Rohit Bapat (हृद्रोग) 🇮🇳 Profile picture
ॐ Poet, Writer, Director. #शब्दयात्री Own @ShabdyatriBlog वसिष्ठ कुलोत्पन्न ब्राह्मण. Views strictly personal. https://t.co/JFfdYu0d3I

Mar 18, 2023, 14 tweets

लालपरी! 🤩 🚌

आयुष्यात पहिल्यांदा ड्रायव्हर काकांच्या शेजारच्या खुर्चीत बसून प्रवास 🤗 तो ही तिकिटाचे पूर्ण पैसे भरून!

पुरुष असूनही माझ्या आरक्षित जागेवरून मला उठवलं नाही, या सवलतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो 🙏 माझी तरी दुवा नक्की मिळेल!

असो, प्रवास सुरू 🛣️

#प्रवास #लालपरी #म

पायाशी असणाऱ्या या बोळकांड्यातून हवा येत राहाते.. पण खिडक्या असूनही ते तिथे का आहे? हा प्रश्न गेला अर्धा तास मेंदू कुरतडत आहे 🙄😄

#प्रश्न #निरीक्षण #असे_का ?

घाटातला प्रवास आणि वय यांचा काहीही संबंध नाही! अशा प्रवासात आम्ही अजूनही लहान मुलासारखे इकडे तिकडे बघत बसतो 😁🤗

#प्रवास #लहानपण #मराठी

लालपरी कडून देखील टोल घेतात हे पत्थरदील, संगदिल लोक!?

अरे हिला तरी सोडा!! बिचारी आधीच कर्ज आणि गरिबीने ग्रासलेली आहे. आवक आधीच कमी, त्यातही बिचारी काही लोकांना आधार देते आणि त्यात तुम्ही तिला असे त्रास देणार..! शोभतं का? 😵

#कृतज्ञता

आता दिवसभर काहीही होवो.. मला Vitamin D कमी पडणार नाही याची जबाबदारी स्वयं सूर्य नारायणाने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे! असा काही अँगल घेतलाय की बासच. माझ्यावर पूर्ण लक्ष आहे त्याचं 🤓✌️

ॐ भास्कराय नमः 🙏

#प्रवास #सहज #टाईमपास

मानवी स्वभाव काही प्रमाणात विनोदी देखील आहे. आपल्याला प्रवास करायचा नसला तरीही समोरून येणाऱ्या प्रत्येक ST वरचे "कुठून कुठपर्यंत वाल्या पाट्या" अगदी via वाल्या यादी सकट, सगळ्यांना एकदा तरी वाचायचा मोह होतोच! 😄🤗

#प्रवास #RandomThoughts #निरीक्षण

घाट सुरू होणार हे सुचविणारा नाश्ता करायचा थांबा आलेला आहे. सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी, महाबळेश्वर, इत्यादी अनेक दक्षिणाभिमुख लालपऱ्या थांबलेल्या आहेत. पण यांच्या गर्दीतही सांगली - मिरज ची लालपरी उठून दिसत आहे. निदान आत्तापर्यंत तरी हेच दिसत आहे. 🤪🙃😂

#प्रवास #लालपरी #सौंदर्य

घाटात डावीकडून ट्रक चालवणाऱ्या चालकांचा खरचं सत्कार केला गेला पाहिजे! नाहीतर जवळजवळ सगळेच ट्रकवाले, घाटातील तिन्ही lanes सरकारने सवलत म्हणून आंदण दिल्यासारखे, किंवा वडिलोपार्जित संपत्ती असल्यासारखे स्वच्छंद आणि कूर्मगतीने गाड्या चालवतात 😠

#प्रवास #घाटातील_गोष्टी #निरीक्षण #म

घाट वगैरे पार करून आता, शेत - शिवारे आणि random पवनचक्क्या यांच्यात प्रदेशात ही लालपरी आलेली आहे. मैला मैलावर भाषा आणि स्वभाव बदलणाऱ्या दुनियेत ही लालपरी किती लीलया वावरते? कमाल आहे! असं जमलं पाहिजे. सगळ्यात मिसळून देखील स्वतःचे अस्तित्व टिकवणे एक कला आहे!

#प्रवास #लालपरी #विचार

किती छळाल रे बिचारीला.. 🙄😵

जरा म्हणून दया येत नाही कुणाला!

#लालपरी #बिचारी #हे_प्रभू

#सातारा वगैरे भाग जवळ आला की महामार्गावर भारीतल्या गाड्या दिसतात. मला इतक्या भारी भारी गाड्या असूनही अत्यंत कमी वेगात, दबकत दबकत आणि डाव्या बाजूने नेणाऱ्या मंडळींबद्दल अत्यंत आदर व असूया आहे. इतका मनोनिग्रह, संयम आणि शालीनता आजकाल दिसत नाही कुठे!

#कभी_गुरुर_नहीं_किया #प्रवास #म

एकाएकी गाडी पश्चिमेला वळली आणि अचानक जाणीव झाली.. "आता अर्बन - सबअर्बन प्रदेश संपला आणि गावाची वाट सुरू झालेली आहे"

अर्थातच अजुन सह्याद्रीपासून दूर आहोत. पण, सूतोवाच नक्की झाले! दुतर्फा हिरवी झाडे बघायला मिळणे एक सवलतच म्हणावी लागेल.

#प्रवास #गाव #वाटेवरील_सौंदर्य #मराठी

वडा पाव, सामोसे, गोळ्या, लस्सी आणि पाणी इथपर्यंत ठीक होतं पण पेढे !? 😵 साताऱ्यात कंदी पेढे सोडून बाकी मिठाई बनत नाही बहुदा. पण मी समजू शकतो. लोकांना पुण्यात आले की कधीही न खाल्ल्यासारखे उकडीचे मोदक मागतात! जणू काही आमच्याकडे जिलबी, श्रीखंड, पुरणपोळी बनतच नाही! 🤨

#उगाच #प्रवास

#लालपरी मला आता जिवंत असल्यासारखी वाटू लागली आहे. चंचल, बोलकी, थोडी नखरेल पण मनाने चांगली! तिला रस्त्याच्या वळणांचा त्रास होत नाही. मात्र रस्त्याने विचित्र खड्डे किंवा अडथळे मधे आणले तर चिडते. पण फुगून नाही बसत हां. रस्ता जरा छान सरळ वाहू लागला की खुलून येते!
#अजब_प्रेम #प्रवास

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling