीत धुमसतोय..!!

असे काय झाले की श्रीलंकेवर ही अशी वेळ आली ?

ही आहे त्याची गोष्ट.. #म

श्रीलंका..१९४८ला सिलोन/Ceylon नावाने स्वतंत्र झाला..~७५% सिंहीली बौद्ध,~१२% तमिळ आणि बाकी तमिळ भाषिक मुस्लिम,ख्रिश्चन अशा लोकांचा हा देश होता.

पण नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात जेव्हा आशावाद,देशप्रेम यांना खतपाणी घालायचे असते तेव्हा श्रीलंकेच्या नेत्यांनी द्वेषाला मोठे केले..!

सुरुवात झाली ती ' फक्त ' सिंहीली राष्ट्रभाषा आणि कामकाजाची भाषा जाहीर करण्यापासून..

आणि नंतर राष्ट्रवादाच्या नावाखाली निवडणुकांच्या वेळी दंगली करून तमिळ भाषिकांची अनेकदा कत्तल झाली..!

हे सर्व सहन न झाल्याने तमिळ भाषिक प्रदेशाने 'एलटीटीई' स्थापन करून स्वातंत्र्य जाहीर केले..!

आणि मग सुरू झाले ते युद्ध..(१९८३)
खूप मोठे..
खूप काळ चालणारे..

~ २६ वर्ष चालणारे आणि १ लाखाहून जास्त लोकांच्या प्राणहानीला कारण असलेले ( incl ८११८ भारतीय सैनिक !!) युद्ध..!

तसे पाहिले तर..हिंदी महासागरात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेला..अनेक जहाजांच्या व्यापारी मार्गावर असणाऱ्या

श्रीलंकेचे नशीब हे खरे तर सिंगापूरच्या वळणावर जायचे होते..पण श्रीलंकेने त्यांच्याकडे असलेली महत्त्वाची वर्षे ह्या द्वेषात वाया घातली..म्हणून २००९ ला हे युद्ध संपेतो , १९६५ ला स्वतंत्र झालेले सिंगापूर एक प्रगत राष्ट्र बनले होते..!

बरं..ह्या सर्व वर्षात श्रीलंकेने काहीच प्रगती

केली नाही असे नाही..मुळातच देशाच्या सर्व राजकीय पार्टी साम्यवादाकडे (कमुनिस्ट) झुकानाऱ्या असल्याने श्रीलंका

ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स,
हॅपिनेस इंडेक्स,
हंगर इंडेक्स,
फ्रीडम आणि डेमोक्रासी इंडेक्स इ मध्ये

भारताच्याही पुढे गेला होता..पण जिथे चीनलाही गरिबीतून वर येण्यासाठी

भांडवलशाही (Capitalism) आणि साम्यवादाचा समतोल साधावा लागला तिथे श्रीलंकेला दुसरा पर्याय नव्हता..!

युद्ध संपल्यानंतर लगेचच श्रीलंकेच्या पश्चिम किनाऱ्यावर व्यापाराला चालना देण्यासाठी सिंगापूर ,दुबई , सेऊल इ च्या धर्ती वर megapolis सारख्या खर्चिक प्रोजेक्टचा घाट घातला गेला..!

ह्या प्रोजेक्ट्समुळे अर्थव्यवस्थेत पैसा खेळू लागला..आणि त्यांची बाजारपेठ/GDP वाढायला लागली.. काळ २००९-१२.

पण अर्थशास्त्रात रस्ते, पूल, रेल्वे ,इमारती इ गोष्टी non tradable sector मध्ये येतात..म्हणजे..ह्या गोष्टी झाल्यानंतर तुमच्या देशात उद्योग आले/वाढले तर ह्या गोष्टींचा फायदा..

नाहीतर फक्त तुमच्या देशात चांगले रस्ते आहेत आणि २४ तास वीज,पाणी आहे म्हणून कोण तुम्हाला फुकट क्रूड ऑईल देत नाही..!!

थोडक्यात काय तर श्रीलंकेने अशा प्रोजेक्टवर खूप खर्च केला..कर्ज घेऊन खर्च केला..पण भारताचे कोचीन बंदर आणि सिंगापूर हे इतके पुढे गेले होते की श्रीलंकेतील उद्योग

म्हणावे तसे वर आले नाहीत..आणि म्हणून त्या देशाच्या परकीय उत्पन्नाचा खूप मोठा भाग हा पर्यटन,कृषी उत्पादन,कापड गिरण्या इ ह्यावरच अवलंबून राहिला.

डोक्यावरचे मोठे कर्ज घेऊन श्रीलंका अडचणीत सापडला असताना..त्यांना मदतीचा हात दिला तो चीनने..! पुढील दशकात (२००९-२०१९) चीनने दिलेले कर्ज

एकूण कर्जाच्या <१% वरून > १०% पेक्षा जास्त गेले होते..! ह्यातच त्यांना कर्जाची परतफेड म्हणून त्यांचे हंबनतोटा बंदर त्यांना चीनला ९९ वर्षासाठी मनमर्जी (सैन्यदल)वापरायला द्यायची मानहानी पत्करावी लागली.

तोपर्यंत २०१९ साल उजाडले होते..कर्ज आणि उत्पन्न , निर्यात आणि आयात ह्या दोन्ही

गोष्टींचा मेळ लागत नव्हता(Twin Deficit)..म्हणून वाढ खुंटली..महागाई वाढली..जन त्रासले..तेव्हा

एक नेता पुढे आला..त्याच्याकडे ह्या महागाईवर रामबाण (?) उपाय होता-

तो म्हणजे

वस्तूंवर कर कमी करणे म्हणजे त्या स्वस्त होतील व लोकांवरील(इन्कम टॅक्स) कर कमी करणे म्हणजे पैसे जास्त उरतील!

लोकांना आवडतील अशी अनेक वचने देऊन हा नेता - महिंदा राजपक्सा पंतप्रधान झाला..!

आणि त्याने खरोखरीच कर कमी केला..!

आपला GST म्हणजे त्यांचा VAT १५-२०% वरून ८% वर आणला..!

३० लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना करमुक्त केले..त्यावरील उत्पन्न असलेल्या लोकांना फक्त १५% कर ह्या आणि अशा

करमुक्तीच्या घोषणा अमलात आणल्या..!!

गल्लीपासून दिल्लीपर्यंत आनंदी आनंद जाहला..अशी परिस्थिती झाली..!

पण हा आनंद काहीच वेळ टिकला..कारण ह्या गोष्टींमुळे महागाई कमी होण्याऐवजी वाढली..पण निर्यात काही वाढली नाही..लोक मोठमोठ्या महागड्या गाड्या ,वस्तू आयात करू लागले..आधीच असलेले

परकीय चलनातील कर्ज..जे १ डॉलर ला १८० श्रीलंकन रुपये असे प्रमाण असतानाही भरणे अवघड जात होते..ते आता आयात वाढून श्रीलंकन रुपया अजून पडल्याने १ डॉलरला >२००-२५०₹ झाल्याने भरणे अती अवघड झाले..!

श्रीलंकन सरकार सैरभैर झाले..घाईघाईने चैनीच्या गोष्टींची आयात थांबवली गेली..आणि

अशात २ गोष्टी झाल्या -

१.श्रीलंकेत काही चर्च आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाले.(२०१९)

ह्याने देशात येणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलन पुरवणाऱ्या पर्यटन क्षेत्राला फार मोठा फटका बसला..आणि ही घटना विस्मृतीत जात असतानाच

२.२०२० ला कोरोनाचे थैमान सुरू झाले..त्याने

पर्यटन हे पूर्ण बंद हे झालेच पण बाहेरील देशात काम करणाऱ्या श्रीलंकन नागरिक जो पैसा देशात पाठवीत होते त्याचा ओघही पार आटला..!

कोरोनाने पर्यटन,कापड गिरण्या इ बंद पडले होते..चालू होती ती फक्त शेती आणि कर्ज..!

व पुढे झाले ते अगदी..विनाश काले विपरीत बुद्धी ह्या म्हणीला साजेसे होते..

जिथे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था शेती उत्पन्नाने तारल्या..

तिथे श्रीलंकन सरकारने रासायनिक खते ही प्रामुख्याने आयात करावी लागत असल्याने त्यांची आयात पूर्ण बंद केली..!

ह्याने झाले काय तर चहा ,रबर ,तांदूळ इ शेती उत्पादने निर्यात करणाऱ्या श्रीलंकेचे उत्पादन ~ ५०% पर्यंत घसरले..!!

तोपर्यंत श्रीलंका एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज ह्या दुष्टचक्रात सापडला होता..ह्यातून भारत,जपान इ देशांच्या मदतीने सावरत होताच तो..रशिया - युक्रेन युद्ध सुरू झाले.

भारतासारखीच श्रीलंकेची प्रमुख आयात ही क्रूड ऑईल च्या स्वरुपातच आहे..आणि त्याचेच भाव भडकले..!

हा शेवटचा आघात -

आधीच अती दुबळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेला सहन करता येण्यासारखा नव्हता..आणि कर्जाच्या बोज्याखाली श्रीलंकन अर्थव्यवस्था कोलमडली..!

महागाई १८ टक्के हून जास्त झाली..देशावरचे कर्ज देशाच्या उत्पन्नापेक्षा जास्त झाले.. इतकचं काय तर परीक्षा घ्यायची तर पेपर ,उत्तरपत्रिका साठी

लागणारा कागदही परवडत नाही म्हणून परीक्षा रद्द केल्या गेल्या.. गोडे तेल ,दूध पावडर अशा गोष्टींची किंमत हजार रुपयावर गेली..!!🤯

आणि ह्या सर्व प्रकारात सरकार ढिम्मच राहिले..स्वतःच्या चुका मान्य केल्या नाहीत..उलट राजेशाही थाटात वागत राहिले..!

अशा वेळेस जनतेचा प्रक्षोभ झाला नसता

तर नवलच..!

प्रचंड जाळपोळ झाली..खुद्द पंतप्रधानाचे घर जाळले..त्याला वाचविण्यासाठी सैन्याला हेलिकॉप्टरने गुप्त जागी घेऊन जावे लागले..ह्यात एका खासदाराचा मृत्यूही झाला..राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते लोकांनी चौका चौकात हाणले..!

आता..
आताही..परिस्थिती तीच आहे..
कर्जही आहेच..
पण आता..

महागाईच्या..मानहानीच्या आगीत होरपळलेले नागरिक आहेत..

सोबत जाळपोळीची राखही आहे..

ह्या गोष्टीतून धडा घेऊन...

जुन्या धार्मिक द्वेषाला दूर सारून...

ह्या ह्या शून्यातून..

सोन्याची लंका उभी राहते का ? ?

हेच काय ते बघणे आता बाकी राहीले आहे..!

२३/२३

टीप - वरील #SriLankaEconomicCrisis च्या #मराठी #thread मध्ये राजकारणाचा विषय मुद्दाम टाळला आहे..

कारण लोकशाहीत..

जसा राजा तशी प्रजा

असे नसून

जशी प्रजा तसा राजा हेच खरे असते..🙏

@DrVidyaDeshmukh
@Omkara_Mali
@MJ__Speaks
@trumptatya64

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling