आपण शेअर बाजाराची मूलभूत माहिती घेत असताना सौदा व्यापार (TRADING) म्हणजे काय आणि कसे करावे?
यविषयी माहिती घेण्याआधी, मला आतापर्यंतच्या धाग्यांच्या प्रतिक्रिये मध्ये(By reply) काही प्रश्न विचारले गेले होते. 👇
#१ इक्विटी मार्केट (Equity Market) म्हणजे काय?
#२ इक्वीटी (Equity) आणि कमोडिटी (Commodity) मार्केट मधील फरक काय?
#३ अॅग्री कमोडिटी बाजार(Agri Commodity) या विषयी माहिती द्यावी.
#४ बँकनिफ्टी (Bank Nifty) बद्दल माहिती द्यावी.👇
#१ इक्विटी मार्केट म्हणजे काय?
इक्विटि मार्केट म्हणजेच आपले पारंपरिक शेअर बाजार. ज्या मध्ये आपण एखाद्या कंपनीच्या शेअर्स ची खरेदी करतो व गुंतवणूकीचा परतावा मिळाल्यानंतर शेअर्स विकतो. 👇
#२ इक्वीटी आणि कमोडिटी मार्केट मधील फरक काय?
आपण कमोडिटी मार्केट बद्दल माहिती घेऊ. जसे की आपण या आधी ही पाहिले की शेअर बाजार आणि आपल्या रोजच्या दैनदिन व्यवहारात वस्तूंचा भाव हा खरेदी विक्री करणाऱ्यांच्या संखे प्रमाणे 👇
म्हणजेच या सर्व रोजच्या व्यवहारातील वस्तूंचा ही कारभार शेअर बाजारात होत असतो. या सर्व वस्तूंचा भाव हा शेअर बाजारात प्रतीसेकंदला ठरविला जात असतो. याचाच अर्थ शेअर बाजारातील व्यवहार करण्याची पद्धत तीच असते 👇
कमोडिटी बाजारात-
मौल्यवान धातू (Precious Metal) - सोने, चांदी.
अन्य धातू ( Base Metal)- तांबे, झिंक तसेच, अल्युमिनियम
ऊर्जा (Energy)- नॅचरल गॅस आणि क्रूड ऑईलचा कारभार चालतो.👇
#३ अग्री कमोडिटी बाजार (Agri commodity) : 👇
ऍग्री कमोडिटी मध्ये साखर, ऊस, वेलची, मिरे, कापूस, चणा, रबर, तेल वगेरे शेती मालाची ट्रेडिंग होते.👇
#४ बँकनिफ्टी (BankNifty) : बऱ्याच जणांनी विचारलेला प्रश्न म्हणजे बँक निफ्टी म्हणजे काय? तिच्या बद्दल माहिती द्यावी.👇
Axis Bank, Bank baroda, Bandhan Bank,👇
बँकिंग क्षेत्रातील चड उतार जाणून घेण्यासाठी BankNifty या निर्देशांकाची मदत होते.
बँक निफ्टी ही सुद्धा निफ्टी प्रमाणे NSE एक्सचेज मार्फत कारभार करते.👇
प्रत्येक ५-६ धाग्यानंतर आपला प्रश्न उत्तरांचा धागा येत राहील त्यामुळे निसंकोचपणे शंका विचाराव्या.🙏🙏
@Annu_kadle @nastik_Shubham @prathameshpurud @dipaligaikwad07 @MarathiPrachi @Madhuri47_47_47 @ModiS2_0 @AtulAmrutJ @manju77077 @d_d_dhuri @Manoj2211Khare @anu_bundhe @sidtalk27 @ashaysant