- रामसिंगला लिहिलेल्या पत्रात 'आम्ही हिंदू सत्वशून्य झालो आहोत काय?' इ. अनेक धर्माभिमानाचे उल्लेख.
- जागोजागी देवस्थानांना वर्षासने, दानपत्रे.
- चाफळच्या रामजन्मोत्सवास आक्रमकांकडून उपद्रव होऊ नये यासाठी संरक्षण आदेश.
- बुधभूषण ग्रंथात धर्मशास्त्राचे अनेक दाखले. +
- पोर्तुगीजांशी तह करताना 'आमच्या लोकांस धर्मांतरित करता येणार नाही.' असे कलम.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असलेले देशी गायींचा चाऱ्याचा सारा न घेण्याचे धोरण पुढे सुरू ठेवणे. +
- औरंगजेबचा 'यवनाधम' म्हणून उल्लेख करत तो गायी मारतो आणि मंदिरे भ्रष्ट करतो याबाबत संताप व्यक्त करणे. +
- ९ वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सर्व आघाड्यांवर अखंड झुंज देत स्वराज्याचे रक्षण.
- सुरत ते त्रिचीनापल्ली इतकी स्वराज्यासाठी धडक.
- एक एक किल्ला वर्ष वर्ष लढविणे. +
- निराजी रावजी यांच्या अनुपस्थितीत युवराजपदावर असताना न्यायनिवाडा केल्याचे उल्लेख.
- संगमेश्वरी असतानाही न्यायनिवाड्याचे कार्य सुरू होते. +
- बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक, नखशिख यांची निर्मिती.
- अस्खलित संस्कृतमध्ये पत्रव्यवहार. +
- प्रत्यक्ष रणांगणावर अतुल्य शौर्य.
- गोवा ते त्रिची अशा विविध भौगोलिक परिस्थिती असलेल्या रणांगणात अतुल्य पराक्रम. +
- धीरोदात्तपणे अत्याचार आणि त्यामागून मृत्यूला सामोरे जाऊन मराठी मनांत ज्वाला प्रज्वलित करणारे वडवानल.
छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!