भाग १
स्वा.सावरकर विलायतेत असताना इथे जेष्ठ बंधू बाबारावांना घरात विस्फोटके बनविण्याच्या प्रणालीसंबंधी कागदपत्रे आणि 'लघु अभिनव भारतमाला' या देशवासियांना स्वातंत्र्यासाठी युद्ध पुकारण्याचे आवाहन करणाऱ्या काव्यसंग्रहाच्या प्रती मिळाल्याच्या आरोपाखाली राजद्रोही-
(१/८)
तात्यारावांचे (स्वा.सावरकरांनाच तात्याराव म्हणून संबोधतात) श्वशुर श्री.भाऊसाहेब चिपळूणकर ह्यांनी आपल्या जावयामुळे ओढवलेल्या आपत्तींना मोठ्या प्रेमाने नि धैर्याने तोंड दिले.
(३/८)
पण बाबारावांच्या बायकोला मात्र फार हाल सोसावे लागले. उभ्या नाशिकात त्यांना राहायला जागा मिळेना; माहेर ते तर लांबच राहिले मग आश्रय तरी कसा मिळावा ?
(४/८)
नंतर पतीविरहाने - त्यांचा तुरुंगात होणार छळ ऐकून ती माऊली आयुष्यभर झुरत राहिली.
(५/८)
परंतु दैवयोग असा विलक्षण की ज्या दिवशी बाळला आपल्या दोन्ही बंधूंना कुटुंबासमवेत भेटण्याची परवानगी मिळाली त्याच दिवशी त्या माउलीने अखेरचा श्वास घेतला.
(७/८)
संदर्भ : १) लोकसत्तेमधील येसुवहिनीवरील लेख
२) सदाशिव रानडे लिखित सावरकर संक्षिप्त चरित्र
(८/८)