#nifty50
आपण कालच्या धाग्यांमध्ये समजून घेतले की शेअर मार्केट मध्ये एक्सचेंज हे एक व्यापाऱ्यांसाठी खरेदी विक्री व्यवहार करण्याचे एक केंद्र आहे. तसेच शेअर मार्केट मध्ये कंपन्या कशा प्रकारे लिस्ट (नोंदणीकृत) होतात.
आज एका मोठ्या प्रश्नाकडे वळूयात.👇
भारतीय शेअर बाजारात ५००० पेक्षा ही जास्त कंपन्या नोंदणीकृत आहेत दर वर्षी त्या मध्ये आणखी काही नवीन कंपन्या समाविष्ट होतात.
प्रत्येक कंपनीच्या प्रगतीचा कालावधी आणि अधोगतीचा कालावधी ही वेगळा असतो.👇
याचाच अर्थ प्रत्येक कंपनी आपल्या आपल्या प्रगती नुसार शेअर बाजारात 👇
आता जेव्हा आपण या सर्वांचा एकत्रित विचार करतो तेव्हा आपण कसे ठरवणार की भारतीय बाजार आज कसा कारभार करत आहे?. 👇
याच साठी Index (निर्देशांक) वापरला जातो. निर्देशांक त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या कंपनीच्या एकंदर चढत्या उतरत्या कारभाराचा अंदाजा देतो.
जसं की काल आपण पाहिले भारतात BSE (Bombay Stock Exchange)👇
NSEचा निर्देशांक हा निफ्टी ५० आहे तर
BSEचा निर्देशांक हा सेन्सेक्स आहे.
निफ्टी ५०
निफ्टी ही संज्ञा आली ती म्हणजे National आणि Fifty यांना जोडून Nifty 50 हा निर्देशांक १९९५ ला अस्तिवात आला.👇
निफ्टी ५० देशातील सर्वोत्तम ५० कंपन्यांचा निर्देशांक आहे जो शेअर बाजाराची दिशा सुचवतो.
म्हणजेच जेव्हा आपण ऐकतो की निफ्टी ५० ने आज ७० अंकाने उसळी घेतली आहे. म्हणजेच आज भारतीय बाजार वरच्या दिशेला कारभार करत आहे.👇
सेन्सेक्स
ही संज्ञा आली ती sensetive आणि Index यांना जोडून (sensex) सेन्सेक्स म्हटले जाऊ लागले हा निर्देशांक १९८६ मध्ये अस्तिवात आला.👇
निफ्टी ५० प्रमाणेच सेन्सेक्स हा निरदेशांक भारतीय शेअर बाजाराची दिशा दर्शाविण्याचे काम करतो.
याच प्रमाणे आणखी काही निर्देशांक त्या त्या
बँक निफ्टी - बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक
निफ्टी आयटी- आयटी क्षेत्राचा निर्देशांक
असाच प्रत्येक क्षेत्राचा वेगळा निर्देशांक ही असतो.
तर आज आपण निफ्टी ५०, सेन्सेक्स या निर्देशांकावर माहिती मिळवली. 👇
काही शंका असल्यास नक्कीच विचारू शकता.
या आधील सर्व धाग्यातील माहिती सुरुवातीपासून वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट देऊ शकता.
anrpstock.wordpress.com