कार्तिक | Kartik Profile picture
Entrepreneur by Profession | Freelance Content Creator | सामान्य म्हणून जन्मलेला, पण असामान्य ध्येय बाळगणारा, नावाचं BRAND करु इच्छिणारा एक मराठी मुलगा. 💝

Oct 23, 2022, 8 tweets

व्हेनेझुएला न होवो 🤐 #Thread

हा फोटो आहे १ मे २००११चा. काहींना याची पार्श्वभूमी माहीत असेल काहीं नसेल. यात देशाचे अध्यक्ष असा क्षण बघताहेत जो जगाच्या दृष्टीने महत्वाचा आहे... पुढे याविषयी येईल.

#म #मराठी #धागा

'कुठेही जायचं असेल तर फोटोग्राफर हवाच', हा आपल्या पंतप्रधानांचा अट्टाहास आता देशाच्या समोर आहे. म्हणजे भक्तांच्या टोळीने कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी पंतप्रधान फोटोग्राफीसाठी आतुर असतात हे काही ते नाकारू शकणार नाहीत.

२/७

मोठाल्या सभेपासून ते थेट मंदिराच्या भेटीपर्यंत फोटोग्राफरचा लवाजमा बाळगणारे आपले पंतप्रधान हे कोणत्याही स्थळी उठून दिसतील अशी सारी व्यवस्था असते. या व्यवस्थेच्या आड कोणी येणार असेल तर त्यास सर्रास बाजूला सारले जाते. पण मला प्रश्न पडतो तो म्हणजे, हे का? कशासाठी?

३/७

प्रत्येक ठिकाणी ढिगाने फोटोग्राफर बाळगून मळलेली प्रतिमा स्वच्छ करता येईल का? त्याऐवजी काही न बोलता, अगदी शांतपणे केलेलं कार्य केव्हाही चांगलं. त्याचे कौतुक हे काळाच्या ओघात वाहून जात नाही.

४/७

तर सदर फोटो आहे १ मे २०११ रोजी काढलेला. गडगडणाऱ्या देशाच्या अर्थव्यस्थेला स्थिरता देत मग मतदारांना दिलेले शब्द पाळणाऱ्या तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांचा. याच दिवशी ९/११ चा सूत्रधार असणाऱ्या ओसामाचा अंत अमेरीकेच्या सीलने केला. तो क्षण ही सारी मंडळी अनुभवत आहेत.

५/७

या क्षणाचे महत्व किती असेल हे मी वेगळं सांगायला नको. पाकिस्तानी भूमीत शिरून अगदी शिताफीने ओसामाला ठार करणे हे सहज शक्य आहे का? असो, या क्षणाचा इव्हेंट करावा असं तत्कालीन अध्यक्ष ओबामांना वाटलं नाही. कारण त्यांची अर्थ धोरणे म्हणजे आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर अवलंबून नव्हती.

६/७

आज जग सोडले आणि राष्ट्रीय यात्रांचा सपाटा मोदींनी लावला आहे. पण यातून देश सावरेल का? देशासमोर असणारे प्रश्न गंभीर आहेत हे सर्वसामान्य जनतेला कळणे सहज शक्य नाही. पण जेव्हा कळतील तेव्हा आपला 'व्हेनेझुएला' होईल हे निश्चित!

#कार्तिकायन
७/७

२०११*

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling