हे कोण म्हणतंय?
साक्षात स्वामी विवेकानंद.
हिंदुत्वाचा ध्वज जगभर घेऊन जाणारे विवेकानंद १९०० मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलत होते. +👇
'बुद्धांशी तुलना होईल, असा एकही माणूस नंतर जन्मलाच नाही', असे आचार्य रजनीशांनी म्हणावे! +👇
जगातला एक धर्म सांगा, एक धर्मसंस्थापक सांगा, की जो स्वतःची अशी स्वतःच चिरफाड करतो! +👇
'भक्त' वाढत चाललेले असताना, विखार ही मातृभाषा होत असताना आणि 'व्हाट्सॲप फॉरवर्ड' हेच ज्ञान झालेलं असताना बुद्धांचा हा दृष्टिकोन आणखी समकालीन महत्त्वाचा वाटू लागतो.
माणूस बदलतो, यावर बुद्ध विश्वास ठेवतात. कोणीही मानव बुद्ध होऊ शकतो, याची हमी देतात. +👇
ज्याला बुद्ध समजला,त्याला 'सो कॉल्ड सक्सेस'वरची गल्लाभरू पुस्तकं वाचण्याची काही गरज नाही.'अत्त दीप भव' म्हणणारे बुद्ध तुमच्या आत असलेला दिवा प्रकाशमान करत असतात.दिवा असतोच आत,पण काजळी एवढी चढते की,आपण आपल्यालाच अंधारकोठडीत ढकलून देतो.+👇
बुद्धांनी सगळ्यात महत्त्वाचे काय केले? +👇
बुद्ध तपस्वी खरेच, पण तसेच जिप्सीही.ते विलक्षण संघटकही होते.अमोघ वक्ते होते. अभिव्यक्तीची अनेक माध्यमे त्यांनी प्रातिभ शैलीने हाताळलेली दिसतात.तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे,हातात तलवार न घेता बुद्धांनी जगावर राज्य केले.+👇
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला पुन्हा ख-याखु-या बुद्धाची वाट दाखवली. प्रज्ञा, शील, करूणा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता सांगणारा- 'बहुजन हिताय, +👇
रजनीश म्हणतात त्याप्रमाणे, बुद्धाचे खरे वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो. बाकी सगळे धर्म धमकावत असताना, +👇
बुद्ध बाहेर भेटत असला, तरी तो असतो तुझ्या-माझ्या मनात. +👇
बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे, संपन्न शेतकरी कुटुंबातला हा सिद्धार्थ.
आपल्यासारखाच गोंधळलेला सिद्धार्थ 'बुद्ध' होऊ शकतो. तर, तू का नाही? मी का नाही? +👇
गृहत्यागानंतर सिद्धार्थला समजले, ते बुद्ध सोबत असताना गृहवासात आपल्याला का समजणार नाही?
आजचा दिवस आहे, हाच प्रश्न या गृहवासात स्वतःला विचारण्याचा.
'अत्त दीप भव' हाच तर 'पासवर्ड' आहे 'बुद्ध' होण्याचा!
- संजय आवटे +👇
(संदर्भः
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरः बुद्ध आणि त्यांचा धम्म
२. डॉ. आ. ह. साळुंखेः सर्वोत्तम भूमिपुत्रः गोतम बुद्ध
३. डॉ. प्रदीप आवटेः धम्मधारा )
🙏🙏