My Authors
Read all threads
✍️✍️
नियतीने मागच्या जन्मी न जुळू दिलेल्या नात्याची रेशीमगाठ पुन्हा जुळवण्यासाठी नियती या जन्मात एक संधी देते. असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच माझ्याही आयुष्यात आला

ते साल असावं २०१३. मला नोकरीमुळे ऑफिसमधून बाहेर जावं लागतं असायचं. याच प्रवासात काय घडलं? वाचा हा धागा👇👇👇
एक दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर मला कळालं की उद्या मला ताम्हिणी घाटाखाली असलेल्या विळे बागाड एमआयडीसी मध्ये जायचं आहे. हे अंतर ऑफिसपासून १०० किलोमीटर. अडवळणी घाटरस्ता त्यामुळे प्रवासाला किमान अडीच तास लागणार हे मी गृहीत पकडलं होतं. दुसरा दिवस उजाडला ड्रायव्हर मला घ्यायला घरी आला.
आम्ही निघालो वाटेतचं माझा एक सहकारी होता. त्यालाही सोबत घेतलं. प्रवास सुरु झाला. ताम्हिणी घाट म्हणजे निसर्गाने नटलेल्या आणि हिरवाईने भरून पावलेल्या निर्मनुष्य रस्त्याचा प्रवास. प्रवास सुरु होता तसं डोक्यात नेहमीप्रमाणे विचारचक्र सुरू झालं होतं.
आम्ही कामाच्या ठिकाणी पोहचलो.
सकाळचे १० वाजले होते. २ वाजेपर्यत दुपारचं काम उरकलं आता जेवणाचं काय ते बघायचं होतं. ड्रायव्हरचा उपवास होता. त्याने डबा सोबत आणला होता. तो तिकडेचं गाडीत खिचडी खात होता. आम्ही आजूबाजूला हॉटेलबद्दल विचारणा केली तेव्हा कळालं इथून सरळ १० मिनिटे पुढे चालत गेलात की एक छोटी खानावळ लागेल.
फक्त तिथेच जेवण मिळेल बाकी इकडे काही मिळणार नाही. आता ड्रायव्हर आणि गाडी घेऊन जाण्यापेक्षा आम्ही विरंगुळा म्हणून पायी चालत जायचं ठरवलं. तो असाच मे महिना होता. भयंकर ऊन होतं. रस्त्यावर माणसं अजिबात नव्हती. चालत चालत कसा बसा त्या खानावळी जवळ पोहचलो.
साधं छप्पर होतं, दरवाजाही नव्हता
टेबल खुर्च्या वगैरे जेवण्याची सोय उत्तम होती. खानावळीत कोणीचं नव्हतं. इकडे तिकडे निरव शांतता होती. तहान लागून माझा घसा कोरडा पडला होता. इकडे तिकडे पाहिलं लांबून आवाज दिला कोणीच नव्हतं. मग थेट आत गेलो ग्लास घेऊन माठातलं पाणी घेणार इतक्यात आतला एक पडदा वाऱ्याने बाजूला उडाला.
आणि पोत्यावर दोन पाय ठेऊन खुर्चीवर रेलून बसलेली एक तरुणी पुस्तक वाचताना दिसली. वाचनात इतकी तल्लीन झाली होती की तिला आजूबाजूचं काही भान उरलचं नव्हतं. मी पडद्याआडून तिला न्याहाळून पाहिलं बोलके डोळे, गुलाबी मृदू ओठ, सरळ नाक,काळेभोर केस, चेहऱ्यावर कांती, एक वेगळंच तेज चेहऱ्यावर होतं.
तिला मी पाहिलं आणि पाहतच राहिलो.
क्षणभर वाटलं गेले अनेक जन्म मी तिचीच वाट पाहतोय. तिला पाहिलं आणि माझा अनेक वर्षांचा शोध थांबला असं मला वाटलं. एक आकृती, एक चेहरा, एक हास्य आपल्या मनात कल्पनेत अनेक वर्षांपासून चितारलेलं असतं & तेच चित्र खऱ्या आयुष्यात समोर उभं.अविश्वसनीय होतं सगळं
मी तिच्या डोळ्यात हरवून गेलो होतो. तिचे डोळे मला तिच्यासोबत एकांतात घेऊन गेले मला जगाचा विसर पडला इतकी ताकद तिच्या डोळ्यांमध्ये होती.
इतक्यात माझ्या हातातला रिकामा ग्लास निसटला आणि त्याने तिची तल्लीनता आणि माझी तिच्याकडे पाहण्याची एकाग्रता भंग केली. ती मला पाहून घाबरली.
मी चटकन सॉरी म्हणालो आणि संवादाला सुरुवात झाली. मी घडलेला प्रकार सांगितला आणि जेवण मिळेल का अस विचारलं? ती म्हणाली मिळेल की. काय हवंय? मी पाटी वाचली आणि ऑर्डर दिली. तिने जेवण बनवायला घेतलं. किचन जवळच होतं. मी मुद्दाम तिथलाच जवळचा टेबल निवडला. मी आणि मित्र तिथेच बसलो.
ऑफिस मला पुन्हा इकडे कामासाठी पाठवेल की नाही ही शंका माझ्या मनात होती. मी इकडे पुन्हा येईन की नाही हे सुद्धा मला ठाऊक नव्हतं. माझ्या मनात अनेक प्रश्न होते. मुलगी पाहिली आणि लगेच भाळलो असा मी नव्हतोचं कधी पण आयुष्यात पहिल्यांदाच असं का वाटलं तिला पाहून की तिला खूप आधीपासून ओळखतो.
तिला पाहून मन जितकं आनंदी झालं तितकंच व्याकूळ झालं. तिच्यासोबत माझं काही गतजन्मीचं नातं आहे असं मला वाटलं. मी विचारत गुंतलो होतो. इतक्यात फोडणीचा चिरचिरफसफस आवाज कानावर पडला.माझा मित्र मोबाईल मध्ये गुंतला होता. मी तिच्याशी बोलायचं ठरवलं आणि सहज विचारलं. पुस्तक वाचनाची आवड दिसतेय?
हो भरपूर, ती म्हणाली. मी म्हंटल सध्या काय वाचताय? ती म्हणाली "पहिलं प्रेम"
मी म्हंटल वि.स. खांडेकरांचं? ती म्हणाली तुम्हीही उत्तम वाचक दिसताय? मी म्हंटल वाचन आणि मी अजिबात नाही हो थोडीफार माहिती ठेवतो.
मी म्हंटल तुमचं राहणीमान आणि भाषा यावरून तुम्ही इथल्या वाटत नाही
ती म्हणाली मी मुंबईची.मग इथे कशा हा प्रश्न विचारण्याआधी माझी नजर तिच्या गळातल्या काळ्या दोऱ्याकडे गेली आणि चमचमत्या मण्यांसोबत मंगळसूत्र दिसलं. मला माझं उत्तर मिळालं. ती म्हणाली लग्न झालं आणि इकडेच आले. शिक्षण किती झालं?ती म्हणाली ग्रॅज्युएशन झालंय. हे सगळं घरचं सांभाळावं लागतं.
इतके सगळे योग जुळून आले पण एका मंगळसूत्राने माझी स्वप्नं धुळीस मिळवली होती. मी चाचपडलो हैराण झालो. दैव देतं कर्म नेतं अशी अवस्था झाली. तिने ताटात जेवण वाढलं. मित्र आणि मी मुकाट्याने जेवू लागलो. इतक्यात एक दारुडा चित्र विचित्र माणूस आला आणि त्याने तिच्या कानाखाली लगावली.
माझी तळपायाची आग मस्तकात गेली. क्षणाचाही विचार न करता मी त्या दारुड्यावर तुटून पडलो.इतक्यात ती माझ्यावर धावून आली आणि म्हणाली ते माझे मिस्टर आहेत तुम्ही जेवायला आलात जेवा आणि निघा. तिचा नवरा तिला म्हणाला हाच का तो तुझा कॉलेजातला राजकुमार?ज्याला तु माझ्यावर हल्ला करायला घेऊन आलीस?
तिचे डोळे डबडबले होते. ती रडू लागली, नवऱ्याला समजावू लागली नवऱ्याने एव्हाना तिला पायदळी तुडवून काढलं होतं. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला आणि मला दोघांना मिळाली होती. इथे थांबून उपयोग नाही हे मला कळालं मी गाडीकडे निघालो ती नवऱ्याच्या लाथा खात माझ्याकडे पहात जमिनीवर पडली होती.
ऑफिसचं काम उरकलं मी घरी निघालो प्रवासात सगळं सगळं आठवत होतं.ती आठवत होती. तिचे डोळे,तिने खाल्लेल्या लाथा आणि तिचा तो क्रूर नवरा. पुढचे ८ दिवस यातच गेले. तिचा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. रात्र दिवस मला तिची आठवण सतावत होती.
मला तिच्याशी बोलायचं होतं. अगदी खूप खूप बोलायचं होतं
पण सगळं जवळपास अशक्य होतं. अशातच ऑफिसने मला पुन्हा तिकडे पाठवलं मी सकाळी १० वाजता तिकडे पोहचलो. गेटवर वॉचमनने माझ्या हातात ५,६ मोठी पुस्तके ठेवली. म्हणाला त्यादिवशी तुम्ही गेलात त्यानंतर एक मुलगी आली तुमचं वर्णन सांगितलं & तुम्हांला हे द्या म्हणून देऊन गेली. हातात अनपेक्षित भेट
पडल्याने मी हुरळून गेलो. आज तिला काहीही करून भेटायचं तिच्या अडचणी विचारून तिची मदत करायची. वेळ पडली तर तिचा घटस्फोट घडवून लवकरच तिच्याशी बोलून लग्नही करायची मी मनाची तयारी केली होती. दुपारच्या जेवणावेळी मी खानावळीवर गेलो. सगळं बंद होतं. कामावरून निघताना खानावळीसमोरून फेरा मारला.
सगळं बंद होतं. खजील मनाने मी घर गाठलं. विचार थांबत नव्हते. रात्रीचं जेवण झालं. आता बेडरूममध्ये आलो आणि ती पुस्तकं चाळायला घेतली. त्या पुस्तकातून एक पत्र हाती पडलं. तिने ते पत्र माझ्यासाठी लिहिलं होतं. पत्राचा मजकूर होता.तुम्ही कोण आहात मला ठाऊक नाही.मी परपुरुषांशी कधीच संवाद साधत
नाही पण तुम्ही वेगळे वाटलात, अगदी जवळचे आणि मनकवडे वाटलात. तुमचा माझा गतजन्मीचा काही संबंध आहे असं वाटलं. तुमच्या डोळ्यात जादू आहे जी मला तुमच्याकडे ओढायला प्रवृत्त करतेय. माझं लग्न झालंय. माझी फसवणूक झाली. नवरा निर्व्यसनी आहे सांगितलं होतं. पण हा सकाळीपासून नशेत असतो.
याची खानावळ मी सांभाळते. पत्नी म्हणून प्रत्येक कर्तव्य करते. माहेरी जाऊन गरीब आई वडिलांच्या डोक्यावर ओझं म्हणून मला जगायचं नाहीये. नवऱ्याशी प्रतारणा करण्याचा विचारही माझ्या डोक्यात येणार नाही पण तुम्हाला पाहून हा विचार बदलतो की काय ही भीती मनात वाढलीये. त्यादिवशी तुम्ही गेलात आणि
नवऱ्याने तुमच्या नावाने मारत मारत गावभर माझी धिंड काढली. हे जगणं आता नकोय आणि प्रतारणेपेक्षा मृत्यूला कवटाळलेलं बरं म्हणून तो पर्याय निवडतेय. कदाचित तुम्ही हे पत्र वाचताना मी या जगात नसेन.मी आज रात्रीच आत्महत्या करतेय.
पत्र माझ्या हातात पडायला ८ दिवस लागले होते.मी चटकन ऑफिसातल्या
एका माणसाला फोन करून ८दिवसांपूर्वी गावात कोणी आत्महत्या केलीये का विचारलं? तो म्हणाला खानावळीवाल्या "राधाने" केलीये. मला दिलेल्या पत्राचा शेवट होता
तुमची न झालेली 'राधा'
जे सगळं मला तिच्याबाबत वाटतं होतं तेच तिलाही वाटतं होतं.नात्याचा हा धागा जुळण्याआधीच उसवला.ती हे जग सोडून गेली
तिला माझ्याबाबत जे काही वाटतं होतं ते ती मला या पत्रातून सांगून गेली. पण माझ्या भावना? त्या मी तिला कधीच सांगू शकणार नाही. ही खंत मला जास्त त्रास देत होती. मलाही तिच्याबाबतीत तेच वाटतयं हे तिला मी सांगू शकलो नाही याचं शल्य अधिक आहे. मी कारणीभूत ठरलो म्हणून ती हे जग सोडून गेली.
जाता जाता न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला देऊन गेली. पत्र उराशी कवटाळून मी हंबरडा फोडून फोडून रडलो. त्यादिवसानंतर काळजावर पडलेला हा खोलवर ओरखडा आजही भरला नाही.ही जखम घेऊन मी आजही तसाच जगतोय.नियतीच्या खेळात मी स्वतःशी पुन्हा हरलो आता जिंकण्याची ईच्छा कायमची मेली!
#काल्पनिक_कथा ✍️
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with TUSHAR KHARE 🇮🇳

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!